ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 १६ मे इ.स.१६४०
(ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, शके १५६२, संवत्सर विक्रम, वार गुरुवार)

महाराज व सईबाईसाहेब यांचा विवाह !
  सईबाईसाहेब व महाराजांचा पुणे येथे लालमहाली समंत्रक विवाह संपन्न. महाराजांच्या आयुष्यात सईबाईसाहेब यांना फार वेगळे स्थान होते. सईबाईसाहेब व महाराजांचा विवाह संपन्न झाला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜  १६ मे इ.स.१६४८
छत्रपती शिवरायांनी  पहिली राजधानी राजगड
बांधकामास सुरुवात केली. १६४५-४६ दरम्यान छत्रपती शिवरायांनी तोरण्याबरोबर हा किल्ला ताब्यात घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜  १६ मे इ.स.१६४९
छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्तेखानाचा व संभाजी राजांनी (छत्रपती शिवरायांचे मोठे बंधु) फर्रादखानाचा पराभव केला. छत्रपती शिवाजी राजांनी दिल्लीच्या मोगलांशी संधान साधून विजापूरकरांवर दबाव आणला. असे नाक दाबल्यावर, विजापूरकरांनी कैद केलेल्या शहाजी राजांना रिहा करण्याचा हुकूम सोडला व त्यांची सन्मानपूर्वक सशर्त सुटका केली. त्या बदल्यात छत्रपती शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ मे इ.स.१६६५
मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण
दिलेरखानाने पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर ५००० पठाण व बहलिये यांसह सुलतानढवा केला. हा हल्ला पाहून मुरारबाजी देशपांडे यांनी ७०० चिवट मराठी वाघांसह बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून मोगलांवर चाल केली. सर्वांचा जोश आगीसारखा भडकला होता. भयंकर रणधुमाळी उडाली. मुरारबाजींचा आवेश व हल्ला असा विलक्षण होता की जणू चक्र सुदर्शन ! पठाणांची खांडोळी उडवीत मुरारबाजींची ती प्रलयकारी झुंड दिलेरखानाच्या रोखाने घोंगावत येऊ लागली. गर्दी उडाली. मुरारबाजींचा हत्यारी सपाटा म्हणजे जणू रूद्राचे संतप्त तांडवच होते. मुरारबाजींचे शौर्य पाहून दिलेरखानाची उंगली तोंडात गेली. त्याने झुंज थांबवली. तो मुरारबाजींना म्हणाला,
“अय बहादुर ! तुम्हारी बहादुरी देखकर मै निहायत खूष हुवा हुँ ! तुम हमारे साथ चलो ! हम तुम्हारी शान रखेंगे !”
पण फितुरीचे अमिष पाहताच त्या इमानी अन् अभिमानी मुरारबाजींचा संतापाने भडका उडाला. त्यांनी खुद्द खानावरच चाल केली. तेव्हा खानाने सोडलेला तीर वर्मी लागून मुरारबाजी देशपांडे रणात कोसळले. पुरंदराच्या मांडीवर मुरारबाजींनी आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले.
आठवते का ? याच मुरारबाजी देशपांड्याना ऐन रणात जावळीच्या वनात महाराजांनी मागणी घातलेली होती ? तेव्हा मोर्‍यांच्या शिरपेचातील हा तुरा महाराजांना लाभलेला होता. आज याच मुरारबाजींना दिलेर खानाने ऐन रणात फितुरीचे आमिश दाखवले. पण मुरारबाजींच्या तोंडाला पाणी सुटण्या ऐवजी त्यांच्या तरवारीलाच खानाच्या रक्तासाठी पाणी सुटले.
या लढाईत मुरारबाजींसह ३०० मराठे धारातिर्थी पडले. हे सर्व मावळे चिव्हेवाडी या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या एकाच गावातील होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ मे इ.स.१६७४
तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ मे इ.स.१६८१
शहजादा अकबर बुरहानपुरजवळून पुढे रवाना झाला. औरंगजेब बादशहाचा सुभेदार खानजहान बहादूर याने कळविले की, जमादिलावल महिन्याच्या ७ शहजादा अकबर बुरहानपुरजवळून पुढे रवाना झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ मे इ.स.१७०३
औरंगजेबाकडे अटकेत असलेले "छत्रपती संभाजीपुत्र शाहू" यांना मुस्लीम दीक्षा देण्याचा हुकुम औरंगजेबाने दिला पण आपल्या धन्याला वाचवण्यासाठी खंडेराव व जगजीवन हे दोघे गुजरबंधु मुस्लीम होण्यास तयार झाले. १६ मे च्या शुभमुहूर्तावर त्यांस मुस्लीम करून त्यांची नावे 'अब्दुरहीम' व 'अब्दुरेहमान' अशी ठेवली.

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १६ मे इ.स.१७३९
वसई मोहिम
पोर्तुगीच गव्हर्नर नो. द. कुन्या याने २० जानेवारी १५३३ ला गुजरातच्या बहादुरशहाचा सरदार मलिक तुग़लक याचा पराभव करुन वसई जिंकले. बहादुरशहाबरोबर वाटाघाटी करुन २३ डिसेंबर १५३४ ला वसई पोर्तुगिचानकड़े आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले कारन मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगिचानी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उध्वस्त कर, हिन्दू पूजा व उत्सवाना बंदी सुरु केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडली. आणि त्यानंतर १७३७ साली पेशव्यानी मोहिम सुरू केली.
३० मे १७३७ वसईवर मराठयानी पहिला हल्ला केला पण फिरंग्यानी तो परतवून लावला. त्यानंतर ९ जून, २८ जून, ४ सप्टे. १९३७ हल्ला अयशस्वी राहिला.
चिमाजी आप्पानी १९३९ च्या फेब्रुवारी ला वसईत तल ठोकला व ख-या अर्थाने लढाई सूरू झाली. अप्पांच्या कुशल नेतृत्वखाली मराठयानी जोरदार हल्ले केल्यानंतर ३० एप्रिलपासून वसईच्या शेवटास सुरवात झाली. मराठे किल्ल्यात घुसले. आखेर ४ मे १७९३ मधे फिरंग्यानी तहाचे निशान फडकावले आणि १६ मे १७३९ रोजी किल्ला मराठयांन कड़े सुपूर्द केला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments