ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

📜 ५ जुन इ.स.१६५९
औरंगजेब बादशहाने धुमधडाक्यात पुन्हा सिंहासनारोहण केले. औरंगजेब बादशहाने सिंहासनारोहणाचे सोहळे यापुर्वीही साजरे केल्याचे संदर्भ सापडतात. पण त्यावेळी त्याच्या चित्तास स्वस्थता नव्हती. दारा व इतर बंधुंचा कायमचा बंदोबस्त व्हायचा होता. तो आता झाला. दारा शुकोह कैद झाला. औरंगजेब बादशहाचा पहिला सिंहासनारोहण १० जुन इ.स.१६५८ झाला. व तत्पुर्वी २१ जुलै इ.स.१६५८ व त्यानंतर आता ५ जुन इ.स.१६५९ज्ञपुन्हा उत्साहात करायचे ठरले. यावेळी महाराजांतर्फे सोनोपंत नजराणा घेऊन दिल्ली-दरबारी उपस्थित होते. त्यांनी नजराणा व महाराजांची अर्जदास्त औरंगजेब बादशहाला पेश केली. यावेळी औरंगजेब बादशहा कधी नव्हे एव्हढा आनंदी होता. त्याने महाराजांना फर्मान पाठविले, एव्हढेच नव्हे तर, आपल्या लोभाचे प्रतिक म्हणून महाराजांसाठी पोषाखही पाठविला. सोनोपंत तो पोषाख व फर्मान घेऊन जावळीस दाखल झाले. फर्मानात औरंगजेब बादशहाने "इकडील लोभ आपणावर पुर्ण आहे असे जाणून असावे अशी ग्वाही दिलेली होती. पंत फार मोलाची कामगिरी करून आले होते. अफजलखानाचे संकट उदभवले असताना औरंगजेब बादशहा - शिवाजी महाराज मैत्री ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ जून इ.स.१६६०
आदीलशाही सरदार अफझलखानास छत्रपती शिवरायांनी मोठ्या बहादूरीने ठार केल्याची वार्ता औरंगजेब बादशहाला समजली. तेव्हा त्याने शिवरायांना मानाचा पोशाख आणि पत्र पाठवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ जून इ.स.१६६६
आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांना ठार मारण्याचा नविन प्रस्ताव "जहाॅंआरा बेगम" च्या मध्यस्तीने औरंगजेबने मागे घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ जून इ.स.१६६६
आग्रा कैदेत छत्रपती शिवरायांच्या जीवास धोका असल्याचे समजताच मिर्झाराजे जयसिंगाचा मुलगा "रामसिंग" याने शिवरायांच्या निवासस्थानाबाहेर विश्वासातील अर्जुनसिंह कछवाह, सुखसिंह नाथावट आणि तेजसिंह यांच्यामार्फत पहारा चालू केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ जून इ.स.१६७२
युवराज संभाजीराजेंनी स्वतंत्रपणे मोहीम सुरू करून मोरोपंत त्र्यंबक पिंगळे (शिवाजी महाराजांचे पंतप्रधान)" यांच्या साथीने जव्हार" परगणा जिंकून मुक्त केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ जुन इ.स.१६७४,
इंग्रजांचा प्रतिनिधी, वकील (मुत्सद्दी) हेन्री आक्झेंडनचे वर्णन!
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ६, जुन इ.स.१६७४ रोजी महाराज सिंहासनारूढ होणार होते, त्याकरिता सिंहासनारुढ महाराजांना मुजरा व नजर करण्यासाठी यावे म्हणून निराजी पंडितांचा निरोप आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ जून इ.स.१६७४
(ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, शके १५९६, वार शुक्रवार)

महाराजांनी ऐंद्रिशांतीचे कार्य आटोपले. व मुख्य राज्याभिषेकाला सुरुवात!  
             सकाळी प्रथम ऐंद्रिशांतीचे कार्य आटोपले आणि त्यानंतर मुख्य राज्याभिषेकाला सुरुवात झाली. हा विधी शुक्रवारी सायंकाळपासून तो शनिवारी पहाटेपर्यंत चालला. शुक्रवारी सायंकाळी प्रथम गणेशपूजन, स्वस्तिवाचन, मातृकापुजन व वसोद्वारपूजन होऊन नंदिश्राह, नारायणपुजन व आज्य होम झाला. आज्याहुती दिल्यानंतर मुख्य राज्याभिषेकास आरंभ झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ जून इ.स.१७३०
छत्रपती शाहु महाराजांतर्फे प्रतिनिधी व फत्तेसींग भोसले रायगडावर स्वारी करून तो जिंकतात.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments