☀धनत्रयोदशी (धनतेरस)
दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिनाचे महात्म्य, या दिवशी करायच्या कृतीमागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया.
🔹१. तिथी
आश्विन वद्य त्रयोदशी
🙏श्री लक्ष्मीदेवी
🔹२. भावार्थ
‘ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजन करतात. येथे ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो.
☀३. वैशिष्ट्ये
🔹अ. व्यावहारिक
हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते.
🔹आ. आध्यात्मिक
या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून राहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे. त्यामुळे साधना करणार्या जिवासाठी हा दिवस ‘महापर्वणी’ समजला जातो.
🙏४. महत्त्व
🔹अ. या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.
🔹आ. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै-पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम १/६ भाग प्रभुकार्यासाठी व्यय करावा, असे शास्त्र सांगते.’
🔹इ. या दिवशी श्री विष्णूच्या अप्रकट शक्तीच्या आधारे श्री लक्ष्मीची उजवी नाडी कार्यरत होऊन त्यातून उत्पन्न होणार्या तेजतत्वात्मक लहरी वेगाने ब्रह्मांडाकडे झेप घेतात. लक्ष्मीतत्वाच्या उजव्या नाडीच्या कार्यरत अवस्थेमुळे या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातील वायूमंडल हे सोन्यासारख्या चमचमणार्या सोनेरी कणांनी उजळून निघालेले असते. या चमचमणार्या सोनेरी कणांतील श्री लक्ष्मीचे चैतन्य जिवाला मायेतील ऐश्वर्य प्रदान करून त्याच्या साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करते; म्हणून या दिवशी धनाच्या रूपात श्री लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. श्री लक्ष्मीच्या भावपूर्ण पूजेमुळे प्रत्यक्ष धनाच्या अधिपतीचे, म्हणजेच कुबेराचे पृथ्वीच्या कक्षेत आगमन होते.
🔹ई. पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून खाली करायचे. तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता आणि राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते. राजाचा खजिना हा जनतेचा असून राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देतांना आडकाठी न करता देत असे. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. ‘सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आत्मबलही वाढत असे..
५. पूजन
🙏अ. धन्वंतरी जयंती
धन्वंतरी देवता
☀धन्वंतरी जन्म
‘धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरी एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्या हातात ‘जळू’, तिसर्या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतो.’ –
🙏पूजन
वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
☀आ. यमदीपदान
प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) (टीप २) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
अर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.
🔴टीप १ – स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’ (मूळस्थानी)
🔴टीप २ – काही ठिकाणी १३ दिवे लावण्याची प्रथा आहे. (मूळस्थानी)
🙏संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
★ तसेच ही कथाप्रचलित आहे
------आज धनत्रयोदशी------
समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला.
म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते.
या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
*धनत्रयोदशी कथा
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो.
आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात.
लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो.
या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात.
महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते.
सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो.
ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते.
जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात.
या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो.
अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.
या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.
त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात.
याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे.
ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.
धनोत्रयदशीला या वस्तूंची पूजा अवश्य करा; तर वर्षभर घरात लक्ष्मी नांदेल
धनोत्रयदशीपासून पाच दिवसीय दीप पर्वाला सुरुवात होत आहे. धनोत्रयदशीला लक्ष्मीची पूजा केली जाते. या पूजनाच्या वेळी काही वस्तूंची पूजा केल्यास वर्षभर घरात लक्ष्मी नांदेल.
कार्तिक मासातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या तिथिला दीपावलीचा सण साजरा केला जातो. धनोत्रयदशीपासून या दिपावलीच्या उत्सवाचा प्रारंभ होते.
धनोत्रयदशी दिवशी लक्ष्मी आणि यमाची पूजा केल्यास घरात सुख-शांति आणि समृद्धि येते.
धनोत्रयदशीला या वस्तू घरी आणून त्यांची पूजा केल्यास वर्षभर लक्ष्मी घरात नांदेल
कोथींबीर (धनिया)
धनिया हे धनाचे प्रतिक आहे. धनोत्रयदशी दिवशी साबुत धनिया अर्थात कोथींबीरची पूजा करावी. यानंतर ही कोथींबीर घराच्या अंगणात असलेल्या झाडाच्या कुंडीत पुरावी.
गणेश किंवा लक्ष्मीची मूर्ति
गणेश किंवा लक्ष्मीची मूर्ती धनोत्रयदशीच्या दिवशी आणणे शुभ संकेत आहेत. या दिवशी गणेश किंवा लक्ष्मीची मूर्ती आणून त्यांची पूजा केल्यास वर्षभर घरात धन आणि अन्नाची कमी भासत नाही.
धातुच्या वस्तू अथवा सोनं-चांदीची खरेदी
धनोत्रयदशी दिवशी धातुच्या वस्तू अथवा सोनं-चांदीची खरेदी केल्यास भाग्य उजळते. धातुची भांडी तसेच सोन्या-चांदीचे दागीने खरेदी करण्यासाठी धनोत्रयदशी एकदम शुभ मुहुर्त आहे.
कवडी
घरातील तिजोरीत कवडी ठेवल्यास कधीच धनाभाव भासत नाही. यासाठी धनोत्रयदशी दिवशी कवडी खरेदी करुन त्याची पूजा करावी यानंतर लाल कपड्यात बांधून ती तिजोरीत ठेवावी.
शंख
शंख सुख समृद्धि आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. धनोत्रयदशी दिवशी आवश्य शंख घरी आणावे पूजा झाल्यानंतर शंख नाद करावा. असे केल्याने घरी लक्ष्मीचे आगमन होते आणि तुमच्यावर येणारे संकट टळते.
झाडू
झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. दीपावलीच्या मुहुर्तावर नवीन झाडू घरी आणावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्तींचा विनाश होतो.
मीठ
दीपावलीच्या मुहुर्तावर मीठाचे पाकीट आवश्य घरी आणावे आणि याचा उपयोग करावा. मीठ खरेदी केल्यास वर्षभर धनाभाव होत नाही. सुख समृद्धि घरात टिकून राहते. दीपावलीच्या वेळेस या मीठाच्या पाण्याने घरात साफ सफाई केल्यास घरातील दरिद्रता दूर होते.
स्फटिकाचे श्रीयंत्र
धनोत्रयदशी दिवशी स्फटिकाचे श्रीयंत्र घरी आणल्यास लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. पूजेनंतर या श्रीयंत्राला केशरी कपडात बांधून तिजोरीत ठेवावे.
..
...एक कट्टर हिंदुत्ववादी
माहिती संकलन : रमेश ☀धनत्रयोदशी (धनतेरस)

माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Comments
Post a Comment