ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
📜 २९ मे इ.स.१६५८
औरंगजेबाला दिल्लीचे तख्त मिळवण्यासाठी दाराशुकोह याच्याशी लढाई द्यावी लागली. या रक्तरंजित युध्दात प्रत्यक्ष रणांगणात औरंगजेबाने आपला तोतया जाणून बुजुन हत्ती वर स्वतः च्या जागी बसवला होता. त्याचे नाव शेख मीर. हाच औरंगजेब म्हणून शत्रू पक्षाकडून मारला गेला. या युध्दात दाराशुकोह चा पराभव झाला आणि दिल्लीच्या राजकारण बदलून गेले. ही लढाई सामुगडची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २९ मे इ.स.१६७४
(श्रीनृपशालिवाहन शके १५९६, आनंद नाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध ४, चतुर्थी, वार शुक्रवार) महाराजांची समंत्रक मुंज!
"राजश्रींची मुंज झाली". उपनयन संस्कारामुळे महाराज आता "द्विज" झाले होते. "उत्तरेस क्षत्रियांचे व्रतबंध होतात त्याप्रमाणे व्रतबंध करावा हा विचार आधी करून भट गोसावी यांनी राजियाचा क्षेत्री व्रतबंध केला. शुद्ध क्षत्रिय आधी केला. मौजीबंधनानंतर त्याच दिवशी दुपारी म्हणजेच (यावेळी पंचमी सुरू झालेली होती.) तुलादान व तुलापुरुषदान विधी करून महाराजांनी उशीरा मुंज झाल्याबद्दल व आजवर कळत-नकळत घडलेल्या हत्यांबद्दल प्रायश्चित्त घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २९ मे इ.स.१६७४
राज्याभिषेकाच्या आधी राजेंचा तुलाविधी संपन्न ....
राजांची सुवर्णतुला २९ मे १६७४
राजांच्या तुलादान विधीला प्रारंभ झाला. उजव्या बाजूचा पाय पारड्यात उजवा पाय प्रथम ठेवून राजांनी वीरबैठक घेतली. गागाभट्ट, बाळभट्ट, अनंतभट्ट ओंजळी-ओंजळींनी तबकातील झळझळीतसुवर्णमुद्रा तुलेच्या डाव्या पारड्यात सोडू लागले.
भोसालाई सोनसूर्य वर घेण्यासाठी सोने झटू लागले.
रोखल्या नजरेने संभाजीराजे पारड्याकडे बघत होते. "उभ्या रायगडाला सोनरूप देऊन तो डाव्या पारड्यात उचलून ठेवला तरी आबासाहेबांचं पारडं फरसबंदी सोडून उठू नये! " असे त्यांना वाटत होते.
राजांनी विरासनी बैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडून उचलले गेले.
राजांची सुवर्णतुला झाली. मंत्राचा घोषच घोष उठला. सतरा हजार तोलाल्या मोहरा तबकात उतरून त्यावर गागाभट्टानी मंत्रित फुले ठेवली. चांदी, तांबे, कापूर, शिसे, फळे, मध, मसाले, साखर अशा राजांच्या आखणीपंधरा तुला राजबैठकीत जोखण्यातआल्या
थोरल्या राजांची तुला झाली आता वेळ होती ती धाकल्या धन्याची.
गागाभट्टाने दिलेली फुलं तुलेवर वाहून वंदन करीत उजवा पाय उजव्या पारड्यात टाकून वीरबैठक घेतली. मंत्रांचे घोष उठू लागले सोनमोहरांच्या ओंजळीडाव्या पारड्यात पडू लागल्या. खणखणत पारड्यात उतरणाऱ्या मोहरा बघताना विचारांची एक ओंजळ कुठूनतरी संभाजी राजांच्या मनाच्या पारड्यात सोडली गेली.-
"आमच्या मासाहेब इथं येतील आणि 'शंभुबाळ' म्हणत शिवलिंगाला नेहमी वाहतात त्यांतील एकच बिल्वपान त्या पारड्यात सोडून आमच्याकडं बघतील तर आमचं पारडं हां हां म्हणता आभाळाला जाऊन थडकेल !!
आता संभाजीराजांनी वीरबैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडू लागले होते. मनात माजलेला काहूरकुठेतरी नाहीसा होत शंभूराजे भानावर आले. त्यानंतर थोरली राणीसाहेब सोयराबाई साहेब यांची सुवर्णतुला पार पडली.
ज्यांच्या शिकवणुकीमुळेच शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे स्वराज्य उभे राहिले ते थकलेले डोळे हा सोहळा आपल्या काळजात साठवत होते अन् मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात आपल्या कुकवाची आठवण काढत पाणी गाळत होते. कारण स्वराज्यसंकल्पक तर खरे शहाजी राजेच होतेना.....
राजांची तुला करण्यासाठी १६०००होन लागले हे हेन्री ओक्झेंडनने नमूद करून ठेवले आहे तर वेंगुर्लेकर डचांच्या वृत्तांतात मात्र १७००० होन लागल्याची नोंद आहे. राजांची सुवर्णतुला झाली तो दिवस होता. २९ मे १६७४.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २९ मे इ.स.१६८०
(ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार शनिवार)
पोर्तुगीज आधिकारी व्हिसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांना पाठविलेल्या पत्राची नोंद !
तो म्हणतो की, "आपले पिताश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता कळली. आम्हास फार दुःख झाले. मृत्यू कोणालाच चुकत नाही. दैवी इच्छेसमोर कुणाचीच मात्रा चालत नाही". आपणासारखा शांततेने राज्य करणारा राजा प्रजेस लाभला याबद्दल आपली प्रजा आभिनंदनास पात्र आहे. गोव्याच्या व्हिसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांना महाराजांच्या निधनाबद्दल शोकसंदेश पाठवला
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २९ मे इ.स.१७३७
मनोरवर विजय...
तांदुळवाडी किल्ला जिंकल्यानंतर लगेच आपली विजयी घोडदौड मनोरच्या दिशेने निघाली, बरबाजी तपकीर, आवजी कवडे, विठ्ठल विश्वनाथ या धारकऱ्यांनी, १५ मे १७३७ मध्ये मनोर किल्ल्याला वेढा दिला आणि मदतीस नरवीर चिमाजी अप्पांनी, होनाजी बलकवडे या सरदारास पाठविले, आणि २९ मे १७३७ विजय मिळवला, पण पोर्तुगीजांची शिबाडे मनोरच्या मदतीस आली पण मराठ्यांच्या विजयाच्या धुंदी पुढे पोर्तुगीजांना पळ काढावा लागला...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment