ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 १६ जून इ.स.१६५९
विजापुरच्या आदिलशाहने शिवाजी महाराजांविरुद्ध अफझलखान याला एप्रिल १६५९ मध्ये मोहिमेसाठी मुकर्रर केले होते. १६ जून रोजी आदिलशाहने वाई आणि तळकोकणातल्या सर्व वतनदारांना फर्मान पाठवले आणि शिवाजी राजांविरुद्ध खानाला येऊन मिळण्यास सांगितले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ जुन इ.स.१६६६
(ज्येष्ठ वद्य नवमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)

महाराजांचा औरंगजेब बादशहास विनंती अर्ज!
कोंडी कशी फोडावी याचा महाराज रात्रंदिवस विचार करीत होते. महाराजांनी औरंगजेब बादशहाला पुन्हा एक अर्ज केला. त्यात म्हटले होते की, "मी फकीर होण्याचे ठरविले असून मला बनारसला जाण्याची मिळावी". औरंगजेब बादशहाने कळविले, "फारच चांगले! महाराजांनी फकीर होऊन प्रयागच्या किल्ल्यात रहावे बहादुरखान तिथला सुभेदार आहे. तो महाराजांवर लक्ष ठेवील". प्रयागचा किल्ला राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी कुख्यात होता. अर्थात महाराजांना हे मंजूर नव्हते. त्यामुळे प्रश्न कायमच राहिला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १६ जुन इ.स.१६७०
(आषाढ शुद्ध नवमी, शके १५९७,‌ संवत्सर साधारण, वार गुरुवार)

किल्ले माहुली स्वराज्यात दाखल झाला.
   किल्ले माहुली घेण्याचा महाराजांचा प्रयत्न पुर्वी फसला होता. जुन महिन्यात किल्ले माहुली जिंकून घेण्यासाठी पुन्हा अनुकूलता उत्पन्न झाली.पण लवकरच मोगलांची सुंदोपसुंदी सुरू झाली. दाऊदखान औरंगाबादेस निघून गेला आणि मनोहरदास पुन्हा एकाकी पडला. उद्या महाराजांनी गड वाढल्यास आपल्याला कुमक येणे यादवीमुळे अशक्य आहे हे हेरून त्याने सरळ माहुलीच्या किलालेदारीचा राजीनामा देऊन टाकला. त्याच्या जागी अलावर्दीबेग हा नवा किल्लेदार नियुक्त केला गेला. हा नवा किल्लेदार रुजू होतो न होतो तोच या संधीचा फायदा घेऊन महाराजांनी ५० हजार सैन्यासह माहुलीवर पुन्हा हल्ला चढविला. झालेल्या झुंजीत अलावर्दीबेग ठार झाला. महाराजांचीही २०० माणसे मारली गेली. पण माहुली गड अखेर जिंकला गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ जून इ.स.१६७३
(आषाढ शु.१२ १५५९)
"छत्रपती शिवाजी राजेंची" स्वतःवर कृपादृष्टी व्हावी म्हणुन इंग्रजांनी "थॉमस निकल्स" या इंग्रज अधिकार्याला योग्य त्या सुचना व सोबत मोठा 'नजराणा' देवुन मुंबईहून हिंदवी स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगड वर रवाना केले. टॉमस निकल्स नावाचा इंग्रज वकील शिवछत्रपतींशी तहाची बोलणी करण्यासाठी १९ मे १६७३ रोजी मुंबईहून रायगडाकडे आला. काही दिवसांत च छत्रपती शिवरायांशी तहाची बोलणी करून व संमती मिळवून दि. १६ जून रोजी मुंबई ला परत आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ जून इ.स.१६९५
इज्जतबेग तोफखान्याचा दारोगा, याला उदगीर व कंधार येथे किल्लेदार म्हणून नेमण्यात आले. बादशहांनी शहाजादा बेदारबख्त याला आंब्याच्या सहा करड्या पाठविल्या. तसेच शहाजादा मुअजम, गाजिउद्दीनखान बहादुर, जुल्फिकारखान बहादुर व विजापूर कर्नाटकचा फौजदार कासिमखान यांना आंबे पाठविण्यात आले. बादशहांना कळविण्यात आले की गनिमांच्या फौजेने मानवत, अंबड व वाशिम या भागातः घुमाकुळ घातला आहे. बादशहांनी आज्ञा केली की अलीमर्दानखान (वर्हाडचा सुभेदार) याजकडे अलीकुली बेग गुर्जबर्दार याला पाठवावे आणि अलीमर्दानखानाने जागेवर जाऊन गनिमांचे पारिपत्य करावे अशा अर्थाचे हुकुम पाठवावे. बिलरसखान यास मातबरखानाच्या फौजेतून हुजुरात बोलावून घेण्यात आले. हेरकाऱ्यायांच्या तोंडून कळले की बेडरांनी गुलबर्गा भागात उच्छाद मांडला आहे आणि आसपासची खेडी लुटली आहेत. आग्राला अठरा मे १६९५ रोजी पोहोचून आपण सुभेदारीचे काम सांभाळू लागलो अशा अर्थाची मुख्तारखानाची अर्जी आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments