ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳आजचे शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २० जून इ.स.१६७७ विजापुरचा सुरमा म्हणून, अब्दुल्लाखानाची ओळख होती . हा किल्ले वेल्लोरचा किल्लेदार. राजांनी हा किल्ला घेण्यासाठी जोराची तयारी केली होती. पुढे मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. अब्दुल्लाखान किल्ला शर्थीने लढवत होता. तेव्हा किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी महाराजांनी नजीकच्या २ टेकड्यांवर २ किल्ले बांधले, त्यांची नावे साजरा आणि गोजरा. तोफांचा मारा सुरु झाला. वेल्लोरचा किल्ला रेंगळणार असे दिसताच राजांनी नरहरी रुद्र या सरदारास २ हजार स्वार आणि ५ हजार पायदळ देऊन वेढ्याजवल ठेवले. त्यातच, दि. २० जूनला शेरखान मराठ्यांवर चालून आला, त्याला अडवायला राजे स्वतः गेले. खानाला पळता भुई थोडी झाली. पुढे त्याचा पाठलाग ही केला. शेरखान राजांना शरण आला. त्याची व्हालौर, टेजपठण, भवनगिरीपठण ही ठाणी मराठयांनी ताब्यात घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० जून इ.स.१६८० छत्रपती संभाजी महाराज रायगडावर छत्रपतींच्या मृत्यूनंतर दिनांक २१ एप्रिल १६८० रोजी आनाजी दत्तो यांनी पुढाकार घेऊन रायगडावर राजाराम महाराजांचे मंचकारोहण करविले व संभाजी राज्यांना अटक करण्यास पन्हाळ्...