ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 ८ एप्रिल इ.स.१६५७
महाराजांचा जाधवराव घराण्यातील काशीबाईसाहेब यांच्याबरोबर विवाह! छत्रपती शिवाजी महाराजांनी मातब्बर घराण्यांबरोबर तत्कालीन रुढीनुसार सोयरीक संबंध करून त्यांचीही स्वराज्याशी बांधिलकी तयार केली. जाधवरावांच्या घराण्यातील काशीबाईसाहेब यांचा महाराजांच्या बरोबर विवाह झाला आणि आणखी एक घराणे स्वराज्याशी जोडले गेले!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ एप्रिल १६६६
छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून औरंगाबादला पळून गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ एप्रिल इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांचर सर सेनापती प्रतापराव गुजर यांना २३ फेब्रुवारी १६७४ रोजी वीरमरण आल्यानंतर थोड्याच दिवसात दिनांक ८ एप्रिल १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांकडून हंसाजी मोहिते तळबीडकर यांना "हंबीरराव” या किताबतीसह "सरनौबतकीची” वस्त्रे दिली गेली. हंसाजी मोहिते सरनौबत (सरसेनापती) हंबीरराव मोहिते झाले. त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने तसचे निष्ठावंता प्रमाणे हिंदवी स्वराज्याची सेवा केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ एप्रिल इ.स.१६७६
मार्च अखेरीस मराठ्यांनी कोल्हापूर जिंकले. महाराज कुडाळहून फोंड्यास गेले आणि फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला (८ एप्रिल). फोंड्याचा किल्लेदार महमदखान हा शर्तीने किल्ला लढवीत होता. त्याला जवळचे पोर्तुगीज गुप्तपणे मदत करीत होते. मराठ्यांनी ही मदत पकडली आणि पोर्तुगिजांस त्याबद्दल जाब विचारला, तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले. आमचा ह्या मालाशी संबंध नाही असा जबाब त्यांनी दिला. विजापुराहून बहलोलखान फोंड्याच्या मदतीस १५ हजार फौज घेऊन येत होता. तो मिरजेस आल्यावर त्याच्या वाटेत मोठमोठी झाडे पाडुन महाराजांनी त्यास मिरजेतच गप्प बसविले. मराठी फौजा कार्यरत राहिल्या. त्या फौंड्यांत घुसल्या. त्यांनी विजापूर फौजेची कत्तल केली. पुढे किल्लेदार महमदखान यास कैद करून फोंडा किल्ला ६ मे रोजी हिरवी स्वराज्यात सामील झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ एप्रिल १६७८
दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ एप्रिल १६८३
मराठा सरदार आनंदराव धुळुप यांनी इंग्रजांच्या आरमाराविरूद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ एप्रिल इ.स.१७०३
सिंहगडाच्या तटबंदीवर तोफांची मारगिरी मोगलांनी केली. पण किल्ला तोफांच्या मारगिरीने हस्तगत होईल असे मोगलांना वाटत नव्हते. तेव्हा तरबियतखानाने मराठा शिबंदीशी वाटाघाटी केल्या. भली मोठी रक्कम किल्लेदारास दिल्यावर किल्ला ८ एप्रिल १७०३ रोजी मोगलांचे ताब्यात आला. त्या किल्ल्याचे नाव बाख्शीदाबखा (ईश्वरदत्त) असे ठेविले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ एप्रिल इ.स.१८५७
क्रांतिकारी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा ब्रिटिशांवर इतका जबर्दस्त प्रभाव पडला होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे’ याच नावाने संबोधू लागले होते.
बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments