ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 ७ एप्रिल इ.स.१६३३
फतेहखान देवगिरी किल्ल्यामधून मुघलांवर छुपे हल्ले करत होता. ७ एप्रिल १६३३ ला त्याने मुघलांवर छापा मारण्यासाठी त्याची टोळी धाडली. पण मुघलांनी त्यांना परतवून लावले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ७ एप्रिल इ.स.१६७७
छत्रपती शिवराय श्रीशैल्यम येथे पोहोचले. महाराजांनी नीळगंगेचे स्नान करून श्रींचे दर्शन घेतले. नीळगंगेचे स्थळ वायव्येकडून जेथे कृष्णेला उतार आहे तेथे होते. चैत्री पौर्णिमेस श्रीशैलास यात्रा भरते. महाराज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या क्षेत्री आले ते बहुधा चैत्री पोर्णिमेचा मुहुर्त साधुनच आले असावेत. महाराज श्रीशैलम येथे पोहोचले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ७ एप्रिल इ.स.१६८७
(वैशाख शुद्ध ५, पंचमी, शके १६०९, प्रभव संवत्सर, वार गुरुवार)
स्वराज्याचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांची राजाज्ञा!
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांनी पुरंदरचे किल्लेदार बाजी घोलप यांना राजाज्ञा केली की किल्ले पुरंदरावरील पुरंदरेश्वर व केदारेश्वर यांचा अभिषेक अनुक्रमे नारायण भट व शिव भट करतील या कामी इतर कोणाची ढवळाढवळ न करणे. या कामी स्वामिंची सनद लवकरच पाठविली जाईल या आशयाची आज्ञा केली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ७ एप्रिल इ.स.१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्वच किल्ल्यांची तोडफोड केली, यात ७ एप्रिल रोजी देवगड विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments
Post a Comment