ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

📜 १९ जुन इ.स.१६३६
शहाजहान बादशहाचा गुलाम अलावर्दीखान तुर्कमान याने १४ किल्ले ४ महिण्यात काबीज केले. इ.स.१६३५ शहाजहान बादशहाने दक्षिणेत स्वारी केली. त्याने बागलाण-नाशिककडील किल्ले घेण्यासाठी शाहिस्तेखानाच्या नेतृत्वाखाली अलावर्दीखान यांस नेमले. अलावर्दीखान याने त्या भागातील सर्व किल्ले राजे शहाजीराजे यांच्या लोकांकडून घेतले. त्यासंबंधीचा शिलालेख धोडप किल्ल्यात आहे. त्याचा सारांश
पुढीलप्रमाणे:-
शहाजहान बादशहाचा क्षुद्रतम गुलाम अलावर्दीखान तुर्कमान याने धोडपचा किल्ला व इतर १४ किल्ले अवघ्या ४ महिन्यांत काबीज केले. चांदवड, अंतराळ, (इंद्रा) राजदेहरे, कोलेर (लोकघेर) कंचना, मंचना, कण्हेर, जवळा, रवळा, मार्कंड्या, अहिवंत, अचलगड, आणि किल्ले रामसेज मात्र नंतर महाराजांनी इ.स.१६७० १६७१ १६७२ या कालावधीत वरिल सर्व किल्ले स्वराज्यात आणले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १९ जुन इ.स.१६७६
(आषाढ वद्य ४, चतुर्थी, शके १५९८, संवत्सर अनल, वार सोमवार)

महाराजांनी (मुहंमद कुलीखान) उर्फ नेतोजी पालकर यांना विधिवत हिंदू करून घेतले.
  नेतोजी पालकर (मुहम्मद कुलीखान) १० वर्षे काबूलकडे राहिल्यानंतरही नेतोजीराव महाराजांना (स्वराज्याला) विसरू शकले नाहीत. त्यांचे मन सदैव दक्षिणेकडेच धाव घेई. महाराजांकडे परत जाण्याकरिता अनुकूल संधीची वाट ते पहात होते. अखेर तशी संधी त्यांना मे इ.स.१६७६ मिळाली. दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडे दक्षिणेची कामगिरी सोपविली गेली. आणि एक दिवस नेतोजीराव महाराजांकडे पळून गेले. महाराजांचा मुक्काम यावेळी किल्ले रायगडावरच होता. नेतोजीराव स्वराज्यात परत आल्याचे पाहून महाराजांना अवर्णनीय आनंद झाला. मुहम्मद कुलीखान यांचे "नेतोजी पालकर" मध्ये विधिवत रुपांतर झाले. महाराजांनी त्यांना शास्त्रविधिनुसार पुन्हा हिंदु करून घेतले. महाराजांनी नेतोजीरावांना स्वधर्मात घेऊन सक्तीच्या धर्मांतराला अतिशय चोख उत्तर दिले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १९ जून इ.स.१७४३
शाहू छत्रपतींच्या दरबारात स. १७२४ मध्ये श्रीपतराव प्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडले. “मराठ्यांनी प्रथम दक्षिण दिग्वजय करावा दक्षिणेत आपली सत्ता प्रस्थापून दक्षिण ताब्यात आणावी आणि मग उत्तरेकडे जावे.” प्रतिनिधीचे कोणीही ऐकले नाही. शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यास हिंदु पतपादशाहीचा झेंडा हिमालयापर्यंत घेऊन जाण्यास मुभा दिली. कर्नाटकमामला फत्तेसिंग भोसले याजवर सोंपविला. फत्तेसिंगानी १७२५-२६ मध्ये एक स्वारी कर्नाटकात नेली. दुसरी स्वारी चिंत्रदुर्गची बाजीराव पेशव्यांनी नेली. स. १७३९ मध्ये रघोजी भोसले व फत्तेसिंग या उभयतांनी कर्नाटकावर चाल करून तेथील नबाबास मारीले व तंजावरचा राजा प्रतापसिंग यास अभय दिले. ह्यावेळी रघुजीचा संबंध फ्रेंच सेनापती डुमासशी आला. बाळाजी बाजीराव यांस पेशवाई पद दिल्यावर छत्रपतीनी पेशवे पदासाठी झुंजणाऱ्या बाबुजी नाईकास कर्नाटक मामला दिला. वास्तविक कर्नाटक सुभा, विजापूर, भागानगर आणि तुंगभद्रा व
रामेश्वर मधील सर्व प्रदेश हा राजाच्या खाजगीकडचा. त्या सर्व प्रदेशात मुलूखगिरी करण्याचा हक्क बाबुजी नाईक बारामतीकर यांस शाहू महाराजांनी तारीख १९ जून १७४३ च्या हुकूमान्वये दिला. ह्या मोबदल्यात बाबुजी नाईकानी दरसाली महाराजास ७ लाख रुपये द्यावयाचे असून शिवाय ५ लाख रुपये खंडणी तंजावर राजाकडून घेऊन द्यावयाची असे बा. नाईकांनी कबूल केले होते.  कर्नाटक क्षेत्र आपल्यास मिळाल्यावर बाबूजी नाईकांनी कर्नाटकात दोन स्वाऱ्या केल्या.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १९ जून इ.स.१७५७
आंग्र्यांच्या पाडावानंतर नानासाहेब पेशवे दि. १ जानेवारी १७५७ ते १९ जून (१७५७) या काळात कर्नाटकात श्रीरंगपट्टणमच्या मोहिमेवर गेले. याच काळात कर्नाटकात हैदरअलीच्या उदयाला सुरुवात झालेली होती. हैदराबादचा निजाम हा तर पेशव्यांचा पिढीजात शत्रू होता. नानासाहेब कर्नाटक मोहिमेवर गुंतले आहेत हे पाहताच निजामाने पुन्हा कुरापती काढण्यास सुरुवात केली. अखेर निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी १७५७ च्या दिवाळीनंतर नानासाहेब
पुण्याहून फौजेसह निघाले. व-हाड प्रांतातील 'सिंदखेड' या गावी पेशव्यांची आणि निजामाची गाठ पडली. या लढाईत निजामाचा सपशेल पराभव झाला. यात झालेल्या तहानुसार निजामाने सालीना २५ लाख रु. उत्पन्नाचा मुलुख पेशव्यांना देण्याचे कबूल केले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १९ जून इ.स.१७९४
(ज्येष्ठ वद्य सप्तमी, शके १७१६)
शके १७१६ च्या ज्येष्ठ व ७ रोजी पेशवाईंतील प्रसिद्ध मुत्सद्दी हरिपंत फडके याचे निधन झालें.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १९ जून इ.स.१९१७
ज्येष्ठ व ३०, शके १८३९
शेवटची वेल सुकली !
शके १८३९ च्या ज्येष्ठ व ३० रोजी दुसन्या बाजीरावाची मुलगी कुसुमावती ( बयाबाई आपटे) वयाच्या सत्तराव्या वर्षी काशी येथें निधन पावली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments