ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜१४ मे इ.स.१६२६
निजामशहाचा वकिल "मलिक अंबर" याचा मृत्यू.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १४ मे इ.स.१६५६
(वैशाख अमावास्या, शके १५७८, संवत्सर दुर्मुख, वार बुधवार)

मुरारबाजी देशपांडे स्वराज्याच्या सेवेत दाखल!
मोरेंचा एक खास सरदार मुरारबाजी देशपांडे हा मर्द मावळा स्वराज्याच्या सेवेत दाखल झाले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜१४ मे इ.स.१६५७
(ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार)

ज्वलज्वलनतेजस छत्रपती संभाजी महाराज जन्म!
           छत्रपती संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली....
सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शिवशुभेच्छा...🚩🚩
जय शंभूराजे....🚩🚩🚩🚩🚩

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜१४ मे इ.स.१६६६
आग्र्याच्या भेटीनंतर महाराजांना कैद करण्यात आले. त्यांना राहअंदाजखानाच्या वाड्यात नेण्यात यावे, अशी आज्ञा बादशहाने शिद्दी फौलादला केली. राहअंदाजखान हा आग्र्याचा किल्लेदार होता.
१४ मे रोजी त्याच्या हवेलीत महाराजांची हत्या करण्यात येणार होती. परंतु रामसिंग त्यांना जामीन राहिला आणि महाराज बचावले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜१४ मे इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्यावरील अधिकाऱ्यास सक्त सूचना दिल्या व एकदा लष्कराची नीट पहाणीही केली. नंतर परशुरामक्षेत्री जाऊन पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज १४ मे रोजी  रायगडावर आले. राज्यभिषेका पूर्वीची ही कोंकण मोहीम होती.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜१४ मे इ.स.१६७७
९ मे १६७७ ते १४ मे १६७७ दरम्यान छत्रपती शिवराय कर्नाटकातील पेड्डोपोलमला मुक्कामी. राजांना आपल्यावर विषप्रयोग होतोय याची शंका होती, म्हणून छत्रपती शिवरायांनी येथेच इंग्रजांकडून विषावर उतारा होणारी औषधे मागवली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १४ मे इ.स.१६८२
खानजहान बहादूर किल्ले रामसेजला पोहोचला. किल्ले रामसेजच्या किल्लेदाराला रसद पुरवठा चालू होता. तसेच मोगली सैन्याला पण रसद मिळत होती.

🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜१४ मे इ.स.१७५२
शिवाजी राजांनी जसा अफझलखानाचा कायमचा काटा काढला किंवा कोणत्याही शत्रूला दयामाया दाखवली नाही तास प्रकार पेशवाईत घडला नाही. निजाम हा थोरल्या बाजीरावांनी सोडून दिलेला सरदार कायम पिढ्यानपिढ्या पेशव्याने डोकेदुखी तर ठरलाच पण पेशवाई बुडल्यावरही त्याच्या वंशजांनी हिंदूंची ससेहोलपट केली.
अहमदिया कराराप्रमाणे बादशहा मराठ्यांना ५० लाख देणे लागत होता. मात्र करार नुसता कागदावर राहीला पैसे महीनाभर न मिळाल्याने मराठ्यांनी दिल्लीच्या आजूबाजूचा परीसर फोडून काढायला सुरुवात केली. आता ही ब्याद कशी घालववी हा प्रश्न बादशहास पडला. मात्र त्याच दरम्यान निजामाच्या गादीवरती गाझीउद्दिनला बसवण्याचा घाट नानासाहेब पेशवे घालत होते. नानांनी तशी पत्रे शिंदे - होळकरांना लिहुन गाझीउद्दीन यांस बरोबर आणावे असा निरोप दिला. त्यावरुन पंजाब प्रांतात आत्ता जायचे नसेल तर ५० ऐवजी ३० लाख द्या आम्ही दख्खनला परततो अशी मागणी शिंदे - होळकरांनी केली.  मग निमाजीबद्दल गाझीउद्दीनने ३० लाख बादशहास द्यावेत बादशहाने तेच मराठ्यांस द्यावेत असे ठरले. गाझीउद्दीनला निजाम बनवून आपल्या उपकाराखाली ठेवावे असा पेशव्यांचा सरळ हिशेब होता. जावेदखानने लगोलग १४ मे १७५२ रोजी गाजीउद्दिनच्या नावे निजामीचे फर्मान काढले. बादशाही खजिन्यातून रोख पैसे मल्हाररावांन दिले. मराठे दक्षिणेत परत गेले. पण हा गाझीउद्दीन १६ ऑक्टोबर १७५२ मध्ये विषप्रयोगाने मेला. पेशव्यांचे एक राजकारण उधळले गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments