ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 १८ मे इ.स.१६६६
(वैशाख वद्य दशमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)

काबूल मोहीम बारगळली!
    काबूल मोहीम तर बारगळली मात्र, याचे काही श्रेय हे औरंगजेब बादशहाचा वजीर जाफरखानाला देखील जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाफरखानाची भेट स्वतः त्याच्या घरी जाऊन घेतली व त्याला मोठा नजराणा दिला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 🚩 🏇

📜 १८ मे इ.स.१६८२
(वैशाख वद्य ७, सप्तमी, शके १६०४, दुदुंभी नाम संवत्सर, वार गुरुवार)

स्वराज्याचे तिसरे वारसदार शाहुराजेंचा जन्म!
(मृत्यू १५ डिसेंबर १७४९)
स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे वा स्वराज्यसंकल्पीका आऊसाहेब यांच्या प्रेरणेने स्वराज्यनिर्माते शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्माण करण्याचा पाया रचला, स्वराज्य निर्माण केले, ते निर्माण केलेले स्वराज्य रक्षीण्याचे शिवकार्य स्वराज्यरक्षक शिवपुत्र शंभूराजांनी, येसूबाईसाहेबांनी, छत्रपती राजाराम महाराजांनी केले. पुढे या स्वराज्याचा विस्तार संताजी धनाजी सारख्या मातब्बर सरदारांच्या मदतीने ज्यांनी उत्तर भारत, मध्यभारत, गुजरात , माळवा पर्यंत केला ते स्वराज्यविस्तारक म्हणजे शंभुपुत्र छत्रपती शाहु महाराज. यांचा जन्म १८ मे १६८२ झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

📜 १८ मे इ.स.१६८२
म्हैसुरच्या "चिकदेवराय" कडून मराठे पराभूत झाले पण 'मुदेरच्या नायकावर' मराठ्यांनी विजय मिळवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १८ मे इ.स.१६८४
शहजादा रामघाटाने वर येऊ लागला तेव्हा 'मरीचा रोग' उत्पन्न होऊन त्याच्या सैन्यातील बरेचसे लोक मृत्युमुखी पडले, घोडे, हत्ती, उंट इतके मेले कि त्यांची दुर्गंधीने सारा प्रदेश दुषित होऊ लागला. जनावारे मेल्याने सर्वांवर पायी चालण्याची पाळी आली. आपल्या पुत्राची बातमी ऐकून बादशहाने त्यास नवीन सरंजाम पाठवला. व आजच्या दिवशी होते नव्हते सर्व गमावून शहजादा 'अहमदनगर' येथे आपल्या पित्याजवळ पोहचला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

📜 १८ मे इ.स.१६८६
कृष्णाजी नरसप्रभु देशपांडे, रोहीडेखोर यांस लिहीलेल्या पत्राची नोंद !
            शिरवळजवळ प्रचंडगड, भोरच्याजवळ रोहिडा किल्ला याच्या आसपास मोगली सैन्य फिरत असावे. त्यावेळचे कृष्णाजी नरसप्रभु देशपांडे रोहीडेखोरे यांस लिहिलेल्या पत्रावरून तिकडील हालचालीची कल्पना येते. परंतु याच वेळी याच भागातील कारीचे सर्जेराव जेधे व शिवाजी जेधे मोगलांस फितूर झाले. तथापी इ.स.१६८३ पासून महाराष्ट्रात फितुरीचे पेव फुटले. परंतु जेधे घराणे हे त्यांस कसे बळी पडले याचे आश्चर्य वाटते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

📜 १८ मे इ.स.१७२४
जंजिऱ्याचा सिद्दी हा मोगलांचा अंकीत होता. तेव्हा त्याने
जिंकलेले किल्ले आणि मुलूख बादशहाने त्याजकडून मराठ्यास मिळवून द्यावेत अशी अट बादशहा व शाहू महारांज यामध्ये जो १८ मे १७२४ मध्ये करार ठरला त्यामध्ये होती. [बादशहातर्फे दक्षिणेतील सुभेदार मुंबीझखान व श्रीमंत बाजीराव पेशवे यांमध्ये तहाच्या वाटाघाटी झाल्या होत्या] त्या अटीनुसार जंजिऱ्याच्या सिद्दीकडे मराठ्यांनी सिद्दीच्या ताब्यात असलेल्या आपल्या किल्ल्यांची व मुलखाची मागणी केली. सिद्दीने ती मागणी झिडकारून लावली. ही मागणी पुरी करून घेण्याकरिता श्रीमंत बाजीरावांस जंजिऱ्याच्या सिद्दीवर स्वारी करावी लागली. ही सुद्धा मुलूखगिरीची स्वारी होय. या स्वारीत जंजिऱ्याच्या सिद्दीचा पराभव होऊन त्यास मराठ्यांचा मुलूख व किल्ले परत करावे लागले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments