ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 ८ मे इ.स.१६६३
(वैशाख शुद्ध द्वादशी, शके १५८५, संवत्सर शोभन, वार शुक्रवार)
     शिवरायांकडून शाहिस्त्याची बोटे तुटल्याने अख्या मोगल शाही चीं फजिती आणि संपत्तीचा चुराडा झाला, या कारणांमुळे औरंगजेब ने आपल्या मामा म्हणजे शाहिस्तेखान ला शिक्षा म्हणून बंगाल ला धाडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ मे इ.स.१६६४
अजीजखान यांनी बालाघाट उतरून सुभेदार राहुजी पंडीतांवर चालून गेला. आदिलशहाने पुन्हा महाराजांविरुद्ध हालचाल सुरू केली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विजापुराहून सेनापती अजीजखान ४ हजार घोडदळ व पायदळ घेऊन चौलपर्यंतचा मुलूख परत घेण्यासाठी कुडाळकडे निघाला. दि. ८ मे इ.स.१६६४ रोजी त्याचे सैन्य बालाघाटातून उतरून सुभेदार राहुजी पंडीतांवर चालून गेले. परंतु विजापुरी सैन्याच्या आगमनाची वार्ता कळताच राहुजी कुडाळ सोडून राजापुरला परतले व तेथे त्यांनी स्वसंरक्षणाची तयारी आरंभिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ मे इ.स.१६७०
(वैशाख वद्य चतुर्दशी, शके १५९२, संवत्सर साधारण, वार रविवार)

महाराजांनी अहमदनगर व आजुबाजूचा परिसर लुटला!
            छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडाहून निघून मोगलांची अहमदनगर, जुन्नर व परिंडा यांच्या अखत्यारीतील ५१ गावे लुटली व मोगलांना आक्रमकपणे चोख उत्तर दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

📜 ८ मे इ.स.१६८०
(वैशाख वद्य पंचमी, शके १६०२, रौद्र नाम संवत्सर, वार शनिवार)

गोव्याचा गव्हर्नर आंतोनियू पाईश द सांद यांनी कोकण प्राताचे सरसुभेदार रायाजी पंडीत यांस लिहीलेल्या पत्राची नोंद!
            छत्रपती संभाजी महाराजांनी कोकणचे सरसुभेदार म्हणून आपली निवड केल्याचे पाहून खूप समाधान झाले. "महाराजांच्या महानिर्वाणाची बातमी कळताच मी आमच्या साष्टी प्रांताचा कॅप्टन जनरलला युद्ध बंद करण्याची आज्ञा दिली. हाच प्रकार फोंड्याच्या सरहद्दीवर सुद्धा आहे. युद्ध बंदीचा एकतर्फी निर्णय आम्ही घेत असून जो राजा आता सिंहासनावर येईल त्याने आमच्याशी युद्ध चालू ठेवावे की बंद करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. भूतकाळाच्या गोष्टी विसरून जाऊन नवीन राजाशी, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

📜 ८ मे इ.स.१६८२
मराठ्यांच्या फौजेने छत्रपती शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांच्या सैन्यावर हल्ले सुरु केले अशातच शुभकरण बुन्देलाचा मुलगा दलपत बुन्देलाच्या मोर्चावर मराठ्यांनी हल्ला केला, त्यामुळे बुन्देल्याकडील अनेक माणसे मेली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 ८ मे इ.स.१६९६
सेनापती संताजी आपल्या फौजेनिशी जिंजीत दाखल.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 ८ मे इ.स.१६९९
मराठ्यांनी ८ मे १६९९ रोजी सिद्धगड काबिज केला व एक हजार पायदळ सैनिक व किल्ला चढून जाण्याची सामग्री (दोराच्या शिड्या वगैरे) माहुलीकडे पाठविली. बादशहाला हे कळताच त्याने माहुली किल्ला लढविण्याची कामगिरी कल्याण-भिवंडीचा ठाणेदार मातबरखान याजवर सोपविली. याच सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील शेगांव परगण्यांतील खेडी मराठा सरदार हणमंतराव यांनी लुटली. त्याचे पारिपत्य तेथील मोगली फौजदार इल्तिफातखान याजकडे पथके नसल्यामुळे झाले
नाही.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 ८ मे इ.स.१७०७
शाहुराजे दक्षिणेकडे निघाले.
           जुल्फीकारखानाने शाहुराजे यांची १३ मार्च इ.स.१७०७ रोजी आज्जमशहाशी (बादशहा) भेट घडविली. शहाने त्यांना पोशाख दिला. शाहु महाराजांच्या सुटकेचा हा पहिला प्रयत्न होय. आज्जमशहाचा मुक्काम ४ मे इ.स.१७०७ रोजी सिरोंचेस होता. भोपाळच्या वायव्येस "दारोहा" येथे मुक्काम असताना शाहुराजेंना त्याने सोडले. शाहुराजे यांना सरदेशमुखीचे व चौथाईचे आधिकार त्यांस दिल्याचे वचन दिले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 ८ मे इ.स.१८१७
इंग्रजांच्या फौजांनी ८ मे १८१७ रोजी सकाळी पुण्यास वेढा घातला. हे कळताच बाजीरावाने (दुसरे) इंग्रजाशी युद्ध पुकारण्याचा निश्चय केला. परंतु लागलीच इग्रजांकडे शरणागतीची याचना केली व त्रिंबकजी डेंगळेस पकडून देण्याबद्दल २ लाखाचे बक्षिस व गाव इनाम देण्याचे जाहीरनामे लावले. त्यावरच काम निभावले नाही. एलफिस्टनने बाजीरावाची भेट घेऊन नवीन तहाच्या कलमाची वाटाघाट केली. हा तह गव्हर्नर जनरलच्या हुकुमावरून पेशव्यांवर लादला गेला. त्यातील मुख्य मतलब म्हणजे महाराष्ट्राबाहेरील पेशव्यांचे ३४ लाख वसुलाचे सर्व प्रदेश इंग्रजांनी आपल्या कबजात घेतले आणि इतर मराठे सरदारांशी त्यांचा सबंध कायमचा तोडून लावला. तदनुसार बाजीरावाजवळ असलेले शिंदे, होळकर आदींचे वकिल पुण्यातून काढून बाहेर असलेले त्यांचे वकिल यास परत बोलवावे लागले.  शेवटी हो ना करता दिनांक १३ जून १८१७ रोजी पेशव्यांने ह्या तहावर मोठ्या नाखुशीने सही केली. नंतर तो गव्हर्नर जनरलकडे पाठविण्यात येऊन दिनांक ५ जुलै १८१७ रोजी मंजूर होऊन आला. ह्या तहाने बाजीरावाचे राज्य जाऊन तो एक लहानसा संस्थानिक बनला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments