Posts

Showing posts from March, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ३१ मार्च इ.स.१६६५ दिलेरखानने पुरंदर गडाच्या पायथ्याशी तळ ठोकला (३१ मार्च १६६५) जयसिंगास ही बातमी समजताच त्याने दिलेरखानास मोगली फौजेची कुमक रवाना केली. पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यास वेढा घालण्यास फर्माविले. पुरंदरच्या पायथ्याशी आल्या आल्याच दिलेरखानाने गडावर हल्ला चढविला. गडावर मोगलाची फौज चालून आल्यावर किल्ल्यातील मराठ्यांनी हुशार राहून ह्या आपत्तीस तोंड देण्यासाठी ते सज्ज झाले. गडाच्या पायथ्यापासून नारायण पेठपर्यंत मोगली अफाट फौजेच्या चहूकडे राहुट्या, तंबू आणि शामियाने वरून दिसत होते. पुरंदरगड समुद्रसपाटीपासून ४५६४ फूट आणि पायथ्यापासून २५०० फूट उंच बालेकिल्ला. दुसरा भाग माची. याची उंची पायथ्यापासून २१०० फूट, बाले किल्ल्याला बळकट तटबंदी होती आणि मुख्य दरवाजा होता. तोच सर दरवाजा. गडाची राखणदारी करणारे प्रसिद्ध लढवय्ये होते आणि किल्लेदार होते प्रसिद्ध लढवय्ये मुरारबाजी. पुरंदरचा वेढा चालू असताना जयसिंगाने मोगल सैन्याच्या लहान मोठ्या फौजा रोहिडा, राजगड, तुंग, तिकोना ह्या किल्ल्याकडे पाठविल्या. त्या आसपासच्या मुलुखात स्वाऱ्या, जाळपोळ व लु...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १७१ ⚔️ ▶आपल्या जवान पोराचे शिर काढून नेलेल्या खैरतचा काटा मनात रुपत असलेला, “पालखी' नावाचे गलबत बहाल करून थोरल्या छत्रपतींनी नावाजलेला मायनाक भंडारी एल्गाराचे बोलला, “ह्ये लई झालं. असं टांगतं किती दिस ऱ्हायचं? आमी, दवलतखान, संबळखान. आंगरं मिळून आरमारी फाट्याच्या एकवटीने जंजिऱ्याला धडका द्यावा म्हनताव.” 👉“नांदगाव, मुरुड, मांडला अशी पायदळाची फळी करून होड्यांवाटे जंजिऱ्याच्या खाडीतून चाल घ्यायची आम्ही शिकस्त करू.” मायनाकाला दादाजी रघुनाथांनी उचलून धरले. सर्वांनी त्या दोन्ही जाणत्यांना डुया डुलवून, हात उठवून जोड दिली. 👉 छत्रपती काही बोलत नव्हते! त्यांच्या डोळ्यांसमोर उभी होती पन्हाळ्याची सज्जाकोठी! शेवटच्या भेटीत आबासाहेबांनी काढलेले शब्द त्यांच्या काळजाला तोडत होते - “जंजिऱ्यावर सिही पाय देऊन आहे, याची चिंता बाळगा. मावळा व्हा!” 👉 महाराज काहीच बोलत नाहीत, हे ध्यानी आल्याने गोंधळलेले मसलतकरी चिडीचाप झाले. मसलत कुचमली. छत्रपतींचे मौन सोसवेनासे झालेला म्हातारा मायनाक पोटतिडकीच्या धाडसाने म्हणाला, “धनी, कशागुणं चिंता एवढी? आमी हायकी...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १७० ⚔️ ▶“पंत, आपल्या कारवारतर्फेच्या सुभेदारास असेल त्या कुमकेनिशी अंजदीव बेटावर चाल घेण्यास हुकूम द्या. अंजदीव दस्त झाले पाहिजे. फिरंगी त्यावरही डोळा ठेवून आहे, हे कळवा त्यास." 👉पंतांच्या ध्यानीमनी नसलेला कोलदांडा छत्रपतींनी फिरंग्यांविरुद्ध खोलला. त्याने समाधान पावलेल्या निळोपंतांनी टोपीकरांची एक बाब पुढे घेतली, “मुंबईचे टोपीकर एका वजेनं नाराज झालेत स्वामी.” 🔊“कोण वजेन?” 👉“नागोठाण्यात गैरअंमल करणाऱ्या हबश्यांना मदत करता, असा आरोप ठेवून आपल्या सुंदरजी बाजींनी गोऱ्यांची दोन गलवतं नागोठाण्याच्या बंदरात अडकवून ठेवली आहेत. त्यासाठी टोपीकर घायकुत करताहेत.” 👉“निळोपंत, एका समयास चौबाजूंचा गनीम पेटता ठेवणे लागीचे नाही. सुंदरजींना कळवा, जरब देऊन टोपीकरांची गलबतं खुली करणे.” 👉“जी. कुतुबशाही दरबारकडून एक नजराणा आला आहे, स्वामी. चार लाख पगोड्यांचा तबकाचा.” 👉महाराज हसून निळोपंतांना म्हणाले, “तो नजराणा नाही पंत, ती मदत आहे. आम्ही आलमगिराविरुद्ध खडे ठाकावे, यासाठी आलेली! आमच्या अभिषेकसमयीही एवढी रक्कम नव्हती आली कुतुबशाहीकडून. पाहुण्याच्या...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ३० मार्च इ.स.१६६३ (चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १५८५ संवत्सर शोभन वार सोमवार) सरसेनापती नेतोजी पालकर जखमी! मोगली मुलखात लुटालूट करण्यासाठी सरसेनापती नेतोजी पालकर गेले होते. परंतु दैव प्रतिकूल होते. त्यामुळे मोगली मुलखातच मुघल फौजेने त्यांना गाठले व चकमक झाली. सरसेनापती नेतोजी पालकर यांनी पराक्रमाची शर्थ केली. परंतु बळ कमी पडल्यामुळे मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली व त्यातच सरसेनापती नेताजी पालकर यांच्या हाताला व पायाला जखमा होऊन ते जायबंदी झाले. मात्र मराठा फौजेचा पाठलाग करीत मुघल सैन्य विजापुर मुलखात दाखल झाले. यावेळी रस्तम ए जमान याने मुघलांची भेट घेऊन त्यांचे मन वळविले. अपरिचित मुलूख असुन अनवट वाटा व जंगल असल्यामुळे सरसेनापती नेताजी पालकर यांचा पाठलाग करु नये. असे सांगून मुघल सैन्य माघारी पाठविले. रुस्तम-ए-जमान व महाराजांचा अंतस्थ स्नेह अशा रीतीने उपयोगास आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३० मार्च इ.स.१६६५ मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांनी ठरविल्याप्रमाणे ते पुरंदर किल्ल्यास वेढा घालण्यासाठी पुण्याहून दिनांक १५ मार्च १६६५ रोजी नि...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १६९ ⚔️ ▶ “कोंडाजी, तुम्ही खास हुन्नराचे. आबासाहेबांच्या सेवेत कुल साठ असामीनिशी अजब चाल ठेवून पन्हाळा पाडलात तुम्ही. हे काम त्याहून जोखमीचं. पन्हाळा डोंगरी किल्ला. हा जलकोट. दर्याच्या लाटा हबश्याच्या बसकणीत बोट शिरकू्‌ देत नाहीत.” महाराज थांबले. त्यांचे डोळे कोंडाजींच्या कंगणी पगडीभर फिरले. पेटत्या टेंभ्यातील फुटती ठिणगी उसळून उठावी, तसे कोंडाजी एकाएकी मांड मोडीत उठले. तिबारीचा मुजरा भरत दबक्या, खरखरीत बोलीत ठाशीने म्हणाले, “घ्येटला ह्यो पानकोटाचा इडा आमी, खंडुबांच्या आनभाकीनं धनी. ह्या कोंडाजीचं पाय हबश्याच्या बसकटीवर पडलं म्हून खातर धरावी. दारवंच्या कोटाराबराबर जंजिऱ्याच्या भंडारा दर्यावर उदळूनच पायधूळ घ्याया येवू आमी.” तळपत्या डोळ्यांच्या कोंडाजींनी झटकन लवून महाराजांच्या पायांना हात भिडवला. 🔊“शाब्बास, भले फर्जद. आमची हीच उमेद होती तुमच्याकडून.” 👉कोडाजींना मानवस्त्र॑ बहाल करण्यात आली. खलबतातून उठताना हंबीरराव कोंडाजींना जाणता सल्ला देत म्हणाले, “जो काय मानूस चालीत घ्यायचा, त्यो इमान- इस्वासाचा उचला. दर्याच्या पान्यावर हात मार...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २९ मार्च इ.स.१६५७ (चैत्र वद्य दशमी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार रविवार) औरंगजेब अडकला! विजापुर काबीज करून दिल्लीचे तख्त मिळवायचे व नंतर सम्राट म्हणून मिरवायचे असे मनी धरून, औरंगजेबाने बिदर कल्याणी हा भाग जिंकला. पण याच अतिउत्साहात औरंगजेब एका मोक्याच्या क्षणी अफजलखानाच्या हातात सापडला. अफजलखान विजापुरच्या बादशहाशी एकनिष्ठ होता. त्यामुळे त्याने औरंगजेबास ठार मारायचे ठरविले व विजापुरवरील संकट कायमचे दूर करावयाचे असे मनोमन ठरविले. बिदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात आला. मात्र याच प्रयत्नात औरंगजेब अफजलखानाच्या तावडीत सापडून जिवावरच्या संकटावर सापडला होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २९ मार्च इ.स.१६६७ सिंधुदुर्ग आज रोजी बांधून पूर्णत्वास आला, म्हणून महाराजांनी गडावर मोठी पूजा घातली. मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा केली;" या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा चौर्‍यांशी बंदरी ऐशी जागा नाही"! आणि ‘‘सिंधुदुर्ग‘‘ नावाची शि...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उठवलेल्या वादळी झंझावाताला रोखण्यासाठी औरंगजेबाने मुघल सरदार दाऊदखानला दख्खनमध्ये पाठवले. आजच्या दिवशी दाऊदखान फौजफाटा घेऊन नगरला पोहोचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ मार्च इ.स.१६८३ (चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर सिद्धार्थी, वार सोमवार) छत्रपती संभाजी महाराजांचे सरदार नारोजीराव यांनी धारूर किल्ल्यावर चाल केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या हुकुमानुसार मराठे व-हाडपर्यंत मुलुखगिरी करत होते. मराठ्यांच्या मुलुखगिरीत त्यांची अनेक ठिकाणी मोगलांशी चकमक उडे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नारोजी नावाच्या एका सरदाराने धारूर किल्ल्यावर आपल्या सैन्यासह चाल केली. किलअदारखान या किल्लेदाराशी सामना झाला. १०० मराठी सैन्य मारले गेले. किल्लेदाराने त्यांची डोकी कापून मनोरा रचला. १३ लोकांना जिवंत पकडले. मोगल सैनिक बहुतेक कामी आले. मात्र मराठ्यांनी प्रचंड पराक्रम गाजवून मोगल सैन्य कापून काढले. छत्रपती संभाजी महाराजांच्या सूचनेनुसार मराठी सरदारांचा यल्गार जबरदस्त होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ मार्च इ.स.१७...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २७ मार्च इ.स.१६६६ औरंगजेबाचे राज्यरोहन १६६६ हे वर्ष औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. यापूर्वीच बादशहा औरंगजेब स्वतःला मुघल सम्राट म्हणून सारे बादशाही सोपस्कार केले होते पण बादशाह शहाजहान जिवंत असल्यामुळे लोकांच्या दृष्टीने औरंगजेबाची ही बंडखोरीच होती. आता बादशाह शहाजहानच्या मृत्यूमुळे सिंहासनावर बसण्याची व शाही सोपस्कार करवून घेण्याचा नैतिक अधिकार औरंगजेबाला प्राप्त झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा दि. २७ मार्च १६६६ ला आग्रा येथे बादशहाचा राज्यारोहण केला. शिवराय त्यावेळी प्रवासातच होते. राज्यरोहणाच्या वेळी औरंगजेबाने आपल्या बहिणींना पुष्कळ संपत्ती दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २७ मार्च इ.स.१६६७ मिर्झाराजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना २४ ऑक्टोबर १६६६ रोजी अटक केली होती. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. आजच्या दिवशी नेताजी पालकरांचे औरंगजेबाकडून धर्मांतर झाले. नेताजी पालकरांचे ‘मुहंमद कुलीखान’ असे नामकरण करण्यात आले. जून १६६७ ला और...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १६८ ⚔️ ▶ महाराज विचारांवर फेर घेऊ लागले. त्यांच्या आणि धोंडशाला चाललेल्या अकबराच्या मनात टिपरी झडत होती, ती एकच - अलमगीर! आणि नेमक्या याच दिवशी, शाही सवारीच्या सजल्या हत्तीवर अंबारीत बसून झडती शाजणे, नौबती डंक्यांच्या उसळत्या गजरात, प्रचंड फौज पाठीशी घेऊन औरंगजेब बऱ्हाणपूरच्या वेशीत प्रवेशत होता! त्याची घारी नजर हौद्यातूनच बऱ्हाणपुराभोवतीची तटबंदी नीट उठली आहे की नाही, याचा तलाश घेत होती! खैरात मिळालेले फकीर, मुल्ला, मौलवी त्याला हात उठवून तोंडभर दुवा देत होते! 👉पालीहून रायगडी आलेले महाराज, गडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या दारू कोठारासमोर मांडलेली तोफांची भांडी निरखीत निळोपंतांना म्हणाले, “फरांसिसांच्या वकिलानं दिला शब्द पाळला पेशवे?” 👉“जी, आताषीचा बारदानाही त्यांनी पावता केला आहे.” निळोपंतांनी अधिकाचा तपशील दिला. पन्हाळ्यावर भेटलेल्या डच वकील लेफेबेरने आपल्या दरबारी शिफारस करून तोफा व दारूगोळा रायगडी पाठविण्याची व्यवस्था केली होती. 🔊“मुहूर्त बघून या भांड्यांचं पूजन करून घ्या पंत.” कसल्यातरी विचारात गढलेल्या महाराजांनी, घोड्याचे थोपटाव...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १६७ ⚔️ ▶ कार्तिकाचा शुद्ध पक्ष धरून कविजी, प्रल्हाद निराजी यांच्यासह निवडक शिबंदी घेऊन छत्रपती रायगड उतरले. निजामपूर, रोहा अशा मजला ठेवत पालीच्या शिवेवर आले. शिवेवर आपल्या माणसांनिशी जिवा हरी रुजू होते. डुईला केशरी साफा बांधलेला, मध्यम वयाचा, ठसठशीत अंगलटीचा एक तगडा रजपूत मर्दानाही आगवानीसाठी खडा असलेला महाराजांना दिसला. तो डोळे जोडून मराठ्यांच्या छत्रपतींना निरखत होता.👀 👉 पायउतार झालेले महाराज जिवाजींची अदब घेत पुढे झाले. त्या रजपूत सुरम्यावर नजर खिळलेले महाराज त्याच्यासमोर येताच त्याने नम्रभावे गुडघे टेकून, गर्दन झुकवून रजपुती रिवाज दिला. जिवाजींनी तत्परतेने त्याची ओळख पटती केली, “हे दुर्गादास राठोड! शहजाद्यांचा दोस्ताना राखण्यासाठी दक्षिणेत आलेत.” 🔊“जय एकलिंगजी, पादशहा सलामत मुल्क मऱ्हाट के खिदमतमें तसलीम।” दुर्गादास पुन्हा मानेत लवला. छत्रपतींनी झुकून आदराने राठोडला वर घेत ऊरभेट दिली. सर्वांसह राजस्वारी सुधागडच्या खासेवाड्यात आली. थाळे आणि विश्राम होताच कलत्या दुपारीला कविजी, नेताजी पालकर, प्रल्हादपंत अशा असामीनिशी महाराज ...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 २६ मार्च इ.स.१६६७ छत्रपती शिवाजी महाराज श्रीनृप शालिवाहन शके १५८९ पल्वंग नामसंवत्सर, चैत्रशुद्ध पौर्णिमा रोजी सिंधुदुर्गावर पोहोचले. याचवेळी हिरोजींनी या रयतेच्या राजाचे चरणकमल चुनखडी व जस्त मिश्रणावर मुद्रित करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर इतिहासाचे एक सोनेरी पान साकारले होते. तीन वर्षे सुरू असलेले काम शिवरायांनी पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग कृतकृत्य झाला होता. सिंधुदुर्गाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या हिरोजींनी महाराजांकडे एक इच्छा मागितली, ते म्हणाले, "महाराज या किल्ल्यावर तुम्ही सदैव असावे असे आम्हाला वाटते. आमची एक इच्छा आहे, तुमचे चरणकमल आमच्या नेहमी दृष्टीस पडावेत. "छत्रपती हिरोजींकडे बघतच राहिले. महाराजांनी होकार देताच चुनखडी आणि जस्ताचे मिश्रण असलेले तबक हिरोजींनी मागविले. दोन तबके पुढे आणण्यात आली आणि हिरोजींनी महाराजांना आपले एक पाऊल या तबकात ठेवण्यास सांगितले. महाराजांनी आपला डावा पाय तबकात ठेवला. तर दुस-या तबकात आपला उजवा हात. स्वत: राजांनी.. दुस-या कुणीही नव्हे, चुन्यामध्ये उठविले आपल्या हाताच्या पंज्याचे आणि पावलांचे ठसे ह...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜२५ मार्च इ.स.१६७५ 'जाॅन चाईल्ड' या इंग्रज अधिकाऱ्याने छत्रपती शिवरायांची भेट घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २५ मार्च इ.स.१६८९ मुघलांनी छत्रपती संभाजीराजेंना कैद केल्यानंतर मुघल सरदार 'झुल्फीकारखान' याने मराठ्यांची राजधानी 'किल्ले रायगड' ला वेढा घातला. याप्रसंगी महाराणी येसुबाई यांनी राजाराम यांना रायगडावरून निसटून जाण्याचा सल्ला दिला. जानकीबाई रायगडावर महाराणी येसुबाई व बाळ शाहू सोबत राहिल्या तर ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी व प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आदि सेनानीसह राजाराम यांनी रायगड सोडून जिंजीकडे प्रस्थान केले. वाटेत विशाळगडावर ताराबाई,राजसबाई आदिना पाठीमागे ठेवून ते जिंजीला पोहचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २५ मार्च इ.स.१७०३ सिंहगड किल्लेदाराच्या मृत्यू नंतर मोगलांचे मोर्चे २१ मार्च रोजी कल्याण दरवाजात पर्यंत सरकले होते. त्यास उत्तर म्हणून किल्ल्यातील दीड हजार मराठयांनी २५ मार्च रोजी उजबेकखांनाच्या ठाण्यावर सडकून हल्ला केला. व तेथे कापाकापी करून परत किल्ल्यात गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २५ मार्च इ.स.१७५७ प्ला...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २३ मार्च इ.स.१६६० (चैत्र वद्य सप्तमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, वार शुक्रवार) संकटाची मालिका! स्वराज्याचा फास आवळत चालला होता. त्यात भर म्हणून अदिलशहाने मावळच्या सर्व देशमुख, वतनदारांना केदारजी खोपड्याच्या मदतीने कौलनामे पाठवून आदिलशाहीस मदत करण्यासाठी विनंती पत्रे लिहीली. एकीकडून अदिलशाहीने सिद्दी जौहरच्या रुपाने तर दुसरीकडे मोगलांकडून शाहिस्तेखानाच्या रुपाने फास आवळत चालला होता. त्यातच वतनाच्या लोभाने आपलेच लोक फुटून संकटात महाराजांना साथ देण्याऐवजी यवनांना जाऊन मिळत होते, त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानत होते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २३ मार्च इ.स.१६७४ नेसरी येथे झालेल्या बहलोलखान आणि प्रतापराव गुजर यांच्यात झालेल्या लढाईत ( २४ फेब्रुवारी १६७४ ) प्रतापराव गुजर मृत्यूमुखी पडल्यानंतर मराठा सैन्यानी आनंदराव मकाजी यांच्या नेतृत्वाखाली कानडी मुलुख झोडपायला सुरुवात केली. तेंव्हा बहलोलखान आंनदराव मकाजी यांच्यावर चालून आला पण त्यांनी खानाचा पराभव केला. त्यांनतर दिलेरखान व बहलोलखान आनंदराव मकाजी यांच्यावरती संयुक्तपणे चालून गेले. पण...