ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २० एप्रिल इ.स.१६६५
रात्रीच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरावर कुमक पाठवली. यावेळेस पुरंदर दिलेरखान व मिर्झा राजाविरूध्द झुंजत होता. मुघलांच्या नकळत मराठ्यांची एक नवीन तुकडी केदार दरवाजाने पुरंदरावर पोहचली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध द्वितीया, शके १६०२, संवत्सर रौद्र, वार मंगळवार)
मोगलांकडून सुरतकर इंग्रजांस उपद्रव !
मोगलांनी सुरत येथील इंग्रज, डच आणि पोर्तुगीज व्यापारी लोकांना उपद्रव देण्यास सुरुवात केली. सर्व रयतेप्रमाणे इंग्रजांनीही साडेतीन टक्के कर द्यावा असे मोगली फर्मान आल्याने या सर्वांचे वार्षिक २० हजारचे नुकसान होऊ लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० एप्रिल इ.स.१६८४
औरंगजेबाने शहजादा मुअज्जम व राहुल्लाखान यांच्यासाठी सरंजाम पाठविला. औरंगजेब बादशहाने राहुल्लाखान आणि शहजादा मुअज्जम यांच्यासाठी २०, हजार अश्रफ्या, १०० घोडे, ५०० उंट, २५ खेचरे, व इतर सरदारांसाठी हत्ती, घोडे, जवाहीर आणि खिल्लतीच्या वस्तू पाठविल्या. शहजादा मुअज्जमकडे रवाना झाला. व ताज्या दमाची फौज घेऊन राहुल्लाखान बहादुरखान हासुद्धा औरंगजेब बादशहाच्या हुकुमाप्रमाणे विजापुर जवळील ३५ मैलांवरील (सुमारे ५६, कि. मी. वरील) इंडी या मुक्कामी थांबला. त्याने शहजादा आज्जमला लागणारा सरंजाम दिला. शके १६०६, रक्ताक्षी संवत्सर वैशाख मासी शहाआलम विजापुर जवळ शेक्स म्हणून गाव आहे तेथे बैसला. अशी जेधे शकावलीतील नोंद सापडते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० एप्रिल इ.स.१७४०
रावेरखेडी (सध्या मध्यप्रदेश येथे) मुक्कामी थोरले बाजीराव पेशवे यांची प्रकृति बिघडली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० एप्रिल इ.स.१७७५
नारो शंकर यांचे पुत्र "रघुपंत नारायण" यांचा पेशव्यांतर्फे 'जहागिरी' देऊन सत्कार करण्यात आला, नारो शंकर यांचा जानेवारी १७७५ मध्ये मृत्यू झाला व त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला 'जहागिरी' दिली गेली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments
Post a Comment