ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳

📜 १२ जुन इ.स.१६४९
मराठ्यांनी चाकण प्रांत व किल्ले संग्रामदुर्ग स्वराज्यात दाखल करून घेतले.
चाकण हा भुईकोट आहे. चाकणची निर्मिती कोणी केली हे अद्यापही ठाऊक नाही. बहामनीच्या राजवटीत चाकण हे सुभ्याचं मुख्य ठिकाण होतं. पुढे चाकणच्या किल्ल्यासाठी अहमद निजाम व बहामनी सरदार आदिलखान (आदिलशाहीचा संस्थापक) यांच्यात लढाई होऊन चाकणचा सुभेदार जैनुद्दीनसह सातशे जण मारले गेले. निजामशाहीचा अस्त होईपर्यंत चाकण निजामाच्याच ताब्यात होते. शहाजीराजांनी सन १६६३ मध्ये निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला त्या वेळी चाकण शहाजीराजांच्या ताब्यात होते.‌‌ स्वराज्य स्थापनेच्या वेळी चाकण आदिलशाहीच्या ताब्यात असून त्यावर आदिलशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हा होता.‌ आदिलशाहीने चाकणचं नाव इस्लामाबाद केले होतं. पुढे शिवाजी महाराजांनी चाकणचा इस्लामाबाद जिंकून घेतला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांचे मन जिंकून घेऊन त्यांना स्वराज्याच्या कामी आणलं, शिवाजी राजांनी चाकणच्या किल्ल्याचं नाव संग्रामदुर्ग ठेवून फिरंगोजी नरसाळा यांनाच किल्लेदारी दिली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १२ जुन इ.स.१६६५
(आषाढ शुद्ध दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार सोमवार)

महाराज व इटालियन प्रवासी डॉ. निकोलाय मनुची यांची भेट!
  महाराज व इटालियन प्रवासी डॉ निकोलाय मनुची यांची ऐतिहासिक भेट झाली. ही भेट इतकी ऐतिहासिक आणि महत्त्वाची आहे की, या भेटीला मोल नाही. कारण निकोलाय मनुची याला तत्कालीन राजे रजवाड्यांची चित्रे जमविण्याचा शौक होता. पुढे याच मनुचीने महाराज आग्रा नजरकैदेत असताना मीरहसन नावाचा चित्रकार स्वतःचे पत्र देऊन पाठविला व महाराजांचे जगातील पहिले चित्र एका मुसलमान चित्रकाराने रेखाटले. अर्थात याच चित्रामुळे संपूर्ण जगाला आणि आपल्याला आपले राजे कसे दिसत होते हे कळले. त्यामुळे ही भेट व हा दिवस फार मोलाचा आहे.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १२ जून इ.स.१६७४
इंग्रज आणि शिवराय यांत तह झाला.
तहाच्या अटीप्रमाणे इंग्रज हे मराठी राज्यात वखारी काढणे, व्यापार करणे इ. व्यवहार मोकळेपणाने करू लागले. मराठी राज्यात आपले नाणे चालावे किंवा मोगल राज्यातील वखारींच्या लुटीची भरपाई मराठ्यांनी करून द्यावी, अशा अवास्तव मागण्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नाकारल्या.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १२ जून इ.स.१७३२
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संभाजी आणि मानाजी ह्या २ मुलांमध्ये सरखेल पदासाठी झगडा सुरु होता. १२ जून १७३२ रोजी त्यांच्यात लढाई सुरु झाली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १२ जून इ.स.१७५३
बादशहा व वजीर या दोघांनी एकमेकांविरुद्ध लढाई पुकारली. राजधानीतील सरदार बादशहास मिळाले. वजिराने राजेंद्रगीर गोसावी व सुरजमल जाट यास फौजेसह मदतीस बोलावले. दोन्ही सैन्याच्या लढाया झाल्या. त्या राजेंद्रगीर गोसावी दिनांक १२ जून १७५३ रोजी मारला गेला. बादशहाने वजीरीची वस्रे गाजीउद्दीन इमादुल्मुल्क यास दिली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १२ जून इ.स.१७६०
तर पानिपत झालेच नसते...
अब्दाली दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्यात उत्सुक नव्हता. त्याला परत जायची घाई होती. त्याने शेवटी मल्हाररावांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. अनेक चर्चा होत तहही झाला. "अब्दालीचा नजीबला असलेला पाठिंबा लक्षात घेऊन शिंदे - होळकरांनी हाफिज रहमतखानाच्या मार्फत तोड ठरवली कि, नजीबचा प्रदेश त्याच्याकडे कायम ठेऊन अब्दालीला अब्दालीस मार्गस्थ करावे. या बोलण्यात गंगोबातात्या ( होळकरांचा कारभारी ) व हिंगणे ( पेशव्यांचा दिल्लीतील वकील ) यांचा सहभाग होता. तहाच्या वाटाघाटी चालू होत्या तेव्हा शिंदे - होळकर भरतपूर येथे होते. सुरजमल्ल जाट देखील मध्यस्थी करू लागला होता. नजीबकडे असलेला प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायच्या अटीवर १३ मार्च सुमारास अब्दाली - मराठे यांच्यात तह घडून आला. पण उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर भाऊची नेमणूक झाल्याची बातमी येतांच नजीब घाबरला. अब्दाली छावणी उठवून निघालेला असताना, नजीबने त्यास येथेच रहाण्याची गळ घातली. परिणामी वरील करार फिसकटला. असे असले तरी मराठी सरदारांनी तहाची बोलणी सुरुचं ठेवली होती. १२ जून रोजी मल्हारराव होळकर लिहितात, " गिलच्यांच्या फौजेतून हाफिज रहमतखान भरतपुरास आला. गंगाधरपंतांशी ( बहुतेक गंगोबा तात्या ) बोलत आहे. नजीबखानाने सलुखाचा संदर्भ चालविला आहे, पण आमचे विचारानुरूप बनत नाही. श्रीमंतही संनिध आले."

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १२ जून इ.स.१७९२
महादजींच्या दक्षिणेतील आगमनामुळे स्वतः नाना फडणीस अस्वस्थ झाले ले होते. पुणे दरबारातील इतर मराठे सरदारही घाबरले होते. अशा भितियुक्त वातावरणात महादजी शिंदे १२ जून १७९२ रोजी पुण्याच्या आसमंतात आले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments