ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
📜 ३१ मे इ.स.१६६६
फौलादखानाने औरंगजेब बादशहाकडे अर्ज केला. आग्र्यास महाराजांच्या निवासस्थानाभोवती फौलादखानाच्या चौक्या बसलेल्या होत्या. या चौक्यांबद्दल महाराजांसोबतची मंडळी फौलादखानाजवळ विनंतीवजा तक्रार करू लागली. स्वतः महाराजही या कैदेबद्दल फौलादखानाजवळ नापसंती व्यक्त करू लागले. तेव्हा दि. ३१ मे इ.स.१६६६ फौलादखानाने औरंगजेब बादशहाकडे अर्ज केला की, शिवाजी राजांकडील लोक तक्रार करीत आहेत व शिवाजी राजाही याचना करून सांगत आहे की माझ्याकडून काही एवढी मोठी चूक झाली नाही की औरंगजेब बादशहांनी माझ्यावर एव्हढी अवकृपा करावी.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ मे इ.स.१६७४
एंद्रीशांतीचा मुहूर्त...
या दिवशी छत्रपती शिवरायांची अग्निप्रतिष्ठा करण्यात आली यात इंद्रायणी पूजा झाली व अनुपान्गिक सर्व विधी झाल्यावर आचार्य आणि ऋत्विक यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ मे इ.स.१६७६
बहादुरखानाने सोलापूर जवळ भिमा ओलांडली. औरंगजेब बादशहाने आज्ञा केली की, विजापूर बळकावून बसलेल्या अब्दुल करीम बहलोलखानास कैद करावे वा त्याचा वध करावा. औरंगजेब बादशहाने विजापुरवर चढाई करण्याचा आदेश बहादुरखानाला दिला. एव्हढेच नव्हे तर, बादशाही सैन्याचा बिनीवरील आधिकारी म्हणून दिलेरखानाची पुन्हा दक्षिणेत नेमणूक केली. तो यावेळी उत्तरेस होता. औरंगजेब बादशहाची आज्ञा होताच तो दक्षिनेत रवाना झाला. त्याने सोलापूर जवळ भिमा ओलांडली. विजापुरचे दक्षिणी पक्षाचे सरदार शेख मीनहाज व शेख महंमद जुनैदी हेही मोगलांना येऊन मिळाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ मे इ.स.१७२५
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधील जामखेड नजीकच्या चौंडी या छोट्याशा गावी झाला त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे अतिशय विद्वान आणि दूरचा विचार करणारे होते त्या काळात शिक्षणाच्या फारश्या सोयी उपलब्ध नसतानादेखील त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचनास शिकवले कुशल प्रशासक, प्रजानिष्ठ, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....💐💐
त्यांच्या कार्यास, विचारास विनम्र अभिवादन....
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ३१ मे इ.स.१७६३
किल्ले मर्दनगडावरील मराठी सैन्याने पोर्तुगिजांपुढे शरणागती पत्करली. पेशव्यांच्या आरमाराचा दर्यासारंग आनंदराव धुळप यांनी माकावहून गोव्यास निघालेले एक पोर्तुगीज जहाज पाठलाग करून पकडले. ह्या आगळीकेबद्दल मराठ्यांना शासन करण्यासाठी व्हिसेरेई कौंट द एगा हा ७०० सैनिक घेऊन फोंड्यावर चालून गेला. सावंताचा कारभारी जिवाजी सबनीस याने मराठ्यांच्या रोषाची पर्वा न करता पोर्तुगिजांना ५०० सैनिकांची कुमक केली. किल्ले मर्दनगडावर मराठ्यांची फक्त ७०० सैनिकांची शिबंदी होती. मराठ्यांनी आक्रमकांचा कसून प्रतिकार केला. तब्बल १३ दिवस मराठ्यांनी किल्ला जोमाने लढविला. परंतु नंतर किल्ल्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने, दि. ३१ मे इ.स.१७६३ रोजी त्यांनी शरणागती पत्करली. पोर्तुगिजांनी किल्ला ताब्यात घेऊन मराठ्यांना त्यांच्या हत्यारासह जाऊ दिले. त्यांनी किल्ला खाली केल्यावर पोर्तुगिजांनी तोफा डागून तो जमिनदोस्त करून टाकला. किल्ले मर्दनगड गेल्याने अंतरुज महालही मराठ्यांच्या हातचा गेला. पोर्तुगिजांनी तो आपल्या राज्यास जोडला. परंतु तो नंतर त्यांनी सोंधेच्या राजास करार करून दिला. मात्र आपल्या सैन्याची एक शिबंदी सोंधेच्या राजाच्या खर्चाने फोंड्यास ठेवण्याची शर्थ घातली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment