ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २६ मे इ.स.१६७४
(ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा, शके १५९६, संवत्सर आनंद, वार मंगळवार)
महाराजांनी हेन्री ऑक्झेंडनला भेट दिली!
हेन्री ऑक्झेंडनने आणलेला नजराणा महाराजांना व युवराज शंभुराजेंना दिला. नजराण्यात एक खुर्चीही ऐनवेळी हेन्री ऑक्झेंडनने महाराजांना दिली. महाराजांनी नजराण्याचा आनंदाने स्वीकार केला व इंग्रजांनी खुशाल बिनधोक व्यापार करावा असे सांगितले. आपण त्या द्रुष्टीनेच तह करण्यासाठी आलो असे सांगून हेन्री ऑक्झेंडनने इतर देशात मिळतात तशा सर्व सवलती आपल्याही देशात आम्हाला मिळाव्यात अशी महाराजांना विनंती केली. त्यावेळी या संदर्भात हेन्री ऑक्झेंडनने मोरोपंत पेशव्यांशी बोलणी करावी असे महाराजांनी सांगितले व युवराज शंभुराजेंसह ते उठून महालात परत गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मे इ.स.१७२७
टिपू सुलतान हा रॉकेटचा शोध लावणारा भारतातला पहिला माणूस होता वगैरे हास्यास्पद थापा आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. वास्तवामध्ये टिपूच्या जन्माच्या कितीतरी आधीपासून हिंदुस्थानात दारूचे बाण ( रॉकेट्स ) वापरात होती. याचं एक ठळक उदाहरणे म्हणजे १६५८ साली औरंगजेब आणि दारा-शुकोह यांच्यामध्ये झालेल्या युद्धात अशा दारूच्या बाणांचा वापर झाला होता. मराठेशाहीत देखील दारूच्या बाणांचा वापर होत असे आणि यातली काही उदाहरणे टिपूच्या जन्माच्या आधीची आहेत.
सातारच्या शाहू छत्रपतींच्या २६ मे १७२७ च्या पत्राचे. या पत्राद्वारे शाहू छत्रपतींनी नागपूरकर भोसल्यांकडून काही शस्त्र सामग्री मागवली होती, त्यात दारूच्या बाणांचा उल्लेख आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मे इ.स.१७३३
पेशवे थोरले बाजीराव यांनी आबाजीपंत पुरंदरे यांना सिद्दी संदर्भात पत्र लिहिले. पत्रात ते म्हणतात,"-
सिद्दीचे २ हात जबरदस्त आहेत. एक अंजनवेल आणि दूसरा उंदेरी. प्रतिनिधी अंजनवेलीस जातील तर उत्तम आहे.
सरखेल उंदेरिस खटपट करतील. ते दोन्ही स्थळे हातात आलीयावर याची किंमत कमी होइल आणि आसराही तूटेल."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मे इ.स.१७५४
मराठे आणि जाट यांच्यात तह झाला. "माधवराव पेशवे यांनी गृहकलह मिटवून विरोधक संपुष्टात आणले होते. पुण्यात राज्य कारभाराची घडी नीट बसवून आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला होता. पानिपतचा पराभव मात्र त्यांना डाचत होता. तो कलंक धुवून काढण्यासाठी त्यांनी परत एकदा उत्तरेकडे लक्ष वळविले. त्यांनी एक मोठी मराठी फौज उत्तरेत पाठविली. मराठे व जाट यांच्यात जो तह झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मे इ.स.१८१७
ईस्ट इंडिया कंपनीने पेशवे दुसरे बाजीराव ह्यांच्याकडून त्रिंबकजीच्या निषेधाचा जाहीरनामा काढून घेतला. कंपनीने रायगड, सिंहगड, आणि पुरंदरचा ताबापण घेतला. (हा नावापुरताच ताबा ठरला कारण पुढे पुन्हा इंग्रजांना हे किल्ले जिंकून घ्यावे लागले!)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment