Posts

Showing posts from February, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१५७२ महाराना सांगाचा पुत्र उदयसिंहाचे निधन जेव्हा उदयसिंह आजारी पडला तेव्हा त्याने आपली आवडती राणी धीरबाई भटियाणी हिचा मुलगा जगमाल याला युवराज घोषित केले. आणि २८ फेब्रुवारी १५७२ साली उदयसिंहने प्राण सोडला. त्याकाळी अशी रीत असायची की जेव्हा राजा मरण पावतो तेव्हा त्याचा मोठा मुलगा(युवराज) अंतीमसंस्काराला जात नाहीत. लगेच सिंहासनावर बसतात, जेणेकरून सिंहासन रिक्त राहत नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१६४४ शहाजीराजे व आदिलशाहीतमधे तडे... रणदुल्लाखानच्या मृत्यूनंतर शाहजी व आदिलशाहतील अंतर वाढत गेले १२ मार्च १६४३ ते २८ फेब्रुवारी १६४४ च्या मधे कधीतरी रणदुल्लाखानचा मृत्यू झाला ह्यानंतर आदिलशाही दरबारात मुस्तफाखानचा दबदवा वाढला मुस्तफाखान बरोबर शाहजीराजेंचे फारसे चांगले संबंध नसावेत शाहजीराजेंला ह्यामुळेच चिंता वाटू लागली... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१६८२ सन १६८२ मध्ये संपूर्ण दख्खन काबीज करण्याकरीता औरंगजेब मोठ्या सेनासागरानिशी दक्षिणेत उतरला. दि. २८ फेब्रुवारी १६८२ मध्ये त्याने बुऱ्हाणपूर स...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १४३ ⚔️ ▶ फिसकारल्या कंगोली मिश्यांचे भयावह हंबीरराव बघून अण्णाजींनी मान टाकली. मुळासकट नाळच उपटून काढल्यागत वाटलेल्या संभाजीराजांच्या मिटल्या डोळ्यांच्या कडा ओलावून आल्या होत्या. उभे राहणे असह्य झाल्याने ते तरातर सदर सोडून अंत:पुराकडे गेलेही. 🔊 “घिऊन जा यास्त्री - आन्‌ टाका कोठीत.” अजूनही थरथरणारे हंबीरराव गर्जले आणि त्यांनीही सदर सोडली. धारकरी कैद्यांना कोठीकडे घेऊन गेले. पन्हाळ्यावरचे वैशाखी उन्ह तावतच चालले! 👉पन्हाळ्याच्या दफ्तरखान्यातून मावळ्यांचे तांडे खुशीने आपापल्या गोटांकडे परतू लागले. प्रत्येकाला दोन-दोन महिन्यांचा पगार आगाऊ आदा करण्याची आज्ञा संभाजी राजांनी दिली होती. चिटणिसी बैठकीवर बसलेल्या परशरामपंतांना युवराजांनी शंंगारपुरी पिलाजीमामांना द्यायच्या पत्राचा मजकूर सांगितला - “मिळेल तो मावळा जमा करून रायगडतर्फेच्या खबरदारीस निघणे. वाटेत पूर्वील चौक्या उठवून सर्व किल्ल्यांवर आपल्या चौक्या बसविणे.” हंबीरराव, रावजी, म्हलोजीबाबा सारे सावधपणे ते ऐकत होते. 👉आता पन्हाळा संभाजीराजांचे भक्कम बंदिस्त ठाणे झाले होते. आसपासचे सुभे...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 २७ फेब्रुवारी इ.स.१६७६ (फाल्गुन वद्य ९, नवमी, शके १५९७, संवत्सर, राक्षस, वार रविवार) महाराज विश्रांतीसाठी पन्हाळगडावर!    महाराज पन्हाळगडावर विश्रांतीसाठी आले. सततच्या दगदगीमुळे महाराजांची प्रकृती खालावत होती. त्यामुळे पुढील ३/४, महीने महाराजांनी इथे विश्रांती घेतली मात्र या काळातही बंकाजी फर्जद याने अथणी भुईसपाट केली व बेळगावात अदिलशाहाची मुजोरी मोडून काढली! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २७ फेब्रुवारी इ.स.१६८३ सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मोघल सरदार बहादूरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २७ फ़ेब्रुवारी इ.स.१६९८ छत्रपती राजाराम महाराज” जिंजी किल्ल्याहून स्वराज्यात दाखल, व किल्ले विशाळगड येथे मुक्कमी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७३१ छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापुर गादी) यांनी कर्‍हाड येथे एकमेकांची भेट घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७४० नासिरजंग हा निजाम उल्मुल्काच्या सहा पुत्रांपैकी एक पुत्र. तो सर्व मुलात हुशार व पराक्रमी ...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १४२ ⚔️ ▶ संध्याकाळ उतरायला झाली. अण्णाजी-मोरोपंतांची बाट बघून हंबीरराव तळबीडात कंटाळले. आपली एवढीही मुर्वत हरघडी खांद्याला लावून असणाऱ्या सुरनीस- पेशव्यांनी ठेवू नये, याची त्यांना मनस्वी चीड आली. मनोमन काहीतरी पक्के ठरवून त्यांनी आनंदराव, रूपाजी, महादजी आणि आपले बंधू शंकराजी व हरीफजी यांना एकजाग करून हुकूम फर्मावला, “चटक्या जनावरांवर मांडा घ्या - आन्‌ कऱ्हाडच्या फौजेत घुसा. लतेवडी मान्सं फोडून तळबीडाच्या वाटेला लावा! निगा.” 👉रात्र धरून हंबीररावाची माणसे अण्णाजी-मोरोपंतांच्या फौजेत घुसली. लागेबांधे लावून एक-एक गोट फोडून तळबीडाकडे धाडू लागली. 👀ती खबर लागताच अण्णाजी बिथरले. मोरोपंतांसह रात्रीचे घोड्यांवरून तळाचा फेर टाकीत माणसे थोपविण्यासाठी फिरू लागले. हंबीरराव माणसे फोडताहेत याचा अर्थ काय तो अण्णाजी अचूक उमगले. फौज दुबळी करून सरलष्कर चालून येणार; ती अधिक दुबळी होण्याची वाट न बघता त्यांच्यावरच चालून जाणे भाग आहे.👈 रात्रभर अण्णाजी-मोरोपंतांनी विचार करून निर्णय घेतला - हंबीररावांवर चालून जाण्याचा! आता कट बहकत चालला. दिवसफुटीबरोबर अण...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 २६ फेब्रुवारी इ.स.१६४७ थोरले महाराज फर्जद "शहाजीराजे भोसले" यांनी छत्रपती शिवरायांकडे पुणे जहागिरीची जबाबदारी दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २६ फेब्रुवारी इ.स.१६६८ किल्लेदार रायाजी गंगादास यांना गोव्याच्या व्हिसेरेईने लिहीलेल्या पत्राची नोंद!    देसायांचे हस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शिरून बंडाळी मारजवित असल्याचे आपण माझ्या निदर्शनास वारंवार आणले आहे. पण ह्या बंडाळीला आळा घालण्यास मी असमर्थ आहे. त्याचे कारण हे की "देसायांची माणसे आमच्या राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जात नाहीत. ती इतर ठिकाणाहून कुठून तरी जात असतील तरी पण लखम सावंत, आणि केशव प्रभू ह्या दोघा उपदव्यापी देसायांना मी आमच्या राज्यातून हाकलून देत आहे. असे जर झाले, तर आपण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रजाजन देसायांच्या उपद्रवापासून मुक्त होतील अशी आशा आहे". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २६ फेब्रुवारी इ.स.१७३७ चिमाजी आप्पानी अटेर व भदावर लुटले 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २६ फेब्रुवारी इ.स.१७३९ खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजव...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १४१ ⚔️ ▶ थोड्या अवकाशातच दीड हजार घोडेस्वारांची तुकडी दौडत पन्हाळ्याच्या चौ-दरवाजातून बाहेर पडली. ती कोल्हापूरला चालली होती. सुमंत आणि पेडगावकरांचाही साजेल असा मरातब करण्यासाठी! तिकडे रायगडावर रामराजांचा मंचकारोहण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरच सविध पार पडला होता. त्यांना 'छत्रपती' म्हणून घोषित केलेली अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हाद निराजी आणि महाराणी ही मंडळी पन्हाळगडावरून “संभाजीराजे कैद झाल्याची" खबर केव्हा येते, याची आतुरतेने वाट बघत होती!! 👉 पन्हाळ्यावर जे घडले त्याचा वृत्तान्त कळताच रायगड हादरला. फासे परतत होते. आता क्षणही वाया दवडायला तयार नसलेले अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हाद निराजी यांच्यासह महाराणींच्या भेटीस आले. कटावाचा सर्वांत विरूप टप्पा पुढे आला. “पन्हाळा हातचा सुटला. युवराजांना कब्ज झाला. तिथलं माणसूबळ दिवसागणिक वाढत आहे. ती थळी फुटल्या खेरीज आपण निभावणार नाही. आता आम्हीच पन्हाळ्याच्या रोखाने कूच झाल्याशिवाय तड लागणार नाही!” अद्याप चिवट अण्णाजींच्या विश्वास ढळला नव्हता. 👉“तेच म्हणतो आम्ही. तुम्ही, मोरोपंत, प...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 २५ फेब्रुवारी इ.स.१५६८ अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २५ फेब्रुवारी इ.स.१६३७ शहाजीराजे आदिलशाहीत दाखल - फर्जद किताब मिळाला. फेब्रुवारी १६३७त महाबली शहाजीराजे आपली पत्नी जिजाबाई, मुलगा संभाजी व बाल शिवाजीसह विजापुरी गेले. शहाजीराजांनी या सर्वांस आपला स्वराज्य संपादनाचा मनोदय सांगितला तो असा, संभाजीराजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे आणि शिवरायाने मातोश्रीसह पुण्यास राहून महाराष्ट्रात स्वराज्य स्थापावे. तिथे ते २५ फेब्रुवारी रोजी आदिलशहाच्या चाकरीत दाखल झाले. आदिलशहाच्या संमतीने शहाजीराजांनी विजापूर जवळच्या कंपिली गावी आपणांस राहण्यासाठी एक वाडा बांधला. मोठा बगिचा केला व तेथे ते राहू लागले. काही दिवसानी कंपिली गावात बांधलेला वाडा आपणासाठी आदिलशहाने द्यावा अशी खटपट घोरपड्यानी अदिलशहापाशी केली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांची बदली बंगरुळास केली व कंपीचा वाडा घोरपड्यास राहण्यासाठी दिला. महमद आदिलशहा तरुण, तल्लख व महत्त्वाकांक्षी होता. मोगलांशी गोडी झाल्याने उत्तरेकडून आपल्या...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १४० ⚔️ ▶ मोरोपंतांच्या संमतीमुळेच बुंध्यामागून फांद्या उतराव्यात तसे प्रल्हाद निराजी, राहुजी, कान्होजी सारे या धाडशी कटाला हातजोड द्यायला तयार झाले. जमल्या असामींचा इतबार घेण्यासाठी महाराणींच्यावतीने भवानीच्या पवित्र भंडाऱ्याची परडी फिरली! मळवट भरले गेले; कटाचे खलबत उलगले. बाहेर पडणाऱ्या कान्होजी भांडवलकरला महाराणी म्हणाल्या, “कान्होजी, बाळाजींना आम्ही तातडीनं याद केल्याचं सांगा.” 🔊व्ह जी. 📜थोड्या वेळातच चिटणीस बाळाजी महाराणींच्या समोर कलमी सेवेस रुजू झाले. “चिटणीस, आम्ही सांगतो त्या भातेनं खलिते सिद्ध करून उद्या दिवसफुटीला पन्हाळगड आणि कोल्हापूर तर्फेला आमचे विश्वासू जासूद खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा यांच्या मार्फतीनंच टाकोटाक रवाना करा.” 🔊“जी.” महाराणी काय मजकुराचे खलिते सांगणार याचा बाळाजींना ठाव आला नव्हता. “पन्हाळ्याला किल्लेदार विठ्ठलपंत, हवालदार बर्हिजी इंगळा, हिरोजी फर्जंद आणि सोमाजी बंकी यांना लिहा - येथील मसलत एक प्रकारची आहे. युवराजांस कैद करून बहुत सावधपणे असणे! स्वारी गेल्याचं वर्तमान फुटो देवो नये!”👀 📜“कोल्हाप...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६६५ छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवारला जराही तोशीस न देता कारवार सोडले. पण इंग्रजांना लुटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. ते जाता जाता म्हणाले, " आमची होळीची शिकार शेरखानाने घालवली !" नुकतीच होळी व शिवरायांचा ३६ वा वाढदिवस "तिथीने" साजरा झालेला होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६७० छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी "सकल सौभाग्य संपन्न सोयरा बाई साहेब" यांना राजगडावर पुत्र लाभ झाला,"रामराजे" नाव ठेवण्यात आले, रामराजे पालथे उपजले, राजियासी हे वर्तमान कळविण्यात आले... राजियासी हे वर्तमान समजल्यावरी त्यांच्या मुखातून उदगार निघाले - "रामराजे पालथे उपजले मग दिल्लीची पात-शाही पालथी घालतील." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६७४ #म्यानातून_उसळे_तरवारीची_पात #वेडात_मराठे_वीर_दौडले_सात कवी कुसुमाग्रजांनी रचलेल्या या ओळी लता मंगेशकरांच्या आवाजात ऐकताना आपणांस स्फुरण चढल्याशिवाय राहात नाही. अंगावर शहारे आणणारा इतिहास कविवर्य कुसुमाग्रजांन...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १३९ ⚔️ ▶ रायगड उतरलेले हंबीरराव कऱ्हाडच्या आणि आनंदराव सातारच्या रोखाने एकमेळाने निघाले. हंबीररावांच्या बरोबर “एकविचाराची जाणती मसलतही' रायगडापासून दूर-दूर निघाली. मागे उरली कट-कारस्थाने!👈 👉 पन्हाळगडावर आबांचे श्राद्धकर्म घातलेल्या संभाजी राजांनी सोमेश्वर तलावाकाठी मांडलेल्या पिंडासमोर हात जोडून म्हटलं, “आबा, चुकलं-माकलं आमचं आहे. तुमचं आम्ही काही राहू देणार नाही.” मनोमन हे म्हटले जाताच सभोवारच्या झाडांच्या घेरावरून कावळेच कावळे झेपावले. पिंडस्पर्श होतो न होतो, तोच तो फस्तही झाला. 📜 अंत्यकर्म संपताच काय होऊ घातले आहे, याची स्पष्ट कल्पना असलेले संभाजीराजे भराभर सूत्रे हलवू लागले. सज्जाकोठीत समोर बसलेल्या परशरामपंतांना त्यांनी कोकणसुभा रावजी पंडित यांना द्यायच्या खलित्याचा मजकूर सांगितला. “रा. रा. रावजी पंडित, कोकणसुभा तर्फ राजापूर यांसी अनेक दंडवत उपरी विशेष तर्फ राजापूर कडील दिवाणी जमली रसद, दाणागोटा टाकोटाकीने इकडे पन्हाळगडी पावता होईल, ते करावे. देखत पत्र जातीनिशी जमेतीसह पन्हाळ्यास प हुजूर भेटीस यावे.”👈 परशरामपंतांनी वाळू...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 २३ फेब्रुवारी इ.स.१६२३ २३ फेब्रुवारी रोजी राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र राजे दत्ताजीराव यांचा स्मृती दिवस. राजे दत्ताजीराव जाधवराव यांचा मृत्यु २३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला.त्यांच्या सिंदखेडराजा परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशजशाखा जवळखेड व उमरद रुसुमचे या असुन सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशजशाखा भुईंज (सातारा), करवंड,करणखेड,वडाळी व सारवडी या होत.... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २३ फेब्रुवारी इ.स.१६६५ (फाल्गुन वद्य ४, चतुर्थी शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार गुरुवार) शिवाजी महाराजांचा कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता येथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापार्‍यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांकडे रूजू केली... छत्रपती शिवाजी महाराजांना काळी नदीच्या जवळच इंग्रजांची व कंगोदेशाची अशी दोन गलबते नांगरून पडलेली दिसली, ही गलबते आपल्या ताब्यात द्यावीत असा निरोप महाराजांनी शेरखान यास पाठवला. शेरखानाने महाराजांचा गलबत ताब्यात देण्याचा ...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 २२ फेब्रुवारी इ.स.१६६५ छत्रपती शिवरायांनी कर्नाटकातील "कारवार" जिंकले. छत्रपती शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे शेरखानने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात छत्रपती शिवरायांच्या समोर रूजू केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २२ फेब्रुवारी इ.स.१६८४ केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून छत्रपती संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्‍या पलतात ( Paltata पलते ) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन छत्रपती संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिर...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १३८ ⚔️ ▶ “सरलष्कर सरकारांचे बंधूच आहेत. ते रामराजांच्या पाठीशी मामासाहेब म्हणून उभे राहतील, असा आम्हाला विश्वास वाटतो. इतरांची आम्ही समजूत पाडू. युवराज रायगडी स्वामी म्हणून येण्यात धोका आहे. जे करणं असेल ते तातडीनं आणि गुसपणं करावं लागेल. बाळराजांना मंचकारोहण करून कारभारी सूत्रे महाराणींनी आपल्या हाती घेतल्याखेरीज राज्याची बरी निर्गत लागणार नाही. या वेळी आपण खंबीरपणं धीर बांधून असावं.” “आम्ही खंबीरच आहोत. तुम्ही अवघ्यांसह बाळराजांच्या पाठीशी असा म्हणजे झालं.” “कुलदैवताच्या आणभाकेनं आम्ही ते करू. निर्धास्त असावं.” 👉सोयराबाईंच्या राजगळाला अण्णाजी हा हिकमतीचा व प्रधानमंडळातील सर्वांत सुळसुळता मासा लागला. हा मासा जाळ्यात फसणारा नव्हता. आपल्या अजब अक्कलहुशारीने जाळे विणणारा होता! छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असता, युवराज असता संभाजी राजांना बगलेला टाकून रामराजांची गादीवर स्थापना करण्याचा घाट अण्णाजींनी का घालावा? त्याला अनेक कारणे होती. एकतर आपल्या घरची गोदावरी ही स्त्री संभाजीराजांच्यामुळेच नाहक खर्ची पडली हा ठाम सल त्यांच...