ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ५ मे इ.स.१६५७
(ज्येष्ठ शुद्ध द्वितीया, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार मंगळवार)
महाराजांची किर्ती सातासमुद्रापार!
पोर्तुगालच्या राजास लिहीलेले एक सुंदर पत्र उपलब्ध असून, त्यात त्याने लिहिले आहे की, "राजे शहाजीराजे यांचे बंडखोरपुत्र, " शिवाजीराजे यांनी उत्तरेकडील मुलखास उपद्रव दिला आहे. त्यामुळे आधिकचे ८० शिपाई चौल येथे बंदोबस्तासाठी पाठवावे लागत आहेत". सिंधुसागराच्या पाठीवर लाटांची टिपरी वाजवून सातासमुद्रापलीकडील पोर्तुगालच्या राजास गोव्याच्या गव्हर्नरने शिवाजी महाराजांची महती ऐकवली आहे. पाश्चात्य श्रीशिवचरीत्र संदर्भातील हा बहुधा पहीलाच उल्लेख असावा.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ५ मे इ.स.१६६३
गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला छत्रपती शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले.
१६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गाडी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ५ मे इ.स. १६६५
वैशाख अमावास्या, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार शुक्रवार, रोजी दाऊदखान व रायसिंह यांनी किल्ले लोहगडाकडे कुच केले.
मराठी फौज आणि रयतेचा चिवट प्रतिकार, मोगलांची टेहाळणी पथके किल्ले लोहगड परिसरात घुसली आणि आकस्मात मराठे मोगलांवर तुटून पडले. मोगलांची ताकद कमी पडते आहे असे समजताच दाऊदखानाने राजा जयसिंग, अचलसिंग, कुतुबूद्दीनखान यांना पाठविले.
मात्र चिवट मराठे शर्थाने प्रतिकार करत होते. मोगली सैन्याची संख्या वाढत आहे असे दिसताच मराठ्यांनी माघार घेतली व डोंगराचा आसरा घेतला. मात्र मोगलांनी मग किल्ले लोहगड परिसरातील सर्व शेती लागवड जाळून टाकली, गरीब प्रजा व गुरेढोरे कैद केली गेली. मात्र मराठी साम्राज्याचा प्रतिकार व गरीब रयतेची चिवट झुंज पाहून दाऊदखान मेटाकुटीला आला होता.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ५ मे इ.स.१६८०
छत्रपती संभाजी महाराजांनी रामजी नाईक ठाकूर या वकीलाबरोबर गोव्याचा विजरई यास 'सलोख्याचे' पत्र पाठवले. या पत्रात छत्रपती शंभूराजांनी आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी देऊन आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले आणि पोर्तुगीज व मराठे यांच्यात मैत्रीचा तह करण्यास सुचवले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ५ मे इ.स.१६८२
छत्रपती संभाजी महाराजांनी कारवार जवळील अंजदीव बेटाचा ताबा घेण्याची तयारी!
जानेवारी १६८२, रोजीच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांनी कारवार जवळील अंजदीव बेटाचा ताबा घेऊन तेथे किल्ला बांधण्याची तयारी सुरू केली. मात्र गोवा व कारवार समुद्र किणारपट्टीपासून जवळ असलेले भर समुद्रातील अंजदीव बेट मराठ्यांच्या ताब्यात जाणे गोवेकर पोर्तुगिजांना अत्यंत धोकादायक वाटले. याच सुमारास छत्रपती संभाजी महाराजांनी अरबांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्याने आणि हे अरब पोर्तुगिजांचे शत्रू असल्याने गोवेकर पोर्तुगीज मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकारणाबाबत साशंक बनले.
अंजदीव बेटावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाल्यास मराठ्यांचा व अरबांचा गोव्याला कायमचा उपद्रव निर्माण होईल अशी भिती पोर्तुगिजांना वाटली!
वैशाख शुद्ध नवमी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार शुक्रवार, म्हणजेच आजच्या दिवशी, पोर्तुगिजांनी आपले ७,०००, हजार सैनिक अंजदीव बेटावर आणून बेट ताब्यात घेतले आणि किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली!
मात्र या घटनेमुळे पोर्तुगिजांचे संबंध बिघडले नाहीत कारण त्यावेळी मोघल व सिद्दी हे २, दोन शत्रू समोर असताना तिसरा शत्रू अंगावर घेणे शहाणपणाचे ठरले नसते.
कारण त्याचवेळी डिचोली व कुडाळ परिसरात छत्रपती संभाजी महाराजांनी दारुगोळ्याचे कारखाने उभारले असल्याने आणि त्याला येणारा कच्चा माल समुदमार्गे येताना उलट पोर्तुगिजांनी अडवू नये, असा सज्जड दम देखील छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना दिला होता.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ५ मे इ.स.१७४६
पोर्तुगिजांनी सावंतांचा "हलणे" किल्ला घेतला. ह्या लढाईत सदई किल्ल्याचा किल्लेदार गोमा सावंत याने मोठा पराक्रम गाजविला. हलणेहून पोर्तुगीज सैन्याने डिचोलीच्या किल्ल्यावर चाल केली. तो किल्ला पोर्तुगीज घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे जाणून सावंतांनी त्याची मोडतोड करून तो निकामी करून टाकला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment