ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ७ मे इ.स.१४९८
पोर्तुगीज गोव्यात आले. पाल्बाव हा पाद्री गोव्यात आला आणि त्याने बाटवाबाटवीच्या छळाचा अतिरेक केला. व त्यांनी इ.स.१९६१ रोजी पर्यंत हिंदुस्थानात चाचेगिरी निर्भयपणे केली. अल्फान्सो अल्बुकर्क याने सप्तकोटेश्वराचे देऊळ पाडून तेथे चर्च उभे केले. अनेक अन्यायकारक गोष्टी घडत गेल्या. गोव्यातील हिंदू बांधवांनी त्याला फार सोशिकपणाने तोंड दिले. पुढे पोर्तुगिजांनी वसई, ठाणे, तारापूर, वांद्रे, माहीम, मुंबई येथे सत्ता स्थापन केली. दीव घेतले. दमण घेतले. गोवा, दीव, दमण यांवर त्यांची सत्ता आली. इक्विझिशनचा छळवाद संपूर्ण जगात चालू होता.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ७ मे इ.स.१६६०
पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली. यानंतर ४ दिवस खानाचं सैन्य उपाशी होतं
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ७ मे इ.स.१६८०
राज्यभिषेकापुर्वी म्हणजेच इ.स. १६८० 'वैशाख वद्य ४ शके १६०२' च्या मुरगुडच्या 'रुद्राप्पा देसाईला' पाठवलेल्या पत्रावर ही "शोडशावली" राजमुद्रा प्रथम अाढळली.
'भोसले' घराण्यातील हि "शंभुराजांची राजमुद्रा" छत्रपती "शिवरायांच्या" मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी असुन उभी 'पिंपळपानी' ७ ओळींची हि "राजमुद्रा" स्वतःची 'अस्मिता' व 'रुबाब' व्यक्त करते.
राजमुद्रे प्रमाणे त्यांची 'मर्यादा' सुध्दा "शिवाजीराजेंच्या" मर्यादेपेक्षा एका अक्षराने वेगळी आहे.
बहुजन विकासाची आस आणि सार्वत्रिक मुरगुडच्या रूद्राप्पा देसाई यास छत्रपती शिवरायांच्या काळात ठरल्याप्रमाणे खंडणी वसुल केली जाईल असा आदेश देणारे असे हे पत्र छत्रपती संभाजीराजेंनी पाठवले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ७ मे इ.स.१८१८
पेशव्यांची शरणागती आणि प्रतापसिंह महाराजांस चिमुकले राज्य देऊन त्यांची मांडलीक राजे म्हणून स्थापना या दोन गोष्टी इंग्रजांनी १८१८ च्या युद्धाने झालेल्या मराठ्यांच्या ताब्यात असलेले मजबूत किल्ले सिंहगड, पुरंदर, वासोटा हे एप्रिल १८१८ च्या आरंभीच इंग्रजांनी जिंकले. हिंदवी स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगड प्रिटल्झरच्या स्वाधीन करण्यात आला. (दिनांक ७ मे १८१८) त्याचवेळी इ. स. १६८९ च्या मोगलाने घातलेल्या वेढ्यांतून जे काही कागदपत्रे शिल्लक होते ते इंग्रजांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यामुळे नष्ट झाले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments
Post a Comment