ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

📜 १७ जून इ.स.१६३१
शाहजहानची पत्नी मुमताज़ हीचा वयाच्या ३८व्या वर्षी मृत्यू.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १७ जून इ.स.१६३३
इ. स. १६३० पासून १६३६ पर्यंत पहिली सहा वर्षे बालशिवाजी राजांसह जिजाबाई शहाजीराजांच्या हुकुमानुसार घोड्यावरून एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर फिरत होत्या. निजामाची राजधानी दौलताबाद हा किल्ला मोगलांनी १७ जून १६३३ मध्ये आपल्या ताब्यात घेतला. तेव्हा शहाजीराजांनी संगमनेर येथील पेमगिरी उर्फ भीमगड (शहागड) येथे निजामशहाची गादी स्थापिली व स्वतः वजीर बनले. ह्यावेळी राजमाता जिजाबाई शिवाजी राजांसह जुन्नरास होत्या. आपल्याला पकडण्यासाठी मोगल सरदार येत आहे हे समजताच त्यांनी शिवरायांस शिवापुरी पाठवून दिले. त्यानंतर मोगल सरदाराने जिजाऊना पकडून नाशिक येथे कैदेत ठेवले.राजमाता जिजाबाईंचा चुलता जगदेवराव जाधव याच्या सांगण्यावरून त्यांची सुटका झाल्यावर शिवाजीराजांसह त्या शहाजीराजियांबरोबर राहण्यासाठी संगमनेर येथील पेमगिरीस गेल्या. काही दिवसांनी त्या किल्ल्यास विजापूरकरांनी वेढा दिला. तेव्हा शहाजीराजे निजामशहास घेऊन माहुलीस गेले. व बरोबर जिजाबाई व बाळराजे शिवाजी राज्यांस ठेविले. त्या किल्ल्यासही विजापूरच्या फौजेने वेढा घातला तेव्हा किल्ला लढविण्याची शिकस्त करून वेढा उठेना म्हणून सल्ल्याची बोलणी केली व माहुली किल्ला खाली करून दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १७ जून इ.स.१६६५
उग्रसेन छत्रपती संभाजी महाराजांसह किल्ले सिंहगडावर सायंकाळी दाखल झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १७ जून इ.स.१६७४
#राजमाता_जिजाऊ_माँसाहेब_पुण्यतिथी🙏
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री"
"राजमाता जिजाऊ माँसाहेब" यांचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे निधन. आनंदनाम संवत्सरात ज्येष्ठाच्या वद्य नवमीला आऊसाहेबांची प्राणज्योत मालवली. थोरल्या महाराज स्वामींचे मातृछत्र उडाले.
राजा पोरका झाला, दिशा शुन्य झाल्या, आधार संपला, अंधार उरला, फक्त घनदाट अंधार☝️
आता शिवबाला "बाळ" म्हणणारे जगात
कोणीही उरले नाही😔
महाराज एकाएकी प्रौढ झाले.
महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि "छत्रपती श्री शिवाजी महाराज" आणि "युवराज शंभुराजे" यांच्या आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज पेरलं, ती आई म्हणजे "जिजाऊसाहेब". त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल,
म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते.
काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात.
सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले.
एक स्वाभिमानाची जननी काळाआड गेली,
पण स्वाभिमानाच साम्राज्य बघूनच!
स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १७ जून इ.स.१७५७
१७ जून च्या सुमारास मराठे यमुनेपलिकडे दुआंबात उतरले. अंताजी माणकेश्वरांनी सिकंदराबादचा प्रदेश कबजात घेतला. पण मुख्य उद्योग दिल्ली ताब्यात घेण्याचा होता. दिल्लीस सर्व अखत्यार नजीबखानाकडे असून अंतर्वेदचा प्रदेश त्याचे ताब्यात होता. गाजीउद्दीन नजीबखानास काढून लावण्यास उत्सूक होता त्याना दादास मी आपला दोस्त, आपण येऊन बंदोबस्त करावा असे पाचारण केले त्यावेळी सिद्ध झाले. नजीबखानास ही बातमी कळताच त्यास आपला अंतर्वेदीचा प्रदेश जाणार याची धास्ती पडून त्याने‌ मल्हाररावातर्फे दादाची मनधरणी करण्यास सुरुवात केली व आपली ६ कलमी शांतता योजना राघोबास सादर केली. त्यापैकी मराठ्यांनी काही अटी मान्य केल्या. अंतर्वेदीत अंताजी माणकेश्वरची फौज उतरली होती. तीने सहारणपूर पासून इटाव्यापावेतोचा तमाम प्रदेश अल्पायासे व्यापला. आता दिल्लीच घेण्याचे काम बाकी राहिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments