ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २ मे इ.स.१६५६
शिवरायांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला.
शिवाजी राजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ मे इ.स.१६६५
(वैशाख वद्य त्रयोदशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार मंगळवार)
दाऊदखान किल्ले कोंढाण्याच्या दिशेने!
किल्ले राजगडावरून प्रचंड मार खाऊन निघालेला दाऊदखान मराठ्यांच्या प्रचंड रेट्यासमोर टिकेनासा झाला होता. किल्ले राजगड परिसरातून २ कोस मागे हटल्यानंतर त्याने आपला तळ, गुंजणघेऱ्याजवळ दिला व तिथून एक दिवस विश्रांती घेऊन, दुसऱ्या दिवशी, दि. १ मे इ.स.१६६५ रोजी तो शिवापुरला आला. आणि कोंढाण्याच्या दिशेने नासधूस करीत जाऊ लागला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ मे इ.स.१६८३
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राजव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी कारभारी रघुनाथ नारायण हणमंते यांचे निधन. असा कोश तयार करणारे महारक मध्ययुगातील एकमेव राज्यकर्ते
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ मे इ.स.१७३९
गोव्याचे पोर्तुगीज आणि व्यंकटराव घोरपडे यांच्यात तह!
या तहात खोर्जुवे बेट आणि पनाळे बेट ही पोर्तुगिजांनी घेतलेली सावंतांची दोन्ही बेटे त्यांनी सावंतांना परत करावी, असे कलम होते. परंतु मी दोन्ही बेटे त्यांनी सावंतांना परत करावी, असे कलम होते. परंतु ती दोन्ही बेटे पोर्तुगिजांनी सावंतांना परत केली नाहीत. तत्पूर्वी पोर्तुगिजांच्या संगनमताने सावंतांनी बार्देश व्यापिले होते. कारण मराठे बार्देश घेतील अशी भीती पोर्तुगिजांना वाटल्याने त्यांनीच सावंतांना बार्देश घेण्यास सांगितले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment