ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
📜 १५ जून इ.स.१६६५
(आषाढ शुद्ध त्रयोदशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू,वार गुरुवार)
महाराज जड अंतःकरणाने किल्ले राजगडी सुखरुप परत!
तह स्वीकारल्याचे मनोमन इतके दुःख महाराजांना वाटले की, जड अंतःकरणाने महाराजांनी ते स्वतःच स्वीकारले. मात्र ते कोणाजवळ व्यक्त करण्याचे धाडसही महाराजांना नव्हते. रयतेची, सैन्याची, प्रजेची, स्वराज्याची आधिक नासाडी होऊ नये म्हणून हा तह चाणाक्ष बुद्धीने आणि चातुर्याने स्वीकारून महाराजांनी स्वराज्य साफ बुडण्यापासून वाचविले. हा जगप्रसिद्ध तह आणि तहाचा अभ्यास मुळात संपूर्णपणे केल्यास महाराज काय होते याची खात्रीच पटते मात्र त्यानंतर महाराज किल्ले राजगडी परतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ जून इ.स.१६७५
महाराजांचा बहादुरखानाचा तह !
किल्ले पुरंदरला बहादुरखानाच्या वकिलांना परत पाठविले असले तरी महाराजांनी बहादुरखानाशी तहाची बोलणी सुरूच ठेवलेली होती असे दिसते. अखेरीस महाराजांनी मोगलांपासून घेतलेला मुलुख, व १७ किल्ले मोगलांना परत करावेत, साल्हेर व मुल्हेर । की सातारा व मावळ? महाराजांकडे रहावेत, दख्खनची सरदेसाईपणाची वृत्ती महाराजांना मिळावी, जुन्नरचा मोगली सुभेदार कल्याण-भिवंडीला यावा अशी तहाची कलमे ठरली. (युवराज शंभुराजेंच्या पंचहजारी मनसबदारीचे कलम बाद झाले.) या तहावर महाराजांच्या वकिलाने बहादुरखानाची सही घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ जुन इ.स.१६८१
(आषाढ शुद्ध दशमी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार बुधवार)
शहजादा अकबरास भेटण्याबाबत छत्रपती संभाजी महाराजांची मंत्री मंडळाची बैठक !
जुन महिण्याच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात आलेल्या अकबर व दुर्गादास राठोड यांनी पाली (नागोठणे) परिसरात आपला तळ दिला होता. छत्रपती संभाजी महाराजांना याची त्वरित खबर दिली गेली. शहजादा अकबरास भेटावे की, न भेटावे या संबंधात छत्रपती संभाजी महाराजांनी मंत्रीमंडळाचा सल्ला घेण्याविषयी बैठक बोलावली. त्या मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच प्रथम प्रतिनिधी पाठवून शहजादा अकबराशी चाचपणी करावी असे ठरले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ जून इ.स.१७०४
सरसेनापती धनाजी जाधवांनी औरंगजेब बादशहाच्या ब्रम्हपुरी च्या छावणी वर हल्ला केला. यावेळी मोगलांच्या वर धनाजी जाधवांनी मोठा बाका आणला होता . औरंगजेब बादशहाची बायको उदेपुरी बेगम, मुलगी झिनतउन्निसा बेगम आणि बादशहाच्या अंत:पुरातील इतर स्त्रिया यांच्या सह संपूर्ण कुटुंब कबीलाच मराठ्यांच्या ताब्यात येण्याची भिती निर्माण झाली होती. परंतु ऐनवेळी एका रजपुत सरदारा मुळे ही घटना टळली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ जून इ.स.१७५७
अंतर्वेदेत उतरोन मराठ्यांनी सहारनपूरपासून इटाव्यापर्यंतचा प्रदेश काबीज केला. फक्त नजीबला हाकलून दिल्ली घेण्याचे बाकी राहिले होते. नजीबच्या त्रासाला दिल्लीकर आता वैतागले आणि वजीर गाजीउद्दिनने नजीबच्या हालचाली गुप्तपणे बापू हिंगणेकरवी राघोबादादाला कळवल्या. राघोबादादांनी सर्व बळ एकवटले आणि १५ जून रोजी ते दिल्लीवर निघाले. सैन्य विभागून यमुनेच्या दोन्ही काठावरून सैन्य दिल्लीच्या रोखाने निघाले. ११ ऑगस्ट रोजी मराठी सैन्याने दिल्लीला घेरले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ जून इ.स.,१७५७
म्हैसूरच्या दलवाईशी तह करून मराठे परत फिरले (एप्रिल १७५७) आणि विनापट्टण, सिरा, आदी स्थळे घेत-घेत पेशवे १५ जून १७५७ रोजी पुण्यास आले .
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment