ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 १५ मे इ.स.१६६५
(ज्येष्ठ शुद्ध एकादशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार सोमवार)

मुरारबाजी देशपांडे दिलेरखानाशी भिडले.
किल्ले पुरंदरावर मुरारबाजी व दिलेरखानाची मोठी चकमक झाली. मुरारबाजी देशपांडे भिडले ते थेट दिलेरखानाशीच मुरारबाजीचा पराक्रम पाहून दिलेरखान बोलला. "या खुदा तुमने ये कैसा मर्द सिपाई पैदा किया". खानाने कौल देऊन मुरारबाजीस स्वतःकडे येण्यास सांगितले पण मुरारबाजींनी दिलेरचा कौल घेतला नाही उलट ते म्हणाले 'कोण रे तू... काय तुझा कौल... मी, महाराजांचा मावळा... तुझा कौल घेतो की काय?'
त्यानंतर दिलेरखान व मुरारबाजीची कडोविकडीची चकमक झाली. मुरारबाजी देशपांडे मैदानात काही केल्या आवरत नव्हते. शेवटी अंबारीत बसलेल्या दिलेरखानाने बाणाने टीपून महापराक्रमी मुरारबाजींचा कंठछेद केला. त्यात मुरारबाजी धारातीर्थी पडले. त्याचबरोबर "चिव्हेवाडी" येथील किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या गावातील ३००, तीनशे मावळे एकाच वेळी लढून धारातीर्थी पडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜१५ मे इ.स.१६६६
रामसिंगाने जामीनाबाबत शिवाजीराजांना सांगितले. १५ मे रोजी सकाळीच शिवाजीमहाराज शुचिर्भूत होऊन रामसिंगाच्या डेऱ्यात आले आणि महादेवाची पूजा करून त्यांनी त्यावरील बेल-तुळशी हातात घेऊन रामसिंगाला वचन दिले की, 'मी आग्रा सोडून जाणार नाही किंवा काही बिघाडही करणार नाही!'
त्याप्रमाणे रामसिंगाने त्याच्या लेखनिकास जामीनपत्र लिहिण्यास सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळच्या दरबारात हे जामीनपत्र घेऊन रामसिंग गेला. घुसलखान्यात त्याने ते मीरबक्षी अमीनखानाच्या स्वाधीन केले. अमीनखानाने ते औरंगजेब बादशहाला सुपूर्द केले.
यामुळे आता शिवाजीमहाराज रामसिंगाच्या नैतिक बंधनात अडकले. जोपर्यंत हा जामीन कायम होता तोपर्यंत काही शिवाजीराजे आग्र्यातुन सुटणार नव्हते. औरंगजेबाने धुर्तपणे ही खेळी केली. शस्त्र न चालवता, शह काटशह, डाव प्रतिडाव खेळण्यास दोन्ही बाजुंनी सुरुवात झाली होती.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜१५ मे इ.स.१७३१
छत्रपती शाहूराजे (सातारा गादी) तळेगाव-दाभाडे येथे जाऊन त्र्यंबक दाभाडे यांच्या मातोश्रींचे सात्वन करण्यासाठी त्यांस भेटले. दाभाडे हे पेशवे थोरल्या बाजीरावांच्या हातून लढाईमध्ये मारले गेले होते.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜१५ मे इ.स.१७३७
मनोर (अशेरीगड) किल्ल्याला वेढा
मराठ्यांनी तांदुळवाडी किल्ला जिंकल्यानंतर लगेच आपली विजयी घोडदौड मनोरच्या दिशेने निघाली, बरबाजी तपकीर, आवजी कवडे, विठ्ठल विश्वनाथ या धारकऱ्यांनी, १५ मे १७३७ मध्ये मनोर किल्ल्याला वेढा दिला आणि मदतीस नरवीर चिमाजी अप्पांनी, होनाजी बलकवडे या सरदारास पाठविले, आणि २९ मे १७३७ विजय मिळवला, पण पोर्तुगीजांची शिबाडे मनोरच्या मदतीस आली पण मराठ्यांच्या विजयाच्या धुंदी पुढे पोर्तुगीजांना पळ काढावा लागला...

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜१५ मे इ.स.१७३७
पोर्तुगीजांनी किल्ले धारावीवर जोरदार हल्ला केला
मराठा सरदारांच्या या अभिप्रायानंतर चिमाजीअप्पांच्या फौजेने त्वरीत सन १७३७ च्या मध्यात "धारावी" हे ठाणे हस्तगत केले.
"नारायणजी नाईक व गोपाळजी व पाचशे मनुष्ये धारावीस जाऊन बसली."
धारावी मराठ्यांनी घेतली हे कळताच पोर्तुगीजांनी दिनांक १५ मे सन १७३७ रोजी आठशे सैन्यासह जोरदार हल्ला केला. वर नमुद केल्यानुसार वसई हे समोरच असल्याने पोर्तुगीजांना रसद पुरवठ्यास कोणताच अडथळा आला नाही. मराठ्यांनी जोरदार प्रतीकार केला परंतु अखेर मराठ्यांना माघार घ्यावी लागली. या समरात अणजूरकर नाईकांनी मोठा पराक्रम केला. मात्र अणजूरकरांकडील लोक मोठ्यासंख्येने धारातिर्थी पडले. मराठ्यांनी माघार घेतली परंतु ते जवळपासच्याच भागात दडून राहीले

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜१५ मे इ.स.१८६९
कोल्हापूरच्या चिमाजी महाराजांची समाधी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आहे. १८५७ चा उठाव कोल्हापूर संस्थानात देखील झाला होता त्या उठावाचे हिरो होते कोल्हापुरचे महाराज चिमासाहेब !!!
२६ डिसेंबर १८३० साली बुवासाहेब महाराज आणि आनंदीबाई यांच्या पोटी शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराजांचा जन्म झाला. तर बुवासाहेब महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी नर्मदाबाई यांच्या पोटी शाहू उर्फ चिमासाहेब महाराजांचा जन्म झाला. १५ मे १८६९ रोजी चिमासाहेबांच निधन झालं. लिहारी नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वर्षांनी स्थानिक लोकांनी तिथे महाराजांची समाधी बांधली. आजही कराचीमध्ये ती समाधी आहे. कोल्हापूरच्या रक्तात ज्यांनी क्रांतीची बीजे पेरली त्या महाराजांनी ती समाधी !!!

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments