ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ३० मे इ.स.१६६४
(ज्येष्ठ वद्य प्रतिपदा, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार सोमवार)

महाराज किल्ले सिंहगडावर!
ज्ञजसवंतसिंह किल्ले सिंहगडाचा वेढा उठवून निघून गेल्याचे कळताच तिसऱ्याच दिवशी खासे महाराज किल्ले सिंहगडावर आले. आपल्या शुर मावळ्यांची त्यांनी पाठ थोपटली आणि मोगली संकटाचे सावट दूर झाल्याचा आनंद लगेच अहमदनगर वर धाड घालून साजरा केला. मराठी फौजांची सर्वत्र विलक्षण दहशत बसली होती. महाराजांचे विजयी अश्व रोखायला आता कुणीच धजत नव्हता. महाराजांची स्वारी दौलताबादकडे झुकणार अशाही वार्ता याच सुमारास सर्वत्र पसरलेल्या होत्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३० मे इ.स.१६७४
(ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार शनिवार)

शिवराज्ञी सोयराबाईसाहेब यांच्याशी समंत्रक विवाह लावण्यात आला. 
          गागाभट्टांच्या मार्गदर्शनानूसार समंत्रक मुंज झाल्यानंतर महाराजांचे सोयराबाईसाहेब यांच्याशी विधीवत पुन्हा लग्न लावण्यात आले. आणि सोयराबाईसाहेब यांना ज्येष्ठ राणीसाहेब हा किताब मिळाला.

 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३० मे इ.स.१७३७
वसईवर मराठयानी पहिला हल्ला केला पण फिरंग्यानी तो परतवून लावला. त्यानंतर ९ जून, २८ जून, ४ सप्टे. १९३७ हल्ला अयशस्वी राहिला.

 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३० मे इ.स.१८०८
बापु गोखलेंनी वासोटा ताब्यात घेतला...
"बापू विरुद्ध प्रतीनिधी व ताई  तेलीण...
प्रतिनिधी पद :- मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात प्रतिनिधी हे पद नाही. १६८९ ते १७०० या दरम्यान छत्रपती राजाराम जिंजीस आश्रयास गेलेला असताना हे पद निर्माण करण्यात आले. राजारामच्या अनुपस्थितीत प्रतिनिधीच्या आज्ञेत सर्वांनी राहावे व राज्य कारभार चालवावा असा संकेत ठरला. त्यामुळे प्रतिनिधी हा पेशवे व इतर मंत्र्यांच्या ही वरच्या हुद्द्याचा होता.
रावबाजीचा संबंध प्रतिनिधीशी आला त्याचे नाव परशुराम पंत. हा अत्यंत हूड प्रवृत्तीचा असल्याने नाना फडणीसाने  त्याला पुण्यास आपल्या नजरेखाली ठेवले होते. १७९५ मध्ये हा परशुराम १८ वर्षाचा झाला व स्वतः काभार पाहू लागला. त्यानेच नेमलेला कारभारी बळवंतराव आणि त्याची स्वतः ची आई यांच्या सल्ल्याने कारभार चालू झाला. पण पुढे परशुरामाचे त्यांच्याशी पटेना. कारभारी बळवंतराव आणि त्याची स्वतःची आई रावबाजीकडे परशुरामाच्या तक्रारी करत असत. तेव्हा  रावबाजीने  शिंद्यांच्या मदतीने त्याच्या वाड्याला वेढा घातला व कारभारी बळवंतराव आणि आई  यांच्या आज्ञेतच राहीन असे परशुरामाकडून वचन घेऊनच उठवला. मात्र आपले वचन पाळले नाही व पुन्हा आपले रंग तो दाखू लागला (१८०३). त्याला वठणीवर आणण्यासाठी पेशव्याने बापूस पाठवले.  बापूचे प्रत्यक्षात प्रतिनिधीशी काही वैयक्तिक वैर नव्हते. बहुदा नाईलाजास्तव ही कामगिरी स्वीकारली. १८०४ ते  १८०८ अशी प्रलंबित हि कारवाई होती. १८०७ मध्ये ताई तेलीण हिने स्वतःची फौज जमवली व प्रतिनिधीच्या जहागिरीचे रक्षण करण्यासाठी शस्त्र उपसले. वासोटा हा दुर्गम दुर्ग तिने आपली लष्करी राजधानी केली. शिवाय आजूबाजूच्या ३०-४० मैलाचा प्रदेश हि ताब्यात घेतला. बापूने तिच्या विरुद्ध मोहीम उघडली आणि वासोटा सोडून बहुतेक सर्व प्रदेश मुक्त केला.
मार्च १८०८ पासून बापूने वासोट्या वर कारवाई तीव्र केली. ताई तेलीणीने कडवा प्रतिकार करीत किल्ला लढवला.  अखेर उपासमारीने हतबल होऊन ३० मे १८०८ रोजी तिने शरणागती पत्करली आणि वासोटा बापूच्या ताब्यात आला.

 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. 

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments