ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
📜 २८ मे इ.स.१६६४
(ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार शनिवार)
सिंहगडावरील निकामी हल्ल्यानंतर हताश होउन जसवंतसिंह वेढा उठवून औरंगाबादला परतला. नोवेम्बर १६६३ पासून तो सिंहगड किल्ल्यास वेढा घालून बसला होता. ५ एप्रिल १६६३ रोजी सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा घातला. 'चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला. मात्र त्याने जसवंतसिंह यांस सिंहगड किल्ल्या जिंकायची आज्ञा केली होती.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ मे इ.स.१६७४
हेन्री ऑक्झेंडनने निराजीपंतांचा नजराणे देण्याबद्दल सल्ला घेतला. "मोरोपंतांकडे स्वतः जावे व इतरांकडे नारायण शेणवी मार्फत नजराणे पोहोचवावेत". "मोरोपंतांना २ पामऱ्या योग्य नसून ४ पाम दिल्या पाहिजेत. दत्ताजीपंत वाकेनिवीस (Public Intelligence) यांस १२५ रुपये, एक अंगठी, डबीर किंवा फारसी लेखकाला ४ पामऱ्या, शामजी नाईक मुद्राधिकारी (Samgee Naikee Keeper of the Seal) यांस व आबाजी पंडित यांस प्रत्येकी ४ पामऱ्या दिल्या म्हणजे काम त्वरेने होईल. प्रल्हाद निराजीपंत यांना बरोबर घेऊन मी मोरोपंतांस नजराणा दिला". हेन्री ऑक्झेंडनने आपल्या रोजनिशीत असे वर्णन करून ठेवले आहे.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ मे इ.स.१६७७
महाराजांबद्दल पोर्तुगिजांच्या वसई प्रांताच्या कॅप्टन जनरल मानुएल लोबू द सिल्हैरा याने पाठविलेले बोलके पत्र!
"दमनचे कॅप्टन मानुएल फुर्ताद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी संदर्भ लावून कोळी राजास शासन करण्याची त्याला विनंती केली. त्या विनंतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आमची जी बोलणी झाली त्यास अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांनी कोळी राजाच्या राज्यात इ.स.१६७२ रोजीच्या एप्रिल अथवा मे महिन्यात सैन्य घुसविले". "छत्रपती शिवाजी महाराजांचा चौथवर दावा आहे. परंतु ते आमचे शेजारी असून देखील आमच्या प्रदेशात त्यांनी चोऱ्यामाऱ्या किंवा आक्रमणाचे प्रकार केलेले नाहीत. इतकेच नव्हे तर चौतियाच्या राजाप्रमाणे त्यांनी खिंडी आणि रस्ते रोखून चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त केला आहे. त्यामुळे त्यांना चौथचा कर देण्यास हरकत नसावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोळी राजा आणि चौतिया राजा या दोघांनाही गप्प बसविले आहे, इतकेच नव्हे तर बलसाड पोवेतो मोगल प्रदेशात पाचर मारली आहे. ते श्रीमंत आणि बलाढ्य आहेत. त्यामुळे त्यांना चौथचा कर देण्यास हरकत नसावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोळी राजा आणि चौतिया राजा या दोघांनाही गप्प बसविले आहे, इतकेच नव्हे तर बलसाड पोवेतो मोगल प्रदेशात पाचर मारली आहे. ते श्रीमंत आणि बलाढ्य आहेत. त्यांच्या सामर्थ्याच्या मानाने आमचे सामर्थ्य मर्यादित आहे. आमचा आधिकार शहर आणि किल्ला या पलीकडे जात नसल्याने आम्हाला सगळीकडे धावाधाव करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडचा सर्व प्रदेश घेतला तर आश्चर्य करण्याचे कारण नाही. * ते ज्याअर्थी आमची कोणतीच नुकसानी करीत नाहीत त्याअर्थी त्यांना चौथचा कर देण्यास हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आमच्याकडे जीवनोपयोगी वस्तूंची मागणी करीत आहे. ते या शहराचा आणि किल्ल्याचा प्रामाणिक मीत्र असल्याने त्यांना थोडे धान्य पुरविण्यास हरकत नसावी. नाही तरी मागच्या काळात आपण खंबायत, सुरत वगैरे बंदरांना जीवनोपयोगी वस्तू विकत होतोच. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी भाताची जी मागणी केली आहे ती आमची परीक्षा पहाण्यासाठी की काय न कळे". महाराजांना पोर्तुगीज कसे वचकून होते, ते, व त्यांच्याशी संघर्षाचे प्रसंग उदभवले असता ते कसे टाळीत होते, या घटनांवरून सिद्ध होते.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ मे इ. स. १६८०
छत्रपतीसंभाजी महाराजांनी मुरगुडच्या रुद्रप्पा देसाई यांस दुसरे पत्र लिहिल्याची नोंद ! यापूर्वी वैशाख वद्य ४, चतुर्थी, शके १६०२, म्हणजेच ७ मे इ.स.१६८० छत्रपती संभाजी महाराजांनी मुरगुडच्या रुद्रप्पा देसाई यांस पहिले पत्र लिहिले होते. त्या पत्रावर छत्रपती संभाजी महाराजांची षोडशावली मुद्रा दिसून येते.
● श्री शंभो: शिव। जातस्य मुद्राद्यौ। रिव राजते यदं। कसे विनो लेखा। वर्तते कस्यनो। परि।
छत्रपती संभाजी महाराजांच्या काही सनदांवरून कळून येते.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ मे इ.स. १६८७
गोवळकोंड्याचा वेढा चालू असताना 'शेख निजाम' नावाचा एक सरदार औरंगजेबास येऊन मिळाला. बादशहाने लगेच त्यास ६००० मनसब व 'मुकरबखान' किताब दिला.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ मे इ.स.१७०१
शहाजादा मुइजुद्दीने इ.स.१६९२ ला पन्हाळा गडाला वेढा घातला होता पण तो ८ मार्च १६९४ रोजी वेढा सोडून निघाला होता. हे समजल्याबरोबर बादशहाने शहाजादा आजमचा मुलगा बेदारबख्त, यास पन्हाळ्याच्या वेढ्यासाठी पाठविले. तरीही मोगलांस पन्हाळा किल्ला काबीज करणे जमले नाही. म्हणून औरंगजेब बादशहाने पन्हाळ्याचा मराठा किल्लेदार परशुराम त्रिंबक यांस ३१ ऑक्टोबर १६९९त पत्र लिहिले, “किल्ला हवाली केल्यास आमच्याकडून मोठी मनसब मिळेल न ऐकिल्यास तुम्हास व तुमच्या कुटुंबांतील लहानथोर बायकामुलांस पकडून ठार मारण्यात येईल.” ह्या पत्रास किल्लेदार त्रिंबक यांनी भीक घातली नाही. पन्हाळ्याला घातलेला मोगल वेढा चालूच राहिला. तो चालू असता धनाजी जाधवांनी बाहेरून मोगलांचा अतिशय उच्छेद केला. ता. २१ जानेवारी १७०१ रोजी धनाजी जाधवांची व समस्त मोगल फौजेची पन्हाळ्याचे जवळ मोठी लढाई झाली. तशाच आणखी लढाया वारंवार चालूच होत्या. शेवटी २८ मे १७०१ रोजी बादशहाने तर्बियत खानातर्फे किल्लेदारास द्रव्य ५५ हजार रुपये देऊन किल्ला आपलासा केला. याच बरोबर पावनगड पण मोगलांच्या घश्यात गेला. पन्हाळ्यास बादशहाने नबीशाहदुर्ग व पावनगडास बानीशाह दुर्ग अशी नावे दिली. पन्हाळगड पुढे सन १७०५ साली मराठ्यांकडे आला. त्यानंतर महाराणी ताराबाई व शिवाजी राजे यांचे वास्तव्य तिथे झाले.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ मे इ.स.१७७४
दि. १८ एप्रिल १७७४ रोजी पुरंदरगडावर सवाई माधवरावांचा जन्म झाला आणि वैशाख वद्य तृतीया शके १६९६, जयनाम संवत्सरी शनिवारी म्हणजेच दि. २८ मे १७७४ रोजी माधवरावांना कवळ्या वयात म्हणजेच अवघ्या ४० दिवसांत पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. इतक्या लहान वयात राज्यकारभाराच्या उच्चस्थानी बसलेली ही जगातील एकमेव व्यक्ती होती. आणि या नव्या बाळ माधवरावांनी नवी उपाधी धारण केली- 'सवाई माधवराव'!! आता सवाई माधवरावांच्या नावाने कारभार उघडपणे सुरू झाला होता.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment