ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳
📜 १३ जून इ.स.१६६५
पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री शिवाजीराजे आणि मिर्झाराजे यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता.
त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या व औपचारिकतेचे बोलणे झाले निरोपाचे विडे दिले गेले, त्यानंतर राजे पुन्हा मिर्झाराजांकडे आले..
दि. १३ जून रोजी रात्री मिर्झाराजे व महाराज यांनी तहाचा पाच कलमी मसुदा पक्का केला त्यानुसार :
१. महाराजांकडे लहान-मोठे २३ किल्ले, त्यातील १ लाख होणा (५ लाख रुपये) वसुलासह, शाही कृपेचे प्रतिक म्हणून ठेवण्यात येतील. यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये वा मोगली मुलुख लुटू नये. .
२. दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपविल्यास ती त्यांनी पूर्ण करावी..
३. शिवाजीपुत्र संभाजीला मोगलांची पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल.
त्यांच्या वतीने (शंभूराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते.)
प्रती-शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेतोजी पालकरास सदैव दख्खच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल..
४. विजापुरी तळ कोकणातील ४ लक्ष होनांचा मुलुख व ५ लक्ष होनांचा विजापुरी बालाघाटी मुलुख महाराजांना बहाल करून तसे फर्मान मोगल बादशहाने त्यांना द्यावे व असे फर्मान मिळाल्यास महाराजांनी मोबदल्यात ४० लक्ष होन खंडणी, सालीना ३ लक्ष होनांच्या हप्त्याने बादशहाला द्यावी..
५. तळ कोकण व बालाघाटातील निजामशाहीचे २३ किल्ले व त्याखालील ४ लक्ष होन वसुलीचा मुलुख शिवाजीकडून घेऊन मोगल साम्राज्यास जोडण्यात यावा.
हाच तो पुरंदरचा इतिहासप्रसिध्द तह...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 १३ जुन इ.स.१६७४
इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडन किल्ले रायगड सोडून निघाला. १२ जुन इ.स.१६७४ इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडनच्या करारावर प्रधानांच्या सह्या होऊन शिक्कामोर्तब झाले. झालेल्या तहावर महाराजांनी ताबडतोब सही करावी असे टुमणे आक्झेडनने राज्याभिषेकाच्या आधीपासूनच निराजीमार्फत लावले होते. पण महाराजांनी त्याची मुळीच दखल घेतली नाही. राज्याभिषेकानंतरही ४ दिवस पर्यंत महाराजांनी आक्झेडनला ताटकळत ठेवले. अखेर दि. ११ जुन इ.स.१६७४ करारावर महाराजांची सही झाली. व दि. १२ जुन इ.स.१६७४ प्रधानांच्या सह्या होऊन करारावर शिक्कामोर्तब झाले. व दुसऱ्या दिवशी हेन्री आक्झेंडन किल्ले रायगड सोडून निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 १३ जून इ.स.१७००
औरंगजेब स्वतः सज्जनगड बघण्यास गडावर पोचला. दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड ९ जून रोजी जिंकला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 १३ जुन इ.स.१७४१
पोर्तुगीज सैन्याने सावंतांच्या ताब्यातील बार्देश प्रांत जिंकून घेतला. बार्देश प्रांतावर सावंतांचा उणा पुरा ३, तीन महिने अंमल होता. त्यादरम्यान पोर्तुगीज सेनाधिकारी तो प्रांत घेण्याची तयारी करीत होते. त्यांनी बार्देश मध्ये सैन्य घुसवून सावंतांच्या सैन्याला पिटाळून लावले. पोर्तुगिजांना सावंतांवर सुलभपणे विजय मिळविणे शक्य झाले कारण म्हणजे गोव्याच्या नविन व्हिसेरेईने पोर्तुगालहून येताना बरोबर आणलेल्या नविन पद्धतीच्या प्रभावी तोफा त्या दर मिनिटास ३२०, गोळे टाकीत असत. त्या तोफांच्या माऱ्यासमोर सावंतांच्या जुन्या पुराण्या तोफा टिकाव धरू शकल्या नाहीत यात नवल नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 १३ जून इ.स.१७५७
राज्यपदाच्या लोभापुढे कुराणाची शपथ लटपटली. इंग्रज आपली फौज घेऊन मुर्शिदाबादेवर चाल करून गेले. सिराजउदौला आपली फौज घेऊन प्लासी येथे गेला. (१३ जून १७५७)
इंग्रजांची फौज त्यावेळी १००० युरोपियन २१०० हिंदी सैनिक आणी ९ मोठ्या तोफा इतकी होती.
याउलट सुभेदार सिराजउदौला जवळ ५०००० पायदळ १०००० घोडेस्वार आणी ५० मोठया तोफा शिवाय फ्रेंचांचा तोफखाना सोबत होता. ठरल्याप्रमाणे लढाई सुरू झाली आणी मिरजाफर बहुतेक सर्व फौज घेऊन इंग्रजांस जाऊन मिळाला. या आकस्मित आपत्तीने सुभेदार घाबरून थोड्या इमानी लोकांसोबत राजवाड्यात पळून गेला. इंग्रजांच्या पाठलागामुळे सुभेदार फकिराच्या दिन वेशात एका खिडकीतून रात्रीत पळून एका बगिच्यात लपून बसला. हि बातमी मिरजाफरला समजली. शेवटी सुभेदाराला पकडण्यात आले.जाफरचा मुलगा सीरन याने सिराजउदौलास ठार केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 १३ जून इ.स.१७६२
हैदराच्या या धामधुमीचा बंदोबस्त करण्यासाठी माधवराव पेशवे व
त्रिंबकराव पेठे कर्नाटकात गेले .
तुंगभद्रापावेतोच्या प्रदेशावर आपली हुकूमत बसवून व थोडी बहुत पैदास करून पर्जन्य सुरुवातीस १३ जून १७६२ ला ते परत पुण्यास आले .
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 १३ जून इ.स.१८१७
पुणे करार
पण ८ मे १८१७ रोजी एलपीस्टन ने पुणे शहरास वेढा दिला आणि नाकेबंदी केली. मग मात्र पेशव्याने त्रिंबकजीस पकडन्यासाठी जाहीरनामे काढले आणि सिंहगड, पुरंदर, वसई हे किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन केले. मग एलपीस्टनने वेढा उठवला. यावेळी इंग्रजांनी रावबाजी बरोबर एक करार केला तो पुणे करार म्हणून ओळखला जातो. या कराराद्वारे इंग्रजांनी पेशव्याच्या उरल्या सुरल्या मुसक्याही आवळल्या.
कराराची कलमे खालील प्रमाणे .
पुणे तह - १३ जून १८१७
१. वसईचा तह कायम राहील शिवाय ,
२. पेशव्याने त्रिंबकजीस गंगाधर शास्त्र्याचा खुनी म्हणून मान्य केले आणि त्यास इंग्रजांचे स्वाधीन करण्यास कबुली दिली .
३. त्रिंबकजिस अटक होईपर्यंत त्याचे कुटुंब इंग्रजांच्या ताब्यात राहील .
४.सरदार , दौलतदार यांच्या कडील अकाबारनीस कारकून , वकील यांस पेशव्याने दरबारी ठेऊ नये . काही सवाल जबाब करावयाचे असले तर ते इंग्रजां मार्फत करावे .
५.इंग्रजांशी स्नेह असलेल्या करवीर , सावंतवाडीकर पेशव्याचा काही हक्क सांगू नये .
६. रावबाजीने इंग्रजांचे ५००० स्वर , ३००० पायदळ , तोफखाना यांचा खर्च चालवून ते स्वतः पाशी ठेवावे . त्यासाठी तोडून दिलेल्या ३४ लक्ष मुलुखावर आणि किल्यावर हक्क चालवू नये .
७. अहमद नगर च्या किल्ल्या भोवतालची ४००० हात चौफेर जमीन पेशव्याने इंग्रजांस द्यावी . इंग्रजी छावणीच्या बाजूची कुरणे कही करी द्यावी .
८. इंग्रज तैनाती फौजेपेक्षा कितीही फौज पेशव्याच्या मुलुखात ठेवतील त्यास पेशव्याने हरकत घेऊ नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment