ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 २० मे इ.स.१४९८
पोर्तुगालचा वास्को-द-गामा दोनशे खलाश्यांसह भारतातील कालिकत बंदरामध्ये येऊन पोहचला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २० मे इ.स.१६६४
जसवंतसिंहाने किल्ले सिंहगडाच्या डोंगरावरून तोफखाना खाली उतरविला. जसवंतसिंहाचा किल्ले सिंहगड-वेढा "बादशाही थाटात" सुरूच होता. ५ महिने उलटले. मराठे अजुनही त्याला दाद देत नव्हते. अखेर जसवंतसिंहाने "सुलतानढवा" म्हणजे निर्वाणीचा हल्ला चढविण्याचा निश्चय केला. त्यानुसार जय्यत तयारी करून गुरूवार दि. १४ एप्रिल इ.स.१६६४ पुर्ण शक्तीनिशी जसवंतसिंहाने किल्ले सिंहगडाच्या तटावर तोफांसह हल्ला केला. पण मराठ्यांनी तिखट प्रतिकार करून शेकडो मोगल व राजपूत कापून काढले. त्यातच नशिबानेही जसवंतसिंहाचा घात केला. अचानक दारूचा स्फोट झाला आणि त्यात अनेक मोगल सैनिक ठार झाले. अपयशामुळे जसवंतसिंहाचे माथे पार भडकून गेले. प्रचंड नामुष्की पदरात पडली. सुलतानढवा नाकामियाब झाला. अशावेळी पराभवाचे खापर आपला श्यालक राव भावसिंह हाडा याच्या माथी फोडून जसवंतसिंह मोकळा झाला. मानी स्वभावाच्या भावसिंहाला हा आरोप सहन झाला नाही. त्यातूनच दोघांचा कडाक्याचा वाद जुंपला. अखेर तणतणत जसवंतसिंहाने किल्ले सिंहगडाच्या डोंगरावरून तोफखाना खाली उतरविला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २० मे इ.स.१६६५
किल्ले राजगडाहुन "छत्रपती शिवरायांनी" आपले वकिल 'रघुनाथपंत पंडितराव' यांना "मिर्झाराजे जयसिंह" यांच्याकडे "पुरंदर तह" संदर्भात बोलणी करण्याकरता रवाना केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २० मे इ.स.१६८१

शहजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना लिहीलेल्या पत्राची नोंद!
"हिंदुस्थानातील त्या राजश्रेष्ठाने छत्रपती संभाजी महाराजांनी या माझ्या पत्रांत लिहील्याप्रमाणे वागावे म्हणजे लौकिक जगात (आणि धार्मिक द्रुष्टीने) त्यांचा सुलौकिक होईल. यापूर्वी मी तुम्हाला एक पत्र पाठविले होते. ते बहुतेक मिळाले नसावे. नाही तर तुम्ही त्याचे उत्तर पाठविले असते. आता मी येऊन पोहोचेपर्यंत तुम्ही पत्रे पाठविण्यात कसूर करू नये. त्या एकनिष्ठ छत्रपती संभाजी महाराजांची वार्ता ऐकण्यासाठी मला, दिर्घ काळापासून उत्कंठा लागली आहे. आधिक काय लिहीणे ? तुम्हाला भेटण्याची आतुरता आहे". हे पत्र शहजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना लिहीले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २० मे इ.स.१६८२
छत्रपती संभाजीराजेंच्या आदेशाने मुघल सरदार शरीफखानाच्या सैन्यावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला.
वाढलेल्या गवतातून मराठे आले आणि प्रमुख जाहीदखान, चुराघासी, सैफुखान, असहनउल्लाह सह इतर सैन्याची कत्तल करून मराठे पसार झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २० मे इ.स.१७६६
मल्हारराव होळकर यांचे निधन
( जन्म - १६ मार्च १६९३ )
पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २० मे इ.स.१८१८
इंग्रज अधिकारी "क्याप्टन स्कॉटने" 'बल्लारपुरच्या किल्ल्याला' खिंडार पाडुन प्रवेश केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २० मे इ.स.१८१८
यश मिळवण्याचा निश्चय करुन "मेजर एल्ड्रिजने" आपल्या फौजेनिशी "किल्ले शिवनेरी" व "जुन्नरच्या गढिवर"आक्रमण केले व 'शिवनेरी' बरोबर 'जुन्नरच्या गढिवर' ताबा मिळवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments