ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 २९ एप्रिल इ.स.१६३९
मुघल सम्राट शाहजहान यांनी दिल्ली येथील लाल किल्ल्याचे निर्माण करण्यास पाया रचला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ एप्रिल इ.स.१६६१
(वैशाख शुद्ध ११, एकादशी, श्रीनृपशालिवाहन शके १५८३, संवत्सर प्लव, वार सोमवार)

शृंगारपुर स्वराज्यात दाखल!
      महाराज १५ हजार पायदळासह श्रृंगारपुरात शिरले, तत्पूर्वी महाराजांच्या सैन्याने श्रृंगारपुर व्यापले होते. महाराज सुर्यरावाच्या वाड्यात शिरले. समोरच सुर्याजीचे सिंहासन मांडलेले होते. महाराज सिंहासना जवळ गेले आणि थाङ्कन लाथ मारून महाराजांनी ते ठोकारून लावले. सुर्यरावाचा पाठलाग महाराजांनी केला नाही किंवा त्याचा शोधही घेतला नाही. पौरजनांना महाराजांनी अभयदान दिले. दिलासा पावलेली प्रजा आपापल्या ठिकाणी परतली. महाराजांनी पुर्ण प्रभावली प्रांतच ताब्यात घेतला. प्रभावली प्रांताची सुभेदारी त्र्यंबक भास्करांकडे सोपविली गेली. त्र्यंबकपंत युद्धात निष्णात तसेच कारभारात शहाणे होते. सुरायरावाचे शेकडो सैनिक आता शरण येऊन स्वराज्याच्या झेंड्याखाली गोळा होत होते. श्रृंगारपुरच्या जवळच एक गड होता. महाराजांनी तो ताब्यात घेऊन त्याचे नाव "प्रतीतगड" ठेवले. श्रंगारपुर स्वराज्यात दाखल झाले

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ एप्रिल इ.स.१६६५
दाऊदखानाचे सैन्य किल्ले राजगडाच्या रोखाने निघाले. किल्ले राजगडाच्या रोखाने दौडत असताना वाटेतील गावे व मुलूख जाळून टाकीत व उध्वस्त करीत चालले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ एप्रिल इ.स.१६८०
महाराजांच्या महानिर्वाणाबाबतची माहिती!
         पाँडेचरीचा संस्थापक आणि राजापुरचा मुख्य अधिकारी फ्रेंच मार्टिन लिहीतो की "छत्रपती शिवाजी महाराज काही दिवसांपूर्वीच वारले. उघड्या मैदानावरील लढाईतील यशापेक्षा आपल्या कुशाग्र बुद्धीने  मुत्सद्देगिरीतील क्षमतेमुळे हिंदुस्थानातील उच्चतम व्यक्तींच्या पंक्तीत महाराज विराजमान होते महाराजांचा उत्तराधिकारी ठरविण्यास महाराजांच्या अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराजांचा ज्येष्ठ मुलगा हा महाराजांचा कायदेशीर वारस आहे".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ एप्रिल इ.स.१६८२
छत्रपती संभाजी महाराजांची सन १६८२ च्या जानेवारीत आंजेदिव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची योजना केली आहे. या योजनेनुसार दगड, चुना  व अन्य साहित्य आंजेदिव बेटाकडे रवाना करण्यासाठी संबंधितांना आज्ञा दिली गेली आहे ही खबर दोतोर लुईस गोन्साल्विज कोत या व्हाॅइसराॅयच्या सेक्रेटरीला समजली. त्याने व्हाॅइसराॅयला  दिनांक २९ एप्रिल सन १६८२ रोजी कळवीले की...
"आता असे कळते की, संभाजीराजे ह्यांनी त्या बेटाच्या तटबंदीचा नकाशासुध्दा तयार केला असून त्या कामास लवकरच सुरवात होणार आहे."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ एप्रिल इ.स.१७०५
१७०५ एप्रिल महिन्यात त्र्यंबक शिवदेव, पंताजी शिवदेव आणि रामजी फाटक यांनी सिंहगडावर हल्ला केला आणि तेथील मोगल शिबंदीचा पराभव करून तो किल्ला आपल्या ताब्यात आणला. गडाचा मोगल किल्लेदार देवीसिंग यास कैद केले. हे महाराणी ताराबाईंना समजताच त्यांनी २९ एप्रिल १७०५ रोजी रामजी फाटक यांस पत्र लिहिले, “तुमच्या सेवेचा मुजरा जाहला. तुम्ही मर्दानी सेवक आहात या उपरीही आपण स्वामी कार्य करीत जाणे म्हणजे कुलास उर्जीत होईल.”

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments