ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 २३ मे इ.स.१६७३
सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी इंग्रजांची हुबळीच्या वखारीची लूट केली होती. या लुटीची भरपाई मागण्यासाठी इंग्रजांनी आपला टॉमस निकल्स नावाचा वकील मुंबईहून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी पाठवला होता. २३ मे ला तो गडावर पोहोचला. बुलंद,बेलाग आणि अभेद्य रायगड पाहून थक्क झालेल्या निकल्सने रायगडाचे केलेले वर्णन संक्षिप्त स्वरूपात असे "Where the hill is not naturally strong, there they build Wall's about 24 foot high,and within 40 foot of the first wall there is another such a wall, that if the enemy should gained one, they have another to beate him out,soe that if the hill be furnished with provisions,a few men may keepe it from all the world.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ मे इ.स.१६७४
महाराजांची भेट घेण्याचा हेन्री ऑक्झेंडनचा प्रयत्न!
हेन्री ऑक्झेंडनने निराजीपंतांच्या मार्फत महाराजांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्याभिषेकाच्या पुर्वतयारीत महाराज एवढे व्यस्त होते की, लगेचच महाराजांची भेट त्याला मिळू शकली नाही. परंतु महाराजांना भेटीची सर्व कहाणी सांगितल्यानंतर महाराजांनी दि. २६, मे इ. स. १६७४ रोजी भेट देण्याचे कबूल केले व तोपर्यंत त्याची पाहुणा म्हणून सर्व बडदास्त ठेवण्याचे आदेश निराजीपंतांना दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ मे इ.स.१६७७
जिंजीचा किल्ला जिंकल्यावर छत्रपती शिवाजी महाराज वायव्येस २३ मे रोजी वेलोरे येथे गेले. त्या किल्ल्यावर अब्दुलाखान म्हणून विजापुरी अधिकारी होता. दक्षिण हिंदुस्तानात अत्यंत मजबूत असा हा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जोराची तयारी केली होती. किल्ल्यास वेढा घातल्यावर किल्लेदाराने आपल्या पराक्रमाची शर्थ करून किल्ला लढविला. तेव्हा किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी महाराजांनी नजीकच्या दोन टेकड्यांवर नवीन दोन किल्ले बांधिले आणि त्यांस साजरा, गोजरा असे नाव दिले आणि त्यावरून तोफांचा मारा वेलोरेच्या किल्ल्यावर सुरू केला. वेलोरे हा भुईकोट किल्ला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ मे इ.स.१६८१
मुंबई बंदरात इंग्रजांच्या आश्रयाने राहून मराठी मुलखाला त्रास देणाऱ्या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजानी आपला वकील पत्र देऊन मुंबईला पाठवला होता आणि त्यांना असे कळवले होते की इंग्रजांनी सिद्दीला मदत करणे ताबडतोब थांबवावे अन्यथा संभाजीराजे मुंबईवर स्वारी करतील. महाराजांचे वकील आवजी पंडित मुंबईत पोहोचताच सिद्दीने भीतीने आपले आरमार मुंबई बंदराच्या बाहेर नेले. आवजी पंडित मुंबईत ५ महिने ठाण मांडून राहिल्याने इंग्रज आणि सिद्दी या दोघांनाही जरब बसली व त्यांच्या हालचाली थंडावल्या. पाच महिन्यांचा मुक्काम संपल्यानंतर संभाजी महाराजांचे वकील रायगडावर परत जायला निघताच इंग्रजांनी त्याच्याबरोबर शंभुराजेंच्या साठी १५० रुपयांचा नजराणा व वकीलासाठी ३ वार स्कारलेट देण्याचे ठरवले. वकील आवजी पंडित हे नजराणे व महाराजांच्यासाठी पत्रे घेऊन जून महिन्याच्या सुरुवातीला रायगडाकडे गेले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ मे इ.स.१७२९
पेशवे "थोरले बाजीराव" यांनी अलाहबादचा सुभेदार 'मुहम्मदखान बंगश' याचा दारुण पराभव केला.
खान मोठे सैन्य घेऊन 'बुंदेलखंडावर' चालून आला तेव्हा राजा "छत्रसाल" याने "थोरल्या बाजीरावांची" मदत मागितली. पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, 'जो गति ग्राह गजेंद्रकि सौ भई हे आज..... बाजी जात बुंदेलकी राखो बाजी लाज'. आपल्या २५,००० घोडदळासकट बाजीराव त्याच्या मदतीस धावून आले, सर्वप्रथम खानची संपुर्ण रसद तोडून त्याला मुघल बादशहाकडून कुठलीच मदत मिळु दिली नाही. जयपुरकडून खानाचा मुलगा "कैमखान" बापाच्या मदतीस धावून आला पण "थोरल्या बाजीरावांनी" त्याचा पराभव केला. आता 'बंगशखानने' पुर्णपणे शरणागती पत्करली व "राजा छत्रसाल" वर पुन्हा आक्रमण करणार नाही असे कबुल करुन आपली सुटका करुन घेण्यात यशस्वी झाला. "राजा छत्रसालने" बाजीरावांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांना काल्पि, झांशी, सागर, सिरोंज, हरदेनगर यांचा वार्षिक महसुल " ३३ लक्ष " बहाल केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ मे इ.स.१७३७
पोर्तुगिझांकडून जिंकल्यानंतर "थोरले बाजीराव" यांनी "अर्नाळा किल्ला" पुनश्च बांधुन घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ मे इ.स.१७९०
इस्माईल बेग आणि मारवाडची फौज १ होऊन मराठ्यांशी लढण्यास आली. ६ तास जोराची लढाई झाली. संध्याकाळ झाली तरी वेगाने आपली फौज माघारी नेली. द बुआन्य परत आला. महादजी शिंदे यावेळी दिल्लीत "बादशहा" कोणाला करावयाचे या गडबडीत होते. कारण गुलाम कादरच्या प्रकरणात शहाआलम आंधळा झाला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments