ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ६ मे इ.स.१४५२
सेंट झेविअर गोव्यात आला!
व त्याने इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. येशू ख्रिस्ताच्या निर्वाणानंतर त्यांच्या काही शिष्यांनी युरोपात स्थलांतर केले व युरोप मध्ये आपला धर्म वाढविण्याचा प्रयत्न चालू केला. 'ज्यू लोकांना बाटविण्यासाठी त्यांचा छळ करणे इ. गोष्टी इटली, जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगाल ह्या देशांमध्ये सुरू झाल्या. पुढे या गोष्टी पोर्तुगालमधून हिंदुस्थान व गोव्यात आल्या. हे करताना ज्यू लोक जे नवख्रिश्चन झाले ते त्या धर्माचे आचरण व्यवस्थित करतात की नाही. याचा शोध घेण्यासाठी ते न करणारांस शिक्षा देण्यासाठी ख्रिस्ती धर्मगुरू ९ वा ग्रेगरी पोप याने इ.स.१२३९ मध्ये इक्विझिशन (पवित्र न्यायसभा) स्थापन केले आणि त्यांच्या द्वारे लोकांचा अनन्वित छळ सुरू झाला. त्यातील काही नवख्रिश्चन ज्यू गोव्यात आले. गोव्यातही बाटवाबाटवीने नवख्रिश्चन झाले होते. त्या नवख्रिश्चनांना शिकविण्यासाठी सेंट झेविअर गोव्यात आला, ती तारीख होती, ६ मे इ.स.१४५२. आणि त्याने गोव्यात इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. "पेतरोज" हा इतिहासकार म्हणतो. ६ मे इ.स.१४५२ हा दिवस गोव्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस. या दिवशी सेंट झेविअरचे पाय गोव्यास लागले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१६३२
शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजी राजांना पराभूत करण्याबद्दल तह झाला शहाजहान व अदिलशहा यांच्यामध्ये १ महत्त्वाचा तह झाला, हा "तह" दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा होता व यामध्ये २ "कलम" होते. एका कलमाप्रमाणे 'अदिलशहा हा 'शहाजहानचा' मांडलीक झाला. दुसर्या कलमाप्रमाणे 'निजामशाही' संपवून ते राज्य 'मुघल' व 'अदिलशहा' यांनी वाटून घेण्याचे ठरले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१६३६
आदिलशहा व मोगल बादशहा यांच्यामध्ये तह ठरला. त्यानुसार विजापुरकरांनी दिल्लीपतीचे प्रभुत्व मान्य करावे, निजामशाहीचा मुलुख दोघांनी वाटून घ्यावा, आदिलशहाने मोगल बादशहाची सरहद्द ओलांडू नये, या तहानुसार प्राप्त झालेल्या मुलूखाचा ताबा मोगलांना बिनतक्रार घेऊ द्यावा. निजामशाहीतील पश्चिमेकडील भीमा व सीना या दोन नद्यांमधील सोलापूर परिंडा किल्ल्यासह सोलापूर व वांगणी महाल, निजामशाही कोकण, पुणे व चाकण परतणे ईशान्येकडील भालकी व चिडगुपा हे परगणे हा सर्व मुलूख मिळून (दरसाल २०, वीस लक्ष होण वसुलीचा) "विजापुरकरांकडे तर उर्वरित मोगलांकडे जोडला जावा असे ठरले. + याशिवाय राजे शहाजीराजे यांच्या निजामशाहीस मान्यता न देता त्यांनी बळकावलेले जुन्नर, त्रिंबक, भीमगड इत्यादी किल्ले ते मोगलांना जोपर्यंत परत करीत नाहीत तोपर्यंत आदिलशहाने त्यांना थारा देऊ नये. अथवा आपल्या नोकरीत ठेऊ नये. आल्यास कैद करावे असेही एक कलम तहात होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१६६५
पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१६८८
(वैशाख वद्य प्रतिपदा, शके १६१०, विभव संवत्सर, वार रविवार)
शहजादा अकबरासंदर्भात इंग्रजांचे पत्र !
शहजादा अकबराने इराणला जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जहाजांची वगैरे सर्व तयारी होऊन, राजापुराहून ती येईपर्यंत व इराणच्या शहाचे फर्मान मिळेपर्यंत तो भडोचला सुरक्षित राहीला. पुढे राजापुरच्या फ्रेंच व व वेंगुर्ल्याच्या डच व्यापाऱ्यांकडून जहाजाची योजना करून दिल्यानंतर शहजादा अकबर इराणला गेला. शहजादा अकबराचा उद्देश सफल झाल्यासारखा होता कारण इराणच्या शहाने त्याला मदत केली. त्या संदर्भात एक पत्र उपलब्ध असून त्या पत्रानुसार जर सुलतान अकबराला ६० हजार स्वारांची केलेली मदत पुरली नाही, तर इराणच्या शहा त्याच्या पाठोपाठ मोठे सैन्य घेऊन निघणार आहे. इराणच्या शहाने शहजादा अकबराला दिल्ली तख्तावर स्थापन करण्याचे दाढीची शपथ घेऊन वचन दिले आहे. या आशयाचे हे पत्र आहे. अशा पत्रातून शहजादा अकबराच्या इ.स.१६८८ रोजी नंतरच्या हालचालींवर प्रकाश पडतो.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१८१८
राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१९२२
राजातील माणुस आणी माणसातील राजा लोकराजा "राजश्री छत्रपती शाहू महाराज" यांचे निधन झाले. महाराजांनी बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यास भर दिला, कोल्हापुर संस्थानात "प्राथमिक शिक्षण" सक्तीचे व मोफत केले, "स्त्री शिक्षणाचा" प्रसार व्हावा म्हणुन "राजज्ञा काढली व बहूजनंना "राजकिय निर्णय प्रक्रियेत" सामावुन घेण्यासाठी 'डेक्कन रयत असोशियन' संस्था स्थापन केली. इ.स.१९१७ मध्ये विधवांसाठी 'पुर्नविवाहाचा' कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अशाप्रकारे "शाहूंनी" समाजात महत्वाचे अनेक बदल घडवून आणले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment