ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 २ जून इ.स.१६६४
छत्रपती शिवराय किल्ले कोंढाणा(सिंहगड)किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला लढवलेल्या शुर मावळ्यांचा महाराजांनी मानसन्मान केला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २ जून इ.स.१६६५
(ज्येष्ठ वद्य चतुर्दशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार शुक्रवार)

किल्ले पुरंदरावर मोगलांचे निकराचे हल्ले!
याप्रमाणे पुरंदर माची व ५ बुरुज मोगलांच्या ताब्यात गेले. आतापावेतो विजय मोगलांचा झाला असला तरी पराक्रम गाजविला. तो मात्र मराठ्यांनीच. सैन्यसंख्या अनेक पटींनी जास्त असूनही मोगलांना एक-एक दिवस एक-एक वर्षांसारखा वाटत होता. शिवाय अजून किल्ले पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर मराठ्यांचेच निशान दिमाखात फडकत होते. मुरारबाजी देशपांडे आपल्या शुर साथीदारांसह बालेकिल्ल्याचे रक्षण करीत होते. प्रत्येक पावलासाठी मिर्झाराजे जयसिंगना भरपूर किंमत चुकवावी लागत होती. तरीही किल्ले पुरंदरचा आता त्यांच्या दृष्टिक्षेपातज्ञ येऊ लागला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २ जुन इ.स.१६७३
टॉमस निकल्सची रोजनिशी!
             मीठ व लाकूड या बाबतीत युवराज शंभुराजे यांचा हुकुम घेण्यासाठी मी शामजीला युवराज शंभुराजे यांच्याकडे पाठविले. परंतु संध्याकाळी शिवाजी महाराज १ मैलावरील आपल्या मातोश्रींच्या किल्ल्यावर (पाचाड) आल्याची पक्की बातमी आली. रात्री टेकडीवर चढताना आम्ही त्यांना पाहीले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २ जून इ.स.१७४०
सातारा व कोल्हापूरकर छत्रपति या एका झाडाच्या दोन फांद्या. ह्या दोन गाद्या एक कराव्या असा विचार बाळाजी बाजीरावांचा होता. त्यास चिमाजीअप्पांची संमति होती. कोल्हापूरकर संभाजी राजे शाहू
महाराजांच्या भेटीस साताऱ्यास आले आणि तारीख २ जून १७४० ते ३० मार्च १७४१ पर्यंत साताऱ्यास राहिले. ह्या मुदतीत बाळाजी बाजीरावांनी कोल्हापूरच्या संभाजी राजांशी वाटाघाटी करून शाहू महाराजांच्या पश्चात राज्यव्यवस्था कशी करावी ह्या बद्दल एक गुप्त करार संभाजी राजांशी केला. हा करार शाहू महाराजांच्या कारकीर्दीत बाहेर न फुटण्याची खबरदारी दोन्ही पक्षांनी घेतली. करार नानासाहेब व चिमाजी अप्पा ह्या उभयतांनी संभाजी राजे यास लिहून दिला. त्यातील मुख्य बाब अशी “सातारचे राज्य स्वामींचे आणि एकछत्री शिक्का महाराजांचा (संभाजी राजांचा) चालावा. शाहू महाराजांचा जीवात्मा आहे तो
बाह्यात्कारी आम्ही त्यांचे सेवक परंतु अंतर्यामी स्वामींचे, शाहू महाराज ह्यांनी कैलासवास केल्यावर दोन्ही
राज्ये स्वामींची व आम्ही सेवक स्वामींचे, स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करू”. शाहू महाराज निवर्तल्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली की हा करार मागे पडला आणि दोन्ही राज्यांचा समेट घडवून आणण्याचे काम तसेच राहून दोघांच्या भांडणामुळे राष्ट्राची हानी व्हावयाचे टळले नाही कारण शाहू महाराजांनी आपल्या मृत्यूपत्रात रामराजे यांस गादीवर बसवावे, संभाजी राजांना वारस करू नये असे स्पष्ट लिहिले होते.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २ जून इ.स.१७६०
पानिपतचा महासंग्राम
२ जून रोजी मराठे ग्वालीयरला पोहोचले. पुढे मराठे धवळपुरा, मथुरा असे अंतर पार करत, मराठे दिल्लीला पोहोचले. गारदयांच्या तोफांमूळे दिल्ली सहजरीत्या मराठ्यांच्या ताब्यात आली. दिल्ली सहज मराठयांनी जिंकल्यामुळे अब्दालीही हबकला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २ जून इ.स.१७६१
पुरंदरच्या जानू भिंताडेंचा सत्कार
पार्वतीबाईच्या (सदाशिवभाऊंची दुसरी पत्नी) रक्षणासाठी होळकरांनी विसाजी जोगदेव याची नेमणूक केली होती. पण तो इमानाला जागला नाही. तेव्हा जानू भिंताडा याने घोड्यावर स्वत:मागे बांधून सुखरूप घेऊन आला. त्याकामी वीरसिंगराव बारावकर व पिराजी राऊत यांनी मदत केली. जानू भिंताडा याचं मूळ गाव भिवडी, तालुका पुरंदर. बाईस वाचवून आणल्याबद्दल २ जून १७६१ रोजी १००० रुपये रोख व एक गाव बक्षिस म्हणून लावून दिला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २ जून इ.स.१८१८
दि. १६ मे १८१८ या दिवशी बाजीरावांनी (दुसरे) इंदूरजवळ महू या ठिकाणी आपला वकील माल्कमच्या छावणीत पाठवला आणि माल्कमला, 'आपण आजपर्यंत अनेकांचा सांभाळ करून त्यांस पदरात घेतले आहे. तर या संकटसमयी मलाही हात देऊन माझा निभाव करावा' अशा आशयाचे पत्र पाठवले. वास्तविक बाजीरावांचा (दुसरे) पाठलाग करून माल्कमही फार थकला होताच. परंतु, बाजीराव स्वतःहून तहाची मागणी करत आहेत हे पाहून माल्कमने आपली झाकली मूठ तशीच झाकून ठेवली आणि मागणी मात्र सव्वा लाखांची केली. त्याने बाजीरावांना 'संपूर्ण शरणागती'ची अट कळवली. बाजीरावांनी (दुसरे) प्रथम ते मानले नाही. परंतु, २ जून रोजी माल्कमने बाजीरावांना निर्वाणीचा निरोप पाठवला. अखेरीस बाजीरावांनी (दुसरे) माल्कमच्या सर्व अटी मान्य करण्याचे ठरवले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments