ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २४ मे इ.स.१६४९
#विर_"#बाजी_पासलकर" #स्मृतीदिन
छत्रपती शिवरायांना धनुर्विद्या शिकवणारे रणझुंझार बाजीकाका पासलकर हे मोस मावळखोर्यातचे वतनदार. निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून, धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते. तंटे सोडविण्यात ते हुशार होते. इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या. पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.
फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.
फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. दोघात तुंबळ युध्द झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. त्याशी खासाखानाशी गांठ पडली. एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार पडले. मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले.
बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ मे इ.स.१६७३
इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) टॉमस निकल्स किल्ले रायगडावर युवराज शंभुराजे यांची भेट घेतली. युवराज शंभुराजे यांनी मला भेटीकरीता एका ठिकाणी बोलावले. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बसले होते. त्यांनी अनेक इकडचे तिकडचे प्रश्न विचारले.
उदाहरणार्थ:
इंग्लंडच्या राजाजवळील माणसांची, घोड्यांची, शिपायांची संख्याही त्यांनी विचारली.
"समोरच्या झाडाला पाने किती आहेत "?
असा उलट प्रश्न मी युवराजांना विचारला 'आणि त्याचप्रमाणे मलाही त्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही असे सांगितले". युवराजांनी माझे काम काय आहे ते समजून घेण्याची इच्छा दर्शवल्याने मी त्यांना क्रमाने कामे सांगितली. ती ऐकून घेतल्यावर "मला या बाबतीत काही करता येत नाही. मी फक्त तुमच्या आगमणाबद्दल वडिलांना कळवितो म्हणजे ते लवकरच येतील. तुमच्या प्रकृतीला ही उंचावरची हवा मानवणार नाही तेव्हा तुम्ही खाली जाऊन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला रहा" असे युवराजांनी सांगितले त्याप्रमाणे मी गेलो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ मे इ.स.१६८५
(ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा, शके १६०७, क्रोधन संवत्सर, वार रविवार)
औरंगजेब बादशहा अहमदनगरहून सोलापूरला पोहोचला.
महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहास सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा त्या दरम्यानच्या काळात आदिलशाही व कुतुबशाही तरी आपण गिळंकृत करू शकू म्हणजे किमान सांगायला होईल की, दोन्ही शाह्या औरंगजेब बादशहाने संपवल्या. हातात काही नसण्यापेक्षा हे निश्चितच बरे होते. कारण मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा कुठपर्यंत चालेल हे आता दस्तुरखुद्द औरंगजेब बादशहालाच उमजत नव्हते! छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाचे मराठी साम्राज्य गिळंकृत करण्याचे मनसुबे लावले होते. दस्तुरखुद्द औरंगजेब बादशहा अहमदनगरहून कूच करून सोलापुरात दाखल झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ मे इ.स.१७०२
२४ मे इ.स.१७०२ च्या एका पत्रानुसार बाळाजीपंत हे सरसेनापती धनाजी जाधवरावांच्या चाकरीत असल्याचा उल्लेख येतो. अस्सल मोडीतले देवनागरीत रूपांतर पुढीलप्रमाणे अज स्वारी राजेश्री बालाजी विश्वनाथ दिम्मत राजेश्री सेनापती ताा मोकादमानी कसबा सासवड प्राा पुणे सुरू सलास मया अलफ कसबे मजकूर पैकी घासदाणा स्वार दिले स्वारी मजकूर देणे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇


Comments
Post a Comment