ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 २८ एप्रिल इ.स.१६६१
छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील “प्रचीतगड उर्फ उचीतगड” जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २८ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध दशमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार बुधवार)

महाराजांच्या महानिर्वाणाबाबतची माहिती!
मराठे व पोर्तुगीज यांची युद्धाची तयारी सुरू असताना अकस्मात महाराजांचे निधन झालेले आहे. यासंदर्भात आपला दुखवटा व्यक्त करताना पत्रातून गोव्याचे पोर्तुगीज आधिकारी महाराजांच्या मृत्यूबाबत दुखवटा व्यक्त करून दोन्ही राज्यांत सलोखा व स्नेह संबंध आधी होते तसेच ठेवण्याची इच्छा व्यक्त करतात.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २८ एप्रिल इ.स.१७३१
बेलापूरची लढाई
मराठ्यांनी नारायण जोशी या पेशव्यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली. ३१ मार्च १७३१ रोजी झालेल्या या लढाईत मराठ्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार २८ एप्रिल रोजी कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि मराठ्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २८ एप्रिल इ.स.१७२८ 
रोजी पोर्तुगालच्या राजाने व्हिसेरेईस लिहीलेल्या पत्राची नोंद!
        "तुम्ही फोंड सावंत याला धडा शिकविण्याच्या हेतूने त्याच्याशी युद्ध सुरू केलेत ते चांगले केलेत. परंतु डिचोलीचा किल्ला फोंड सावंतांच्या मुलाच्या ताब्यात देण्याऐवजी तो पाडून टाकलेला बरा. कारण, फोंड सावंतांचा मुलगा आपल्या बापासारखा निघाला तर डिचोलीच्या किल्ल्याचा उपयोग त्याला या राज्याशी लढताना चांगला होऊ शकेल". 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २८ एप्रिल इ.स.१७४०
श्रीमंत बाजीराव पेशवे नर्मदेच्या काठी मिळालेले परगणे ताब्यात घेण्यासाठी ते तिकडे गेले. तारीख १३ मार्च बाजीराव बऱ्हाणपुरास होते. तद्नंतर ते खर्गोण परगण्यात गेले. त्यावेळी पुण्यातील कुटुबियांनी बाजीरावांच्या मनाविरुद्ध त्याची आवडती मस्तानीबाई कैदेत ठेवली होती. हे त्यांस न आवडून त्या मनःस्तापातच ते नासिरजंगावरील स्वारीस गेले होते. नासिरजंगावरील स्वारी आटोपल्यावर विमनस्क स्थितीत ते खर्गोण परगण्यात नवीन मिळालेल्या जहागिरीची व्यवस्था पाहाण्यास गेले. तेथे त्यांस ज्वर होऊन रावरेखेडी येथे तारीख २८ एप्रिल १७४० सोमवारी पहाटे श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी हे जग कायमचे सोडले. अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात बेचाळीस लढाया खेळून कायमच अजिंक्य राहिलेले हे 'ईश्वरदत्त सेनानी' शेवटच्या काळात मात्र आयुष्याची लढाई हरले होते. अखिल हिंदुस्थानात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून देऊन दबदबा निर्माण करणारे शिवछत्रपतींच्या स्वप्नातल्या 'स्वराज्याला' 'साम्राज्य' बनवणारे धीरोदात्त पेशवा हे पुन्हा न परतण्याकरता स्वर्गाच्या मोहिमेवर गेले....

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. 

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments