ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २७ एप्रिल इ.स.१६६३
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५८ साली उत्तर
कोकणवर स्वारी केली. तेव्हा पोर्तुगिजांच्या चौल आणि दमण ठाण्यांना मराठा सैनिकांकडून उपसर्ग पोचला. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६१ साली दक्षिण कोकणवर स्वारी केली. त्यावेळी त्यांचे सैन्य गोव्याच्या हद्दीपर्यंत आले. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचा पराभव केल्यावर त्याचे अभिनंदन पोर्तुगिजांनी दिनांक २७ एप्रिल १६६३ च्या पत्राने केले. ही वेळपावेतो छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे डिचोली आणि साखळी हे दोन प्रांत जिंकून घेतले, तेव्हा पोर्तुगिजांनी आपला वकील रामजी शेणवी यास अभिनंदनपर पत्र देऊन राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
📜 २७ एप्रिल इ.स.१६६५
दाऊदखान किल्ले रोहिडा जवळ पोहचला. कुत्बुद्दीनखान व बलुदीखान (लोदीखान) हे अनुक्रमे जुन्नर तर्फ व तळकोकणात मिर्झाराजे जयसिंग यांच्या आज्ञेनूसार धुमाकूळ घालीत होतेच. आता जोडीला शव्वाल महिण्याच्या २१ तारखेस, म्हणजेच दि.२७एप्रिल इ.स.१६६५ दाऊदखानही किल्ले रोहिडा जवळ पोहचला आणि मोगली धुमाकूळाला चहू अंगांनी ऊत आला. किल्ले रोहिडा ते किल्ले राजगड या भागातील हिंदवी स्वराज्याची ५० खेडी मोगलांनी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली. त्या भागातील मराठे डोंगरातील खिंडीच्या आश्रयाने ४, चार खेड्यांत जमा झाले. मोगलांची एक तुकडी त्या भागात चालून गेली. पण मराठ्यांनी जबर झुंज मांडली. तेव्हा तिकडील मोगलांनी दाऊदखानाकडे अधिक कुमक पाठवा म्हणून कळविले. त्याप्रमाणे त्याने राजा रायसिंह व अचलसिंह कछवाह यांना फौजेसह पाठविले. ही फौज येत असलेली दिसताच मराठे डोंगरात निसटून गेलेत. मोगलांनी ही चार गावेही बेचिराख करून टाकली. तेथील गरीब प्रजा, गुरे-ढोरे व मालमत्ता मोगलांच्या हाती पडली. अनेक माणसे कैद झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ एप्रिल इ.स.१६६६
घाटमाथा व कोकण यांच्या मध्यभागी उभा असलेला विजापूरकरांचा खेळणा उर्फ विशालगड स्वराज्यात दाखल करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे भारंभार माळा लावून खेळणागड स्वराज्यात दाखल केला. मावळ्यांनी बहु पराक्रम केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ एप्रिल इ.स.१६८०
राजापूरच्या इंग्रजांनी आपल्या आपल्या वरीष्ठास पत्रे लिहून कळवले कि, छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ठीकठिकाणच्या सुभेदारास व हवालदारास त्याने आपल्यापाशी बोलावले आहे. कित्येकास कैदखान्यात घालून कित्येकास बडतर्फ केले आहे. महाराजांच्या मृत्युनंतर २४ दिवसातला हा प्रकार आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ एप्रिल इ.स.१६८२
इ. स. १६८२ च्या प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांनी आंजेदिव बेटाची तटबंदी करण्याचा बेत आखून आपला एक सुभेदार तिकडे रवाना केला. गोव्याचा व्हिसेरेइ कौंट द आल्व्होर याला छत्रपती संभाजी महाराजांच्या हालचालीचा सुगावा लागल्याने आंजेदिव बेट त्वरीत व्यापण्याचा विचार करून त्याने आपल्या कार्यकारी मंडळाची बैठक त्याने दि. २७ एप्रिल १६८२ या दिवशी पणजीच्या किल्ल्यात बोलविली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
📜 २७ एप्रिल इ.स.१६८३
गोव्याचा विजरई कोंट द आल्चोर सालसेट प्रांतातील सचोल या ठिकाणी गेला. तेथे त्याचे वास्तव्य २ महिने होते. जुन महिण्यात पाऊस सुरू झाला. पाऊस इतका पडला की, समुद्राप्रमाणे शेते भरून गेली. बाहेरून अन्नपुरवठा बंद पडला. लोक उपाशी मरू लागले. इ.स.१६८१ मध्ये कोंद दी आल्वोर हा गोव्याचे विजरईपदी विराजमान झाला. त्यावेळी गोव्यात पटकीची साथ होती. इ.स.१६८२ ला अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडला. आणि इ.स.१६८३ मध्ये त्याने आपल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे आक्रमण ओढवून घेतले. कोंट द आल्वोर हा अतिशय शूर योद्धा होता. स्पेनमधील अनेक लढ्यांत आघाडीवर होता. त्यास युद्ध मोहिमांचा चांगला अनुभव होता. गोव्यात हजर होण्यापूर्वी तो अंगोल्याचा गव्हर्नर होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments
Post a Comment