ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳

📜 १४ जुन इ.स.१६६५
(आषाढ शुद्ध द्वादशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार बुधवार)

छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंची छावणी सोडली व कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला.
  स्वराज्यावर चालून आलेल्या मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंहानी औरंगाबादला आल्यापासून वेगवान हालचाली करत स्वराज्याची चोही बाजूनी नाकाबंदी सुरू केली.पुरंदर किल्ल्याला वेढा दिला,आणि मोगली सैन्याने स्वराज्यातील मुलखाला उपद्रव देणे सुरू केले. या संकटाची तीव्रता लक्षात येताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंशी तहाची बोलणी सुरू केली. ठरल्यानुसार महाराज मिर्झाराजेंच्या छावणीत तहाचा मसुदा ठरवण्यासाठी दाखल झाले.तह पक्का होऊन त्यानुसार महाराजांनी मुघलांना ४  लाख होनांचा मुलुख ,२३किल्ले देण्याचे ठरले. तहाच्या वाटाघाटी निश्चित झाल्यावर मिर्झाराजेंनी महाराजांना परत जाण्यासाठी निरोप दिला. यावेळी त्यांनी महाराजाना १ हत्ती व २घोडे नजर केले. तहात ठरलेला कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज मुघल सरदार किरतसिंह कछवाह यांच्यासोबत कोंढाण्याकडे निघाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १४ जुन इ.स.१६८२
(ज्येष्ठ वद्य चतुर्थी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार बुधवार)

आदिलशाही मुलुखावर आक्रमण करण्यास औरंगजेब बादशहाने शहजादा मुअज्जमला रवाना केले. आदिलशाही मुलुखावर आक्रमण करण्यासाठी शहजादा मुअज्जमला औरंगजेब बादशहाने रवाना केले. शहजादा मुअज्जम अहमदनगरहून निघाला या मोहिमेत आज्जमने धारवाड काबीज करून तो छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यात उतरला त्याने आपला तळ कायम करून तेथे लष्कर प्रमुख म्हणून आपली पत्नी जहांजेब बानू "उर्फ जानी बेगम हिला ठेवले व राव अनिरुद्ध सिंग हाडा यांस राजपूत सैन्यासह ठेवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १४ जून इ.स.१६८६
विजापूरची आदिलशाही किल्ला बरेच दिवस वेढा घालूनही ताब्यात येत नसल्याने औरंगजेब बादशाह सोलापूरच्या किल्ल्यातून १४ जून १६८६ ला विजापूरकडे निघाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १४ जून इ.स.१६९४
अलमेलाचा बदललेला फौजदार अबुल्हसन हा येऊन बादशहाला भेटला. आबाजी वगैरे दोन मराठे खटाव परगण्यातून येऊन बादशहाला भेटले.
सत्रसाल बुंदेला ( राठोड) हा हमीदुद्दीनखान याजपाशी तैनात होता. त्याला तीनशे जात व पाचशे स्वार अशी मन्सब होती. तीत शंभर जात व पाचशे स्वार अशी वाढ करण्यात आली. मामूरखान याने कळविले की हजरत बदुन्निसा या इस्लामपुरीत (ब्रहापुरीत) आल्या आहेत. आज्ञा असेल तर हुजुरात पाठवितो. बादशहांनी परवानगी दिली. रायरी (रायगडचा) फौजदार अब्दुरआकखान याचा अर्ज बादशहाच्या नजरेखालून गेला. ख्वाजा जलाह अल्वली याला लष्करखानाच्या फौजेतून काढून हमीदुद्दीनखानाच्या फौजेत तैनात करण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १४ जून इ.स.१७०४
छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी "महाराणी येसूबाई" आणि पुत्र "शाहू(थोरले)" यांना औरंगजेबने कैद करून आग्रा येथे नेले होते. तिथेच कैदेत असताना आजच्या दिवशी औरंगजेब बादशहाने "शाहूराजे(थोरले)" यांचं लग्न लावून दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १४ जून इ.स.१७०८
साताऱ्याचा योग्य बंदोबस्त लावून, फंदफितूरी होणार नाही याची नीट काळजी घेऊन छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरास निघाले. वाटेत पंचगंगा नदी ओलांडतानाच त्यांना बातमी समजली की, महाराणी ताराबाई राणीसाहेब पन्हाळा सोडून रांगणा गडावर गेल्या आहेत. ताबडतोब शाहूमहाराजांनी पन्हाळा व पावनगड काबीज केला आणि ते रांगण्याकडे निघाले. इकडे महाराणी ताराबाईंनी आपले सरखेल कान्होजी आंग्रे यांना मदतीसाठी बोलावले, पण काही कारणास्तव आंग्रे रांगण्यावर वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराणी ताराबाईंनीच रांगणा सोडला व त्या घाट उतरून सिंधुदुर्गाकडे गेल्या. महाराणी ताराबाईंचे सेनापती पिराजी घोरपडे रांगणा लढवायला मागेच थांबले. शाहूमहाराजांच्या सैन्याने रांगण्याला वेढा घातला. परंतु पिराजी घोरपड्यांनी रांगणा नेटाने झुंजत ठेवला. शेवटी चार महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर रांगणा न घेताच (न मिळताच!) दि. १४ जून १७०८ रोजी छत्रपती शाहूमहाराज पन्हाळगडावर आले व तेथेच मुक्काम ठोकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments