ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष



⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 १ जून इ.स.१६७३
शिवकवी कविराज भूषण यांनी शिवभूषण लिहून पूर्ण केला
उत्तर प्रदेशातील त्रिविक्रमपूर या गावातून कविराज भूषण रायगडावर आले. वडीलांचे नाव रत्नाकर उर्फ रतिनाथ होते. त्याला चितांमणी, मतिराम, नीलकंठ असे तीन भाऊ होते.
भूषणाचे त्रिविक्रमपूर गाव बिरबलाच्या अकबरपुरजवळ यमुना तीरावर आहे. भूषण समकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात होते याचा खात्री "शिवभूषण "मध्ये लिहिले आहे ते असे-
समत सत्रहसे तीस पर सुचि वदि तेरसि भानु।
भूषण सिवभूषन कियौ पढौ सकल सुज्ञान।।
१ जून १६७३ रविवार शिवभूषण लिहून पूर्ण केल्याची उल्लेख आहे.
शिवभूषण या काव्यातील शेवटचा उल्लेख कोंडाजी फर्जद यांना पन्हाळा जिंकल्यावरचे आहे, भूषणाने सदर शिवभुषण मध्य सुरुवातीला स्वतबदली माहिती दिली आहे. काव्यानायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशाची माहिती दिले आहे ज्या स्थळी ग्रंथरचना झाली त्या रायगडाची माहिती दिली आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ जून इ.स.१६७४
(ज्येष्ठ शुद्ध अष्टमी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार सोमवार)

किल्ले रायगडाला लागले राज्याभिषेकाचे वेध!
या दिवसापासून किल्ले रायगडाला राज्याभिषेकाची चाहूल लागली होती. किल्ले रायगड पाहुण्या रावळ्यांनी भरून गेला होता. आजच्या दिवशी, ग्रह-यज्ञ, नक्षत्रहोम, दानधर्म व शेवटी ब्राम्हण - भोजन हे कार्यक्रम पार पाडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ जून इ.स.१६८१
रायगडाच्या उत्तरेस पंचवीस मैलांवर नागोठाण्याजवळ अंबा नदीच्या काठी पाली येथे शहजाद्यास त्यांनी आणून किल्ल्याच्या पायथ्याशी एक घर मोकळे करून दिले. तेव्हा अकबरासोबत ४०० घोडेस्वार, थोडे पायदळ, ५० उंट ओझ्याचे सामान घेऊन संभाजी राजांचा पाहुणचार घेऊ लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ जून इ.स.१७५२
इ.स. १७५२ मध्ये पंजाबात अब्दाली आला. त्याचे पारिपत्य करण्याकरिता शिंदे-होळकरांच्या फौजा कराराप्रमाणे वजीराच्या फौजेसुद्धा दिल्लीस आल्या. तोपर्यंत अब्दाली पंजाबातून माघारा गेला होता. तरीपण मराठे दिल्लीत आलेले पाहून बादशहा उभयता सरदारांवर खूष झाला. त्याने बावीस सुभ्यांची चौथाईची सनद मराठ्यास दिली (१ जून १७५२) या सनदेमुळे मराठ्यांच्या ताब्यात सबंध हिंदुस्थान आला. मराठ्यांची जबाबदारी वाढली. बावीस सुभ्यातून हक्काने चौथाई वसुलीकरिता मराठ्यास फिरावे लागले. वर सांगितल्याप्रमाणे नुसते फिरून व मागून चौथाई वसूल मिळण्याचा त्यावेळचा काळ नव्हता. त्याकरिता बळाचा उपयोग करावा लागत असे व त्यामुळे ससैन्य मुलूखगिरी करावी लागे. आता, ही मुलूखगिरी म्हणजे, चौथाई वसूली ह्या २२ सुभ्यात करीत असता त्या ठिकाणचे राजेरजवाडे किंवा जमीनदार जर मराठ्यांना सरळ बोलाने वसूल न देता नाकारू लागले, तर त्याजकडून जबरदस्तीने म्हणजेच लढाई करून चौथाई रक्कम वसूल करावी लागे. मात्र लढाई झालीच तर, पूर्वीची ठरलेली चौथाई खंडणी व लढाईचा खर्च एवढी रक्कम मराठे त्या राजाकडे मागत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ जून इ.स.१७९०
शके १७१२ जेष्ठ व. ४ रोजी म्हैसूर च्या टिपूचा पराभव करण्यासाठी मराठे, निजाम व इंग्रज या त्रिवर्गांने मोठा तह केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments