ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 २१ एप्रिल इ.स.१६५६
वीर मुरारबाजी देशपांडे स्वराज्यात दाखल!
१६५६ मधे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्‍यांच्या तुर्‍यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते –मुरारबाजी देशपांडे महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. मुरारबाजी देशपांडे हे सुरूवातीला जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांकडे काम करायचे.शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरूद्ध तिखट तरवार चालवली. एक पाऊलही पूढे सरकू देईनात. महाराजांनी मुरारबाजींमधील कतृत्व जाणले आणि त्यांना गोड शब्दात बोलून आपलेसे केले. तेव्हा पासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले. पुरंदरावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलेसे करण्यासाठी दिलेरखानाने मुरारबाजींना जहागिरीचे अमीश दाखवले पण मुरारबाजींनी त्या जहागिरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चरित्राची समीधा सोडून आत्मार्पण केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २१ एप्रिल इ.स.१६६८
(वैशाख वद्य पंचमी, शके १५९०, संवत्सर किलक, वार मंगळवार)

छत्रपती शिवाजी महाराजांनी विठोजी हैबतरावांस अभय दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २१ एप्रिल इ.स.१६७२
बहामनी राज्याच्या पाच शाह्या झाल्यावर कुत्बशाहीची स्वतंत्र सल्तनत इ. स. १५१२त सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संपादनास सुरूवात केली त्यावेळी अब्दुल्ला कुत्बशहा राज्य करीत होता. तो २१ एप्रिल १६७२ रोजी निवर्तला. त्याच्यानंतर अबुल हसन ऊर्फ तानाशहा कुत्बशहा झाला. त्याने इ. स. १६७५ च्या अखेरीस मुसाफरखानास दिवाण पदावरून दूर केले. त्यावेळी राज्याचा सर्व कारभार मादण्णाकडे आला. मादण्णा व त्याचा भाऊ आकण्णा यांनी कर्नाटकाची व्यवस्था लाविली. छत्रपती बशिवाजी महाराजांची भेट तानाशहाशी घडवून आणिली. हिंदू-मुसलमान धर्म भेदास गौणत्व देऊन जीवनात समरस झालेल्या सर्व दक्षिणियांस संघटित करण्याचे काम शिवाजी महाराज व तानाशहा यांनी घडवून आणिले. आदिलशाहीचा मोगल बळी घेऊ पाहताच छत्रपती संभाजी महाराजांनी शक्य ती मदत देऊन आदिलशाही मोगलांपासून वाचविण्याचा प्रयत्न केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २१ एप्रिल इ.स.१६८०
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभार कोणी पहावा हा प्रश्न साहजिकच उभा राहिला. अर्थात परंपरा आणि रितीनुसार ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांना अभिषेक करणे उचित होते. परंतु, छत्रपती संभाजीराजांच्या स्वभावाची सर्वांनाच धास्त वाटत होती. नुकतंच हे दिलेरखान प्रकरण झाल्यामुळे तर त्यांना कारभार देणे हे बहुतेकांना धोक्याचं वाटत असावं. अशातच महाराणी सोयराबाईंच्या मदतीने शेवटी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान आणि अण्णाजी दत्तोपंत सचिव यांनी वैशाख शु.३, दि. २१ एप्रिल १६८० रोजी राजारामांना मंचकावर बसवले (राज्याभिषेक केला नाही!). याचवेळी मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी यांनी छत्रपती संभाजीराजे पुन्हा बंड करू नये म्हणून त्यांना पकडण्यासाठी पन्हाळगडाकडे सैन्यासह कूच केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २१ एप्रिल इ.स.१७४३
सवाई जयसिंगानी आपले वचन बिनचूक पाळले. त्यांच्या सांगण्यावरून बादशहाने माळव्याच्या सुभेदारीच्या सनदा मराठ्यास देण्याचे ठरवून तारीख ७ सप्टेंबर १७४१ रोजी माळव्याचा संपूर्ण कारभार दिवाणी व फौजदारीसुद्धा पेशव्यांचे हवाली केल्याचे फर्मान बादशहाने काढिले. त्या फर्मानात बादशहाने माळव्याची सुभेदारी शहाजादा अहमद ह्याचे नांवे करून पेशव्यास त्याची नायब सुभेदारी देण्यात आली. ह्यासंबंधी बादशहा व पेशव्यांमध्ये जो करार झाला त्या करारास जामीन म्हणून राणोजी शिंदे, मल्हारराव
होळकर, यशवंतराव पवार व पिलाजी जाधव यांजकडून बादशहाने तारीख २१ एप्रिल १७४३ रोजी कबुलायत लिहून घेतली. मराठ्यांना हे फर्मान मिळाल्यावर माळवा, बुंदेलखंड यातील लहान मोठ्या सत्ताधिशांचे पूर्वीचे बादशहाशी असलेले संबंध तुटून त्याची पुनर्घटना पुण्यास होऊ लागली. खुद्द जयपूरवाले मराठ्यांच्या छायेत आले. उत्तर हिंदुस्तानात मराठ्यांची सत्ता स्थिरावण्यास माळव्याचा ताबा मराठ्यास मिळणे आवश्यक होते. ते मराठ्यांनी साधल्यामुळे इथून मराठ्यांना उत्तरेत हातपाय पसरणे सोपे गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २१ एप्रिल इ.स.१७७९
सवाई माधवराव पेशवे यांची पुण्यामधील पर्वती येथे मुंज संपन्न.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments