ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 ७ जुन इ.स.१६४९
एका खुर्दखतानूसार चाकण परगणा महाराजांकडे !
राजे शहाजीराजे विजापुरकडेच असल्यामुळे पुढील ४, चार ते ५, पाच वर्षाच्या काळात महाराजांनाही स्वराज्य विस्तारासाठी विशेष हालचाली करता आल्या नाहीत. या काळातील महाराजांच्या सत्तेतील झालेली चढ उतार म्हणजे फतहखान स्वारी पुर्वी घेतलेला किल्ले पुरंदर आदिलशहाने महाराजांकडेच ठेवला. तर तत्पुर्वी घेतलेला कोंढाणा मात्र आदिलशहाला परत द्यावा लागला. खुर्दखतानूसार चाकण परगणा महाराजांकडे आलेला दिसतो.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ७ जुन इ.स.१६६६
(ज्येष्ठ वद्य प्रतिपदा, शके १५८८, संवत्सर पराभव, वार गुरुवार)

महाराज सुटकेच्या मार्गाच्या शोधात!
          महाराज सुटण्यासाठी अनेक मार्ग शोधत होते. परंतु रामसिंह दुहेरी कात्रीत सापडला होता. मिर्झाराजे जयसिंहच्या शब्दात रामसिंह एकीकडे आडकला होता. तर महाराजांना जामीन राहून औरंगजेब बादशहाने रामसिंहाला दुसऱ्या बाजूने जामिनकीतून मोकळे होण्यास सांगितले मात्र रामसिंहाने तसे करण्यास साफ नकार दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ७ जुन इ.स.१६८१
मुल्हेर किल्ल्याचा किल्लेदार देवीसिंह बुंदेला याने शहजादा अकबराच्या २० लोकांना पकडल्याची नोंद!
अखेरीस अकबराने ५ जुन इ.स.१६८० रोजी नर्मदा नदी पार केली आणि तो साल्हेर येथे पोहोचला. शहजादा अकबरा जवळच्या २० लोकांना मुल्हेरचा किल्लेदार देवीसिंह बुंदेला याने पकडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ७ जून इ.स.१७७५
कोन्हेररावांनी अर्जुनगड , धरणगुती व हेराळी येथे ७ जून १७७५ रोजी करवीरकरांशी लढाई केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ७ जून इ.स.१८२७
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील माधवराव भट हे बिठूर येथे गेले होते. माधवराव भट यांच्या मुलाचे नाव धोंडोपंत उर्फ नानासाहेब. ७ जून १८२७ साली दूसऱ्या बाजीरावाने धोंडोपत या मुलाला दत्तक घेतले.
दुसरे बाजीराव यांच्या मृत्यूनंतर धोंडोपत म्हणजेच नानासाहेब बाजीराव हे पेशवे झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments