Posts
ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
- Get link
- X
- Other Apps
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १९ जुन इ.स.१६३६ शहाजहान बादशहाचा गुलाम अलावर्दीखान तुर्कमान याने १४ किल्ले ४ महिण्यात काबीज केले. इ.स.१६३५ शहाजहान बादशहाने दक्षिणेत स्वारी केली. त्याने बागलाण-नाशिककडील किल्ले घेण्यासाठी शाहिस्तेखानाच्या नेतृत्वाखाली अलावर्दीखान यांस नेमले. अलावर्दीखान याने त्या भागातील सर्व किल्ले राजे शहाजीराजे यांच्या लोकांकडून घेतले. त्यासंबंधीचा शिलालेख धोडप किल्ल्यात आहे. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे:- शहाजहान बादशहाचा क्षुद्रतम गुलाम अलावर्दीखान तुर्कमान याने धोडपचा किल्ला व इतर १४ किल्ले अवघ्या ४ महिन्यांत काबीज केले. चांदवड, अंतराळ, (इंद्रा) राजदेहरे, कोलेर (लोकघेर) कंचना, मंचना, कण्हेर, जवळा, रवळा, मार्कंड्या, अहिवंत, अचलगड, आणि किल्ले रामसेज मात्र नंतर महाराजांनी इ.स. १६७० १६७१ १६७२ या कालावधीत वरिल सर्व किल्ले स्वराज्यात आणले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १९ जुन इ.स.१६७६ (आषाढ वद्य ४, चतुर्थी, शके १५९८, संवत्सर अनल, वार सोमवार) महाराजांनी (मुहंमद कुलीखान) उर्फ नेतोजी पालकर यांना विधिवत हिंदू करून घेतले. नेतोजी पालकर (मुहम्मद क...
ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
- Get link
- X
- Other Apps
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १८ जून इ.स. १५७६ हळदी घाटचा रणसंग्राम हळदी घाटचा हा प्रसिद्ध रणसंग्राम १८ जून १५७६ रोजी खमनोर गावानजीक झाला. ह्या युद्धात मेवाड-सेनेचे नेतृत्व स्वतः महाराणा प्रताप सिंह करत होते. ह्या युद्धात महाराणा प्रताप सिंहांच्या बाजूने लढणारे एकमात्र मुस्लीम सरदार होते हकीम खाँ सूरी. महाराणाजींचे २०००० भिल्लांचे सैन्य विरुद्ध मोगलांचे ८०००० सैन्य असे घनघोर युद्ध हळदी घाटात झाले. एक दिवस चाललेल्या ह्या युद्धात दोन्ही बाजूकडील साधारण १७००० सैनिक मारले गेले. मात्र महाराणा प्रताप सिंह विजयी झालेल्या ह्या युद्धात महाराणाजींचा अत्यंत प्रिय घोडा 'चेतक' ठार झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १८ जुन इ.स.१६६५ (आषाढ वद्य प्रतिपदा, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार रविवार) युवराज शंभुराजे व सरसेनापती नेतोजी पालकर मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत दाखल! कीरतसिंह, उग्रसेन कछवाह व युवराज शंभुराजे, किल्ले पुरंदरास मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत पोहोचले. यावेळी युवराज शंभुराजेंचे वय फक्त ८ वर्षाचे होते. युवराज शंभुराजेंसोबत यावेळी सरसेनापती नेतोजी पालकर ...
ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
- Get link
- X
- Other Apps
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १७ जून इ.स.१६३१ शाहजहानची पत्नी मुमताज़ हीचा वयाच्या ३८व्या वर्षी मृत्यू. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १७ जून इ.स.१६३३ इ. स. १६३० पासून १६३६ पर्यंत पहिली सहा वर्षे बालशिवाजी राजांसह जिजाबाई शहाजीराजांच्या हुकुमानुसार घोड्यावरून एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर फिरत होत्या. निजामाची राजधानी दौलताबाद हा किल्ला मोगलांनी १७ जून १६३३ मध्ये आपल्या ताब्यात घेतला. तेव्हा शहाजीराजांनी संगमनेर येथील पेमगिरी उर्फ भीमगड (शहागड) येथे निजामशहाची गादी स्थापिली व स्वतः वजीर बनले. ह्यावेळी राजमाता जिजाबाई शिवाजी राजांसह जुन्नरास होत्या. आपल्याला पकडण्यासाठी मोगल सरदार येत आहे हे समजताच त्यांनी शिवरायांस शिवापुरी पाठवून दिले. त्यानंतर मोगल सरदाराने जिजाऊना पकडून नाशिक येथे कैदेत ठेवले.राजमाता जिजाबाईंचा चुलता जगदेवराव जाधव याच्या सांगण्यावरून त्यांची सुटका झाल्यावर शिवाजीराजांसह त्या शहाजीराजियांबरोबर राहण्यासाठी संगमनेर येथील पेमगिरीस गेल्या. काही दिवसांनी त्या किल्ल्यास विजापूरकरांनी वेढा दिला. तेव्हा शहाजीराजे निजामशहास घेऊन माहुलीस गेले. व बरोबर जिजाबाई व ...
ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
- Get link
- X
- Other Apps
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 १६ जून इ.स.१६५९ विजापुरच्या आदिलशाहने शिवाजी महाराजांविरुद्ध अफझलखान याला एप्रिल १६५९ मध्ये मोहिमेसाठी मुकर्रर केले होते. १६ जून रोजी आदिलशाहने वाई आणि तळकोकणातल्या सर्व वतनदारांना फर्मान पाठवले आणि शिवाजी राजांविरुद्ध खानाला येऊन मिळण्यास सांगितले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ जुन इ.स.१६६६ (ज्येष्ठ वद्य नवमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार) महाराजांचा औरंगजेब बादशहास विनंती अर्ज! कोंडी कशी फोडावी याचा महाराज रात्रंदिवस विचार करीत होते. महाराजांनी औरंगजेब बादशहाला पुन्हा एक अर्ज केला. त्यात म्हटले होते की, "मी फकीर होण्याचे ठरविले असून मला बनारसला जाण्याची मिळावी". औरंगजेब बादशहाने कळविले, "फारच चांगले! महाराजांनी फकीर होऊन प्रयागच्या किल्ल्यात रहावे बहादुरखान तिथला सुभेदार आहे. तो महाराजांवर लक्ष ठेवील". प्रयागचा किल्ला राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी कुख्यात होता. अर्थात महाराजांना हे मंजूर नव्हते. त्यामुळे प्रश्न कायमच राहिला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १६ जुन इ.स.१६७० (आषाढ शुद्ध नवमी, शके १५९७, ...
ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
- Get link
- X
- Other Apps
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १५ जून इ.स.१६६५ (आषाढ शुद्ध त्रयोदशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू,वार गुरुवार) महाराज जड अंतःकरणाने किल्ले राजगडी सुखरुप परत! तह स्वीकारल्याचे मनोमन इतके दुःख महाराजांना वाटले की, जड अंतःकरणाने महाराजांनी ते स्वतःच स्वीकारले. मात्र ते कोणाजवळ व्यक्त करण्याचे धाडसही महाराजांना नव्हते. रयतेची, सैन्याची, प्रजेची, स्वराज्याची आधिक नासाडी होऊ नये म्हणून हा तह चाणाक्ष बुद्धीने आणि चातुर्याने स्वीकारून महाराजांनी स्वराज्य साफ बुडण्यापासून वाचविले. हा जगप्रसिद्ध तह आणि तहाचा अभ्यास मुळात संपूर्णपणे केल्यास महाराज काय होते याची खात्रीच पटते मात्र त्यानंतर महाराज किल्ले राजगडी परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ जून इ.स.१६७५ महाराजांचा बहादुरखानाचा तह ! किल्ले पुरंदरला बहादुरखानाच्या वकिलांना परत पाठविले असले तरी महाराजांनी बहादुरखानाशी तहाची बोलणी सुरूच ठेवलेली होती असे दिसते. अखेरीस महाराजांनी मोगलांपासून घेतलेला मुलुख, व १७ किल्ले मोगलांना परत करावेत, साल्हेर व मुल्हेर । की सातारा व मावळ? महाराजांकडे रहावेत, दख्खनची सरदेसाईपण...
ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
- Get link
- X
- Other Apps
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜 १४ जुन इ.स.१६६५ (आषाढ शुद्ध द्वादशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार बुधवार) छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंची छावणी सोडली व कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. स्वराज्यावर चालून आलेल्या मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंहानी औरंगाबादला आल्यापासून वेगवान हालचाली करत स्वराज्याची चोही बाजूनी नाकाबंदी सुरू केली.पुरंदर किल्ल्याला वेढा दिला,आणि मोगली सैन्याने स्वराज्यातील मुलखाला उपद्रव देणे सुरू केले. या संकटाची तीव्रता लक्षात येताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंशी तहाची बोलणी सुरू केली. ठरल्यानुसार महाराज मिर्झाराजेंच्या छावणीत तहाचा मसुदा ठरवण्यासाठी दाखल झाले.तह पक्का होऊन त्यानुसार महाराजांनी मुघलांना ४ लाख होनांचा मुलुख ,२३किल्ले देण्याचे ठरले. तहाच्या वाटाघाटी निश्चित झाल्यावर मिर्झाराजेंनी महाराजांना परत जाण्यासाठी निरोप दिला. यावेळी त्यांनी महाराजाना १ हत्ती व २घोडे नजर केले. तहात ठरलेला कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज मुघल सरदार किरतसिंह कछवाह यांच्यासोबत कोंढाण्याकडे निघाले. 🏇🚩🏇🚩🏇...