ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
📜 ६ जून इ.स.१६६०
(ज्येष्ठ शुद्ध ८, अष्टमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, वार बुधवार)
मराठ्यांनी किल्ले वासोटा गड जिंकून घेतला!
सरनौबत नेतोजी पालकर यांनी थेट विजापुरलाच ५ हजार सैन्यासह धडक दिली होती. महाराज पन्हाळ्यात कोंडले गेले होते. शाइस्तेखान पुणे प्रांतात धुमाकूळ मांडू लागला, तरी मराठ्यांचे मनोधैर्य वाखाणण्याजोगे होते. मराठ्यांची दुसरी तुकडी यावेळी कोकणात दाभोळ ते कुडाळ हा आदिलशाही मुलुख लुटून फस्त करीत होती. महाराजांचे ३ ते ४ हजार लोक किनारपट्टीवर निर्भयपणे वावरत होते. व खंडणी वसूल करीत होते. विपरीत परिस्थितीतही मराठ्यांनी विजापुरकरांकडील किल्ले वासोटा गड जिंकून घेतला. महाराज स्वतः पन्हाळ्यावर वेढले गेल्याचे वृत्त कळताच स्वराज्य पेटून उठले होते. प्रत्येक जण जमेल त्या पद्धतीने तरवार गाजवीत होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ जुन इ.स.१६७३
सुरतकरांचा भ्रमनिरास करून मुंबईकर इंग्रजांनी कंपनीला कळविलेले वृत्त !
प्रेसिडेंटच्या पत्राचे उत्तर घेऊन भीम पंडीत नावाचा महाराजांचा इसम इंग्रजांकडे जाईल असा महाराजांनी निरोप पाठविला. टॉमस निकल्स शिष्टाईतून फारसे निष्पन्न झाले नाही. आपली वृत्ती इंग्रजांशी सलोखा ठेवण्याचीच आहे अशी भाषा वापरत असतानाच महाराजांनी टॉमस निकल्सच्या तोंडाला पाने पुसली. सुरतकरांची धारणा अशी होती की "एकीकडून बहलोलखान व दुसऱ्या बाजूने मोगलांचे सैन्य अशा पेचात महाराज असल्याने ते प्रतिकार करण्यास असमर्थ आहेत, व म्हणून महाराजांशी सौजन्याने वागण्याचे कारण नाही. सुरतकर इंग्रजांचा भ्रमनिरास करून मुंबईकर इंग्रजांनी कंपनीला कळविले की "वस्तुस्थिती सुरतकर इंग्रज समजतात तशी नसून महाराज दोघांनाही तोंड देण्यास समर्थ आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ जून इ.स.१६७४
#शिवराज्याभिषेक_दिन...
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ जून इ.स.१६९६
कासिमखानाच्या जागी बादशाहने पुढे झुल्फिकारखानाची निवड कर्नाटकच्या सुभेदारीवर केली. चित्रदुर्गाच्या ब्रम्हप्पा नायकाने संताजी घोरपडेची मदत केल्याबद्दल बादशहाने त्याची जहागिरी खालसा करून नायकाची खोड मोडली. नायकाने अपराधाची क्षमा मागून मोठा दंड भरून आपला जीव मात्र वाचवला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments
Post a Comment