ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

📜 १८ जून इ.स. १५७६
हळदी घाटचा रणसंग्राम
हळदी घाटचा हा प्रसिद्ध रणसंग्राम १८ जून १५७६ रोजी खमनोर गावानजीक झाला. ह्या युद्धात मेवाड-सेनेचे नेतृत्व स्वतः महाराणा प्रताप सिंह करत होते. ह्या युद्धात महाराणा प्रताप सिंहांच्या बाजूने लढणारे एकमात्र मुस्लीम सरदार होते हकीम खाँ सूरी. महाराणाजींचे २०००० भिल्लांचे सैन्य विरुद्ध मोगलांचे ८०००० सैन्य असे घनघोर युद्ध हळदी घाटात झाले. एक दिवस चाललेल्या ह्या युद्धात दोन्ही बाजूकडील साधारण १७००० सैनिक मारले गेले.
मात्र महाराणा प्रताप सिंह विजयी झालेल्या ह्या युद्धात महाराणाजींचा अत्यंत प्रिय घोडा 'चेतक' ठार झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १८ जुन इ.स.१६६५
(आषाढ वद्य प्रतिपदा, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार रविवार)

युवराज शंभुराजे व सरसेनापती नेतोजी पालकर मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत दाखल!
  कीरतसिंह, उग्रसेन कछवाह व युवराज शंभुराजे, किल्ले पुरंदरास मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत पोहोचले. यावेळी युवराज शंभुराजेंचे वय फक्त ८ वर्षाचे होते. युवराज शंभुराजेंसोबत यावेळी सरसेनापती नेतोजी पालकर होते. शिवाय काही घोडदळ व पायदळही त्यांच्यासोबत आले होते. युवराजांची व्यवस्था महाराज उतरले होते त्याच ठिकाणी दिवाणखान्याच्या शामियान्यात केली गेली. युवराज शंभुराजे मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत पोहोचले. त्याच दिवशी सायंकाळी रोहिडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे किल्ले मोगलांच्या ताब्यात आल्याची बातमी मिर्झाराजे जयसिंगांकडे पोहोचली. पुरंदर, वज्रगड व सिंहगडाचाही ताबा मिळाला होताच. लवकरच नळदुर्ग, मार्गगड उर्फ आत्रा, माहुली, भंडारदुर्ग, तुळशीखुल, कोहोज, वसंतगड, मुरंजन, नंगगड, करमाळा, खिरदुर्ग, सोनगड व माणगड यांचाही ताबा, महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगांना दिला. कोंढाण्या जवळील कंदकडा व रुद्रमाळ या किल्ल्यांच्या किल्ल्याही त्याच सुमारास औरंगजेब बादशहाकडे रवाना करण्यात आल्या. हे किल्ले ताब्यात येताच मिर्झाराजे जयसिंगांनी युवराज शंभुराजे यांची परत-पाठवणी केली. तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी युवराज शंभुराजेंना ओलीस म्हणूनच मिर्झाराजे जयसिंगांनी छावणीत आणले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १८ जुन इ.स.१६८०
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वानानंतर रायगडावर शिजलेल्या कटाचा सुगावा पन्हाळगडावर असलेल्या शंभुराजेंना लागला. शंभुराजेंनी प्रथम पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे श्राद्धविधी आटोपले. राज्यावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी योग्य ती पावले उचलण्यास प्रारंभ केला. शंभुराजेंनी आपले सासरे पिलाजीराजे शिर्के यांना फौजेसह रायगडावर पाठवून कट वाल्यांच्या चौक्या उठवल्या व गडाचा पूर्ण बंदोबस्त केला.राजपद निर्वेध झाल्यावर शंभुराजे रायगडाकडे निघाले. १६७७ मध्ये रायगड सोडल्यापासून तब्बल तीन वर्षांनी शंभुराजे रायगडावर येत होते. पन्हाळ्यावरून रायगडाकडे जाताना वाटेत त्यांनी प्रतापगडी मुक्काम करून गडावरील तुळजाभवानी मातेची पूजा केली. वाटेत ठिकठिकाणी साधुसंतांचे दर्शन घेत राजे रायगडावर पोहोचले.यावेळी शंभुराजेंच्या दिमतीला २० हजारांची फौज होती. गडावर पोहोचताच त्यांनी आपल्या माता व बंधू राजाराम महाराज यांचे  सांत्वन करून त्यांना धीर दिला व दरबार भरवून राज्यकारभार आपल्या हाती घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १८ जून १६९७
#सरसेनापती_संताजी_घोरपडे_स्मृतिदिन
संताजी  हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर संताजी घोरपडे स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. पुढे मराठ्यांनी १७ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १८ जून इ. स. १६९९
छत्रपती राजाराम महाराज प्रतापगडला आले
विशाळ गडी काही काळ थांबून छत्रपती राजाराम महाराज एप्रिल १६९८ मध्ये महाराजांनी मागील वर्षी प्रमाणे पुन्हा एक तत्परतेने गडकोटांची व्यवस्था पाहण्याची मोहीम हाती घेऊन ते १८ जून १६९९ रोजी प्रतापगड वर आले. व पुढे पावसाळी मुक्कामास साताऱ्यास राहिले. ह्याच दरम्यान त्यांनी आगामी मोसमातील एक भव्य आशा मोहिमेची आखणी केली. पावसाळ्यातील मुक्कामात औरंजेब स्वतः जातीने स्वराज्याचे  गडकोट जिंकण्याच्या मोहिमे वर निघणार असल्याची खात्रीलायक बातमीने ही त्यांचे धेर्य जराही विचलित नाही झाले.ह्या मोहिमे बद्दल त्यांनी बरेच मोठ मोठे मनसुबे आखले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १८ जून इ.स.१७१८
छत्रपति शाहू महाराजांच्या कडून आंग्र्यांना सरखेली मिळाल्यावर मराठी राज्याच्या पश्चिम किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी आंग्र्यांकडे आली. सुरतेपासून कारवारपर्यंतचा किनारा व्यापारी दृष्टीने आंग्र्यांचे कक्षेत आला. आंग्रे याजवळ बलाढ्य आरमार की, ज्यात जवळजवळ तीस-चाळीस तोफा असलेली अनेक प्रचंड जहाजे व शूर व निष्णात दर्यावर्दी खलाशी अशा थाटात मराठी राज्याचा सरखेल म्हणून वावरताना ते त्यांच्या शत्रूंना कर्दनकाळासारखे वाटू लागले. पाश्चात्यांशी तंटा न करता सलोख्याने वागावयाचे असे धोरण कान्होजी आंग्रे यांनी ठेविले होते. त्या धोरणानुसार त्यांनी सिद्दीशी तह केल्यानंतर इंग्रजांशी समेट करण्याकरिता त्यांचे वकील कुलाब्यास बोलाविले व दोघांनाही पसंत अशा अटींवर समेट केला. पण तो समेट डळमळीत होता. सन १७१५ च्या डिसेंबर २६ रोजी चार्ल्स बून हा उपद्व्यापी व उद्धट गृहस्थ मुंबईचा गव्हर्नर झाला. त्याने आपणास समुद्र किनाऱ्यावर अनिबंध सत्ता गाजविता यावी म्हणून पश्चिम किनाऱ्यावर इंग्रजांच्या अनिर्बंध संचारास जो अडथळा करील त्याची आम्ही खोडच जिरविणार असा आपला निश्चय जाहीर केला आणि आंग्र्यांची कुरापत काढण्यास सुरुवात केली. त्यासरशी इंग्रजांची मालवाहू जहाजे आंग्र्यांनी पकडून नेली. तेव्हा त्यांनी अधिक जळफळाटास सुरुवात केली आणि आपले जंगी आरमार विजयदुर्गावर पाठविले. आंग्र्यांच्या बलाढ्य आरमाराशी मुकाबला होऊन ते इंग्रजी आरमार पराभव पावून परत आले (१८ जून १७१८).

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १८ जून इ.स.१७८८
इस्माईल बेग एकाकी पडलेला पाहून मराठ्यांनी आपली फौज एकत्र जमवून १८ जून १७८८ रोजी इस्माईल बेगशी लढाई केली. मराठ्यांबरोबर डी बॉईनची कवाईती पलटणे होती. त्यांनी शत्रूची पलटणे कापून काढिली. इस्माईलखान शिकस्त खाऊन २५ स्वारानिशी यमुनापार गुलाम कादरकडे गेला. परंतु गुलाम कादरने इस्माईल बेग यास सांगितले की तुम्ही सोय पडेल तिकडे जाणे. म्हणून तो लखनौकडे गेला या लढाईमुळे आग्र्याचा शह सुटला आणि मथुरेपर्यंतचा प्रदेश मराठ्यांना मोकळा झाला. १८ जूनच्या बागडेहराजवळील आपल्या विजयानंतर महादजी शिंदे यांनी मथुरेस जाऊन दिनांक ४ जुलै रोजी तेथे मुक्काम केला. येथे रणजीतसिंग जाट आपल्या सैन्यासह येऊन महादजीस मिळाला. महादजीबावांची बाजू त्यामुळे बळकट झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १८ जून इ.स.१८५८
#मणिकर्णिका_तांबे ऊर्फ ’#राणी_लक्ष्मीबाई’ #स्मृतीदिन
झाशीची राणी इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या
(जन्म: १९ नोव्हेंबर १८२८)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments