ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 ४ मे इ.स.१६४९
मोगलांविरोधात शस्त्र उचलणारा शूर हिंदू राजपूत छत्रसाल बुंदेला याचा जन्म.
औरंगजेबासारख्या कट्टर इस्लामी बादशहालाही शह या छत्रसालाने दिला. छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रसालाची भेटही इतिहासात झाली होती.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 ४ मे इ.स.१६७५
(वैशाख वद्य पंचमी, शके १५९७, राक्षस संवत्सर, वार मंगळवार)

युवराज शंभुराजे यांचे ताकीदपत्र!
स्वराज्य कार्यात महाराजांनी युवराज शंभुराजे यांना गुंतवल्यानंतर युवराज शंभुराजे यांच्या प्रशासनाचे चांगले निवाडेसुद्धा उपलब्ध आहेत. दि. १३ मार्च इ.स.१६७५ रोजीच्या युवराज शंभुराजेंनी गोपाळसेट सेट्याच्या सेटेपणाच्या तंट्याचा निकाल लावला. त्याबद्दल युवराज शंभुराजे यांना भेटीदाखल ५ होण गोपाळसेटने दिले. युवराज शंभुराजे यांनी पुण्याच्या राघो भास्कर सरहवालदार याला व जुन्नरच्या राघो बल्लाळ, सुभेदाराला लिहीलेली पत्रे इतिहासात उपलब्ध आहेत. निळोजी, शंकराजी, विसाजी व त्र्यंबकजी नीळकंठराव यांनी मिरासपट्टी मागू नये अशा स्वरूपाची ताकीद पत्रातून दिलेली आहे. युवराज शंभुराजे वयाच्या १७, व्या वर्षापासूनच राज्यकारभारात लक्ष घालत होते. याचे ही उत्तम उदाहरणे आहेत. वरील उदाहरणे युवराज शंभुराजे यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत आहेत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ४ मे इ.स.१६७७
गोवळकोंड्याच्या कुतूबशहाचे भेटीला येण्याचे सन्मानपूर्वक निमंत्रण आणि मराठा साम्राज्याचा विस्तार या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत महाराजांनी आपल्यासोबत सरनौबत येसाजी कंक,बाजी सर्जेरावजेधे,सोनाजी नाईक दौलतबंकी,बाबाजी ढमढेरे,आनंदराव मोरे,मानाजी मोरे,सूर्याजी मालुसरे,सेखोजी गायकवाड,धनाजी जाधवराव या शूर सरदारांच्या बरोबरच २० हजार घोडदळ व ४० हजार पायदळ घेतले होते. मार्च महिन्याच्या मध्यावर छत्रपती शिवाजी महाराज गोवळकोंड्याला पोहोचले. कुतुबशहाने अतिशय सन्मानाने महाराजांची भेट घेतली व वस्त्रे,अलंकार,हत्ती -घोडे देऊन त्यांचा गौरव केला. तिथे एक महिनाभर मुक्काम करून महाराज दक्षिण दिग्विजयार्थ पुढे निघाले. वाटेत त्यांनी श्रीशैलम येथे मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन तिथे ९ दिवस मुक्काम केला. श्रीशैलमहून महाराज कडप्पा मार्गे तिरुपती येथे आले. तिथे त्यांनी भगवान व्यंकटेशाचे दर्शन घेऊन तिथल्या पूजेसाठी व अन्नछत्रासाठी प्रतिवर्षी ४२० होन देण्याची सनद पुरोषोत्तम भट बुरडी यांना करून दिली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 ४ मे इ.स.१७३९
वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜४ मे इ.स.१७५८
बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशे पावतो पसरवला. मराठ्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. थोरले बाजीराव हे एकमेव अपराजित सेनापती होते. अटकेच्या मोहिमेत तुकोजी होळकर आणि त्यांच्या सोबत असणारे सरदार राणोजी शिंदे यांनी अप्रतिम पराक्रम केला होता, रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षी अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातिल ४ मे रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहीलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे –
"आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करु. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुल्तान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरश: नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेउन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतिल. आम्ही आपले राज्य कंदहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे." मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधु नदी आणि कश्मीरपर्यंत, पुर्वेला ओरिसापर्यंत, दक्षीण-पश्विमेला गोव्यापर्यंत आणि दक्षीणेला म्हैसुरपर्यंत पसरले होते.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 ४ मे इ.स.१७९३
फिरंग्यानी वसई किल्ल्यावर तहाचे निशान फडकावले

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 ४ मे इ.स.१७९९
हैदरअलीचा थोरला मुलगा व मैसूरचा वाघ, शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईत ठार झाला. (जन्म: २० नोव्हेंबर १७५०)

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 ४ मे इ.स.१८०८
राजे शाहू महाराज (दुसरे) महानिर्वाण झाले व तद्नंतर त्यांचा मुलगा प्रतापसिंह हा गादीवर बसला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments